Header Ads Widget

लोणी खा फिट रहा Health Benefits of Butter

                           
                                          



 
आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये अगदी प्राचीन काळापासून लोण्याचा वापर  

करण्यात येतो. कृष्ण सुद्धा लहानपणी  लोणी (माखन) चोरून खात होता. हे 

तुम्ही नक्कीच ऐकलं असेल. कधीतरी आई किंवा आजीला आपण ताक 

घुसळून  लोणी  काढतांना पाहिलं असेल आणि त्या लोण्याचा  एक गोळा 

पोळी, भाकरी किवा पराठा वर घेवून नक्कीच खाल्ला असेल लोणीचे सेवन 

आरोग्यासाठी वरदान समजले जाते. फक्त हिवाळ्यातच नाही तर बाराही 

महिने लोण्याचे सेवन हितकारक ठरते. लोण्याचे सेवन हे केसापासून तर  

नखापर्यंत म्हणजेच संपूर्ण शरीरासाठी  फायद्याचे ठरते. 

लोणीमध्ये भरपूर पोषक तत्व असल्याने ते आपल्या आरोग्यासाठी खूपच

फायदेशीर आहे. अन्य ड्राय फ्रुटच्या तुलनेत लोणीमध्ये जास्त प्रमाणात 

प्रथिने, जीवनसत्वे, लोह आदीचा समावेश आहे. लोण्यात 80 - 85% स्निग्ध 

पदार्थ 16 - 17% पाणी व इतर पोषक घटक असतात.   

   

         लोणीपासून शरीराला मिळणारे फायदे

                                  




1) लोणीमध्ये Anti-aging आणि Anti-oxidants गुण असतात. जे वाढत्या 

वयाच्या प्रभावाला कमी करतात. लोण्याच्या नियमित सेवनाने बऱ्याच          

काळ तरुण दिसण्यास मदत होते. 


2) लोण्यात कॅल्शियम असते जे  हाडे मजबूत करण्यास मदत करतात. 


3) नियमित लोण्याच्या सेवनाने कंबरदुखी, सांधेदुखी, गुडगे दुखी पासून 

आराम  होतो. 


4) लोण्यात प्रथिने भरपूर असल्याने मांसपेशी मजबूत होण्यास मदत होते.


5) लोण्यात उच्च प्रमाणात फायबर आणि कमी प्रमाणात फट असते. 

त्यामुळे लोणी वजन कमी करण्यास सहायक ठरते.


6) यात  फायबर भरपूर प्रमाणात  असल्याने पचनक्रिया सुदृढ      

बनविण्यासाठी लोणी उपयोगी ठरते.


7) चेहऱ्याची सुंदरता वाढविण्यासाठी सुद्धा लोण्याचा उपयोग होतो. लोण्यात 

अर्ध्या चमचा  मध टाकून चेहऱ्याला मसाज केली तर चेहऱ्याची त्वचा 

मुलायम होऊन चेहरा सुंदर होतो.

 

लोणी कसे बनविले जाते?

लोणी बनविणे खूप सोपे आहे. दही चांगले घुसळले तर वरवर जो गोळा येतो  

ते लोणी असते. ताजे लोणी आरोग्यासाठी हितकार असते.   

 












   

                                                     

      

  












                       

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या