लाैकीला दुधीभोपळा असेही संबोधले जाते.लाैकीचा उपयोग भाजी, पराठा,
ज्यूस बनविण्यासाठी केला जातो. लाैकीचे सेवन खूप कमी खूप
प्रमाणात केले जाते. कारण बहुतेक लोकांना याची चव आवडत नाही.
परंतु लाैकीमध्ये असे काही गुण असतात कि जे गंभीर आजारांपासून
आपला बचाव करते. यात अनेक प्रकारचे पोषक घटक आढळून
येतात.
लाैकीत प्रामुख्याने प्रोटीन, विटाॅमिन A, विटाॅमिन C, आयरन, मॅगनेशिअम,
झिंक, फायबर, मिनरल्स, सोडीअम, मॅगनिज, थायमिन, रायबोप्लेविन,
कॅल्शिअम, विटाॅमिन बी3, विटाॅमिन बी6 इत्यादि पोषक घटक
असतात. लाैकीच्या सेवनामुळे शरीरातील पोषक घटकांची कमी
दूर होऊन शरीराचे होणाऱ्या रोगांपासून संरक्षण होते.
1) वजन कमी करण्यास उपयोगी
वजन कमी करण्यासाठी लाैकी रामबाण उपाय आहे. लाैकी ज्यूसचे
नियमित सेवन केल्यास वजन कमी करण्यास फायदा होतो.
तसेच लाैकीला उकळवून त्यात मीठ टाकून ते खाल्यास लवकर वजन
कमी होते. लाैकीमध्ये फायबर भरपूर प्रमाणात असल्यामुळे लवकर
भूक लागत नाही व पोट भरून राहते.
2) हृदय स्वस्थ ठेवण्यास मदत
लाैकीच्या ज्यूसाने कोलेस्ट्रोल कंट्रोल मध्ये राहते आणि Heart ब्लाॅकेज
पण दूर होतात. लाैकी ज्यूसाच्या नियमित सेवनामुळे हृदय स्वस्थ
ठेवण्यास मदत होते.
3) त्वचारोगांवर उपयोगी
चेहऱ्यावर जर पिम्पंल्स असतील किंवा कोणताही प्रकारचे त्वचारोग
असतील तर लाैकीचा ज्यूसाचे नियमित सेवन केल्यास त्वचासंंबंधी
विकार कमी होतात. रक्तशुद्ध होते. आणि त्वचेवर नसर्गिक ग्लो येतो.
4) ब्लडप्रेशर कंट्रोलमध्ये राहण्यास मदत
लाैकीचा ज्यूस हा ब्लडप्रेशर साठी रामबाण उपाय आहे. लाैकीचा ज्यूस
हा नियमित पिल्याने ब्लडप्रेशर पूर्णपणे बर होतो.आणि ब्लडसरकूलेशन
सुद्धा चांगले होते.
5) मधुमेहासाठी लाभदायक
मधुमेहाच्या रुग्णांसाठी लाैकीचे सेवन वरदान ठरते. रोज सकाळी
उपाश्यापोटी लाैकीचा ज्यूस पिल्याने शुगर लेवल कंट्रोलमध्ये राहण्यास
मदत होते.
6) हिमोग्लोबिन वाढविन्यास मदत
लाैकीची भाजी किंवा लाैकीच्या ज्यूसचे नियमित सेवन केल्यास
शरीरातील रक्ताचे प्रमाण वाढते.
7) कॅन्सरवर उपयोगी
लाैकीच्या ज्यूसाचे नियमित सेवन केल्यास Prostate कॅन्सर बरा होतो.
8) केसासंबंधी समस्या दूर होतात
लाैकीच्या ज्यूसाचे नियमित सेवन केल्यास केस गळणे, केस तुटणे कमी
होते. व केसांची चांगली वाढ होते.
9) पचनक्रिया सुरळीत होते
लाैकीच्या सेवनामुळे पचना संबंधी समस्या दूर होतात. एसिडीटी कमी
होण्यास मदत होते. आणि पचनक्रिया सुरळीत होते.
लाैकी ज्यूस बनवितांना ही सावधानी बाळगावी
1) लाैकीचा ज्यूस बनवितांना अन्य Vegetables त्यात मिक्स करू नये.
2) लाैकीचा ज्यूस बनवितांना लाैकी आधी टेस्ट करावी जर ती कडू
असेल तर त्या लाैकीचा वापर करू नये कारण यात टेट्रासायक्लिक
असते जे तुम्हाला डिहाइड्रेशन, मळमळ, गॅस सारख्या समस्या देऊ
शकतात.
0 टिप्पण्या