नमस्कार मित्रांनो,  




     शरीरात रोगप्रतिकारशक्ती वाढविणारे फळे



1) सफरचंद - Apple 






सफरचंद हे आपल्या शरीरातील रोगप्रतीकारशक्ती वाढविन्यास मदत 

करते म्हणूनच अशी एक मन आहे की "रोज एक सफरचंद खा 

आणि डॉक्टरला  दूर ठेवा." सफरचंदाच्या सालामध्ये कॅसोटीन नावाचे एक 

तत्व आढळून येते.हे तत्व आपल्या शरीरातील रोगप्रतिकारशक्ती 

वाढविण्यासाठी अंत्यत उपयोगी आहे. तसेच शरीरातील सुजन पण कमी 

करते.सामान्यतः रोज सकाळी नास्ताच्या वेळी सफरचंद खाणे उत्तम  

असते.यात अनेक पोषणमूल्ये असतात. सफरचंदामंध्ये कॅल्शिअम लोह व 

फास्फोरस ही खनिजे असतात.अ, ब, क ही जीवनसत्वे असतात.  

सफरचंदामध्ये प्रथिने  असतात. सफरचंदामध्ये लोह भरपूर प्रमाणात 

असल्याने अनिमिया सारखा रोग बरा होतो.

2) किवी- Kiwi


हे फळ शरीरातील रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यास मदत करते. किवीमध्ये 

विटाॅमिन सी खूप जास्त प्रमाणात आढळते. तसेच किवी या फळामध्ये  

विटाॅमिन ई असते. तसेच पोटेशिअम ची मात्रा अधिक प्रमाणात असते.जे

तुमच्या हाडांचे रक्षण करण्यासाठी अत्यंत उपयोगी आहे. म्हणूनच  डाएट 

मध्ये किवीचा उपयोग करावा. कमीत कमी आठवडयातुन तीनदा तरी किवी 

खावे. 


   


3) संत्री- Orange


संत्र्यामध्ये  विटाॅमिन C भरपूर प्रमाणात असते.जे तुमची रोगप्रतिकारशक्ती  

वाढविण्यास अत्यंत उपयोगी आहे. संत्र्यामध्ये असलेल्या विटामिन C मुळे

जे शरीरातील तणाव हार्मोन्सला पण  कमी करतात.जर शरीरात ताप येतो. 

किंवा कोणत्याही प्रकारचे इन्फेषण झाले असेल तर संत्र्याचे सेवन केले तर 

शरीरातील रोगप्रतिकारशक्ती वाढविता येते. म्हणूनच तुमच्या डाएटमध्ये 

संत्री अवश्य सामील करा आणि रोगमुक्त व्हा. 



4) आंबा-Mango

आंब्याला फळाचा राजा म्हटलेला आहे. आब्यांंमध्ये  प्याकटीन आणि 

फायबर उच्च प्रमाणात असते.जे शरीरात असलेल्या खराब कोलेस्टेरॉलच्या 

स्तराला कमी करते.आब्यांच्या सेवनामुळे  रोगप्रतिकारशक्ती वाढविन्यास    

मदत होते. तसेच ब्लूडप्रेशर आणि Heartbit ला नियंत्रित करण्याचे काम 

करते. म्हणूनच आंब्याला आपल्या डाएट मध्ये सामील करणे अत्यंत 

आवश्यक आहे.






 

5) नाशपती- Pear

नाशपती खायला खूप स्वादिष्ट असते.नाशपती मध्ये विटाॅमिन C जास्त 

प्रमाणात आढळून येते. नाशपतीच्या सालीमध्ये भरपूर  प्रमाणात फायबर 

आणि पोटेशिअम आढळून येते. तसेच यामध्ये Anti-inflammatory गुणधर्म 

आढळून येते.नाशपतीच्या  सेवनामुळे रोगप्रतिकारशक्ती  वाढविण्यास  

मदत होते. म्हणूनच आठवडयातुन दोनदा तरी नाशपतीचे सेवन करणे 

आवशयक आहे.
    

चला तर मग भेटूया एका नवीन विषयासह... लेख आवडल्यास  

SHARE करायला विसरू नका.