स्वस्थ आरोग्यासाठी फळे किवा फळांचा रस पिणे फायद्याचे ठरते.
1) भूक लागण्यासाठी: ज्यांना भूक लागत नाही त्यांनी प्रात:काळी
अनाश्यापोटी लिंबू पाणी प्यावे.तसेच जेवणापूर्वी थोडे आले बारीक करून
सैंधव मीठा बरोरार खावे. असे केल्यास भूक चांगली लागते.
2) रक्तशुद्धी करण्यासाठी: लिंबू, गाजर, बीट, पालक, सफरचंद, तुळस
इत्यादी रसाचे सेवन केल्यास रक्तशुद्धी होते तसेच रक्ताचे प्रमाण देखील
3) दमा: बीट, तुळस, गाजर गोड द्राक्षांचा रस, भाज्याचे सूप, किवा मुगाचे
सूप इत्यादी रसाचे सेवन दमा असणाऱ्या रुग्णांसाठी फायद्याचे ठरते.
4) उच्च रक्तदाब: गाजर, द्राक्ष,मोसंबी व गव्हाच्या अंकुराचा रस इत्यादी
रसाचे सेवन उच्च रक्तदाब असणाऱ्या रुग्णांनी जर या रसाचे सेवन केले
तर उच्च रक्तदाब नॉर्मल होण्यास मदत होते.
5 ) कमी रक्तदाब: गोड फळाचा रस घ्यावा परंतु आबट फळे खावू नये.
द्राक्षे आणि मोसंबीचा रस सुद्धा लाभदायक ठरते.
6) कावीळ: द्राक्षे, सफरचंद, मोसंबी, उसाचा रस, मनुका आणि शेगदाणे
भिजवून त्याचे पाणी इत्यादी रसाचे सेवन कावीळ या रोगात फायद्याचे ठरते.
7 ) चेहऱ्यावर पिंपल्स, डाग कमी करण्यासाठी: गाजर, टरबूज आणि
पालकाच्या रसाचे नियमित सेवन केल्यास चेहऱ्यावरील पिंपल्स, डाग कमी
होण्यास मदत होते.
8) एसिडीटी: गाजर,पालक, काकडीचा रस ,द्राक्षे, मोसंबी, कोणत्याही
फळाच्या रसाचे अधिक प्रमाणात से सेवन करावे.फायदा होतो.
9) कॅन्सर: गव्हाच्या अंकुराचा रस, गाजराचा रस, द्राक्षाचा रस इत्यादी
उपयोगी ठरतो.
10) स्वस्थ त्वचेसाठी: सर्व प्रकारच्या फळाचा रस तसेच नारळ पाणी
उपयोगी ठरते.
11) कोलायटीस: गाजर, पालक व अननसाचा रस इत्यादी 70 % गाजराचा
रस व पालक व अननसाचा रस सम प्रमाणात एकत्र करून पिल्यास फायदा
होतो.
12) अल्सर: द्राक्षे, गाजर इत्यादी फळाचे सेवन फायद्याचे ठरते.
13) सर्दी कफ: आल्याचा रस, तुळशीचा रस, गाजराचा रस, मुगाचे किवा
भाजीचे सूप इत्यादी.
14) दात येणाऱ्या बालकांसाठी:अननसाचा रसात थोडा लिंबाचा रस घालून
दिल्यास दात येताना त्रास होत नाही
15) रक्त वाढीसाठी: मोसंबी, द्राक्षे, पालक, टाेमॅटाे, बीट सफरचंद,
रात्री भिजवलेल्या खजुराचे पाणी सकाळी प्यावे.
16) डोळ्यांच्या तेजवृद्धीसाठी: गाजराचा रस, कोथींबीरीचा रस फायद्याचा
ठरतो.
17) अनिद्रा: द्राक्षे व सफरचंदाचा रसाचे नियमित सेवन केल्यास अनिद्रेचा
त्रास कमी होतो. व झोप चांगली येते.
18) वजन वाढविण्यासाठी: पालक, गाजर, बीट,नारळ द्राक्ष व सफरचंदाचा
रस इत्यादी रसाचे नियमित सेवन केल्यास वजन वाढविण्यास मदत होते.
19) मधुमेहासाठी: गाजर, कारल्याचा रस, पालकाचा रस इत्यादी रसाचे
सेवन केल्यास मधुमेहा कंट्रोल मध्ये राहतो.
20) मुतखडा: मुतखाड्याचा त्रास असलेल्या लोकांनी पालक चे सेवन करू
नये. काकडीचा रस फायद्याचा ठरतो. सफरचंद, गाजर किवा भोपळ्याचा
रस आणि शेवग्याचे सूप लाभदायक ठरते.
21) वजन कमी करण्यासाठी: अननस,टरबूजचा रस, लिंबू पाणी फायद्याचे
ठरते.
22) पायरिया: गव्हाच्या अंकुराचा रस,गाजराचा रस, नारळ पाणी काकडी व
पालकचा रस इत्यादी
23) मुळव्याध: मूळ्याचा रस इत्यादी
डबाबंद फळाच्या रसाचे सेवन टाळावे. बंद डब्यातील रस चुकूनही वापरू
नये.कारण त्यात बेझाॅईक असिड असते.त्याचा सेवनामुळे शरीरावरील
घातक परीणाम होतात. फ्रेश ज्यूसच्या नावाखाली मिळणारे ज्यूस हे कधीही
ताजे नसते.बंद डब्यातील रसाच्या सेवनामुळे आपल्या दातांची वआतड्यांची
हानी करून शेवटी कॅन्सरला जन्म देतात. हा डबाबंद रस सर्व प्रथमफळाना
उकळत्या पाण्यात धुतले जाते. नंतर शिजवले जाते. त्यावरील साली काढल्या
जातात व त्यात साखरेचा पाक ओतला जातो. हा रस ताजा राहावा यासाठी
त्यात विविध रसायने घातली जातात. यात कॅल्शियम, नायट्रेट, एलम व
मग्नेशियम क्लोराईड मिसळले जाते. त्यामुळे आतड्यांना छेद होतो.
किडनीची हानी होते. आणि हिरड्यांना सूज येते.व नवीन आजारांना आमंत्रण
मिळते.म्हणून डब्याबंद रसाचे सेवन करू नये आणि आपले स्वस्थ बिघडवू
नये.नेहमी ताजी फळे, ताज्या फळांचा रस प्यावा.
चला तर भेटूया एका नवीन विषयासह....
0 टिप्पण्या