Header Ads Widget

साखर खाणे सोडा आणि आजारांना दूर ठेवा

                               



इंग्रज भारतात आले आणि येताना घेवून आले अश्या अनेक वस्तू ज्यांच्यामुळे

भारतीयाचं प्रचंड नुकसान झाले. त्यातील एक वस्तू म्हणजे साखर. 1868 

साली इंग्रजानी भारतात पहिला साखर कारखाना सुरु केला. सुरुवातीला 

लोकांना हि साखर फुकट वाटण्यात आली आणि  लोकांना या साखरेची चव 

इतकी आवडली कि फुकट मिळणारी हि साखर हळूहळू विकत देण्यात येवू 

लागली. आणि या साखरेच्या नियमित वापरामुळे अनेक गंभीर आजार 

होऊ लागले.     


वैज्ञानिक तंत्रज्ञान विकसित होण्यापूर्वी खाद्य पदार्थामध्ये कधीही साखर 

घातली  जात नव्हती. गोड फळे किंवा शर्करायुक्त पदार्था मधील शर्करा 

कमीतकमी रुपांतरीत करून आवश्यक प्रमाणात वापरली जात होती.  

यामुळेच जुनी माणसे दीर्घजीवी व जीवनाच्या अंतिम क्षणापर्यंत कार्यक्षम 

राहत असत.


पांढरी साखर शरीराला कसलेही पोषक तत्व पुरवीत नाही उलट ही साखर  

पचविण्यासाठी शरीराला शक्ती खर्च करावी लागते. तसेच ती शरीरातील      

तत्वाचे शोषण करून महत्वाच्या तत्वांचा नाश करते. साखर इन्सुलिन

तयार करणाऱ्या ग्रंथीवर असा परिणाम करते की त्या ग्रंथीची इन्सुलिन     

बनवण्याची शक्तीच नष्ट होवून जाते.याची निष्पत्ती मधुमेहा सारख्या 

आजारामध्ये होते.

शरीरात उर्जा निर्मितीसाठी कार्बोहायड्रेसमध्ये साखरेचे योगदान सर्वाधिक 

आहे. परंतु याचा अर्थ असा नव्हे की शुद्ध साखरेचाच उपयोग करावा. साखर 

एक संथ व पाढरे विष (Slow &White Poison) आहे. जे लोक गुळ सोडून 

साखर खात आहेत त्यांच्या स्वास्थाचे निरंतर पतन होत आहे. 


एका जपानी डॉक्टरांनी 20 देशामध्ये संशोधन करून असे सांगितले होते 

की, दक्षिण आफ्रिकेतील ह्ब्शी लोकांमध्ये व मसाईव सुबरु  जातीच्या 

लोकामध्ये हृदयविकाराचे नामोनिशाणही नाही कारण ते लोक साखर 

अजिबात खात नाही.  

लहान मुलांना पेपरमिंटच्या गोळ्या, चाकलेट इत्यादी शर्करायुक्त पदार्था 

पासून ठेवण्याचा सल्ला दिला जातो. अमेरिकेतील 98% मुलांना दाताचे रोग  

आहेत व याला साखर व साखरेपासून बनविलेले पदार्थ जबाबदार मानले 

जातात.             

 

ब्रिटनचे प्रोफेसर जॉन युडकीन साखरेला पांढरे विष असे संबोधतात. त्यांनी

हे सिद्ध केले आहे कि शारीरिक दृष्ट्या साखरेची काहीही आवश्यकता 

नाही. दुध, धान्य   फळे, फळभाज्या यांचे मनुष्य जेवढे सेवन करतो. त्यातून 

शरीराला आवश्यक तेवढ्या प्रमाणात साखरेचा पुरवठा होतो. बहुसंख्य

 लोक असे मानतात कि साखरेने त्वरित शक्ती येते. 

         

परंतु ही भ्रामक कल्पना आहे. साखरेत फक्त गोडी आहे व जीवनसत्वाच्या 

दृष्टीने तर हा केवळ कचराच आहे. शुद्धीकरण प्रक्रीयेमुळे साखरेत 

कसल्याही प्रकारची खनिजे, जीवनसत्वे किवा ऐन्झाईम्स शिल्लक राहत 

नाही. यामुळेच साखरेचे निरंतर सेवन केल्याने अनेक प्रकारचे आजार 

निर्माण होतात.पांढरी साखर चमकदार बनविण्याच्या प्रकियेत चुना, 

कार्बन डायआक्साईड, कॅल्शियम, फाॅस्फेट फाॅस्फारिक ऍसिड, 

अल्ट्रामरीन ब्ल्यू वापरले जाते. साखर इतकी गरम केली जाते कि 

त्यातील प्रोटीन्स नष्ट्  होतात.


साखर किवा गोड पदार्थ अधिक प्रमाणात खाल्याने शरीरातील कॅल्शियम व 

फास्फरस याचे संतुलन बिघडते. जे साधारणपणे 5:2 अश्या प्रमाणात 

असते. साखर पचविण्यासाठी शरीरात कॅल्शियमची आवश्यकता असते व 

कॅल्शियमच्या कमतरतेमुळे  अनेक रोग होण्याची शक्यता वाढते.         


साखरेपासून शरीराला होणारे नुकसान 


1) साखर खाल्याने रक्तातील कोलेस्ट्रोलचे प्रमाण वाढते. यामुळे 

रक्तवाहिन्यांच्या  भिंती जाड होऊ लागतात. परिणामी रक्तदाब व हृदय 

विकार यासारख्या तक्रारी निर्माण होतात.

 

2) अति प्रमाणात साखर खाल्याने हायपोग्लूकेमिया नावाचा रोग होतो 

यामुळे खोटी भूक लागते, दुर्बलता जाणवते. 


3) साखरेचे पचन होत असताना आम्ल  एसिड उत्पन होते.त्यामुळे जठरात 

व लहान आतड्यांमध्ये एक प्रकारची जळजळ होते.कुंटलेले पदार्थ 

20%  अधिक प्रमाणात  ऍसिडीटी निर्माण करतात.

 

4) साखर खाणाऱ्या बालकांच्या दातांमध्ये एसिड व बॅक्टेरिया उत्पन  होऊन

दातांची हानी करतात. 


5) त्वचेचे  सर्व प्रकारचे रोग साखरेच्या अति सेवनामुळे होते.



6) साखर अधिक प्रमाणात खाल्याने शरीरातील पचनक्रियेत बी-काम्पलेक्स,

विटाॅमिनचे प्रमाण कमी होऊ लागते. यामुळे अपचन, अजीर्ण यासारखे 

आजार होतात.


7) अधिक प्रमाणात साखर खाल्याने यकृतातील ग्लायकोजेनचे प्रमाण 

कमी होते यामुळे थकवा,गोंधळून जाणे, डोके दुखणे, दमा, डायबेटीज 

इत्यादी आजार होतात. 


8) साखर अधिक प्रमाणात सेवन केल्याने प्रमेह, मूत्रविकार प्रदररोग 

निर्माण होतात. 


9) हृदय विकारासाठी चरबी एवढीच साखर जबाबदार आहे.काफी 

पिणाऱ्या लोकांसाठी काफी इतकी हानिकारक नाही जितकी त्यात असणारी 

साखर हानिकारक आहे.    

  

चला तर भेटूया एका नवीन विषयासह....लेख 

आवडल्यास LIKE करा आणि SHARE करायला 

विसरू नका.     





















     







      

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या