Header Ads Widget

रोज एक चमच मध खाल्याने शरीराला होतील हे फायदे

                         



मध हे पंचामृतापैकी एक अमृत आहे. आयुर्वेदातील अधिकांश  औषधांसाठी 

मध हे श्रेष्ठ अनुमान आहे. मधात नैसर्गिकरित्या भरपूर प्रमाणात साखर

असते.  मध हे हजारो वर्ष खराब होत नाही.मध हे दिर्घ आयुष प्रदान 

करते. दुर्बलता दूर  करून शक्ती वाढविणारी मधासारखी गुणकारी वस्तू 

संपूर्ण विश्वात अन्य  कोणतीही नाही. मधामध्ये प्रामुख्याने  विटाॅमिन 

A, विटाॅमिन B, विटाॅमिन लोह, कॅल्शियम, प्रथिने, मग्नेशियम, फाॅस्फरस, 

पोटॅशियम, सोडियम, आयोडीन इत्यादी गुणकारी घटक आहेत. मध 

चवीलाच गोड असतो असे नाही तर आरोग्यासाठीही मध गुणकारी आहे. 

कार्बोहायड्रेटचा हा एक नैसर्गिक स्त्रोत आहे. त्यामुळे  मधाचे सेवन केल्यास 

शरीराला शक्ती, स्फूर्ती आणि उर्जा मिळते. रोगाशी लढण्याची शक्तीही

शरीराला मिळते. मध दाटसर असतो. त्यामुळे तो पटकन वाहून जात नाही 

हे त्याचे वैशिष्ट्य आहे. मधामध्ये असलेल्या प्रथिनांच्या प्रमाणावरही  मधाचा 

दाटपणा अवलंबून असतो. ज्या मधामध्ये प्रथिनाचे प्रमाण अधिक असते तो 

मध जास्त घट्टअसतो.

प्राचीन काळापासून मध हा जीवाणूविरोधी  असल्याचे मानले जाते. मध हा 

हायपरस्माॅटिक एजंट आहे जो इजा झाल्यास त्यातील तरल पदार्थ काढून 

टाकतो.आणि जखम लवकर भरण्यास मदत करतो.तसेच त्यातील 

हानीकारक जीवाणुही  नष्ट् होतात. आयुर्वेदाच्या मते, विविध ठिकाणी 

लागणाऱ्या मधाच्या पोळ्यांतील मधाचे गुण वेगवेगळे असतात.जसे, 

कडूनिंबावरील पोळ्याचा मध डोळ्यांसाठी चांगला, जांभळावर असणाऱ्या 

पोळ्याचा मध मधुमेहासाठी, तर शेवग्यावर लागलेल्या पोळ्याचा मध 

हृदयविकार, तसेच रक्तदाबासाठी चांगला असतो. त्याव्यतिरिक्त मध अनेक 

आजार दूर करण्यासाठी घरगुती उपाय म्हणूनही वापरला जातो.

मधापासून मिळणारे फायदे 

                                        

1) हिमोग्लोबिन वाढते


मध हिमोग्लोबिन वाढविण्यासाठी मदत करतो. मधाचे नियमित सेवन 

केल्याने रक्त शुद्ध होते आणि अनिमिया दूर होण्यास मदत होते. त्यात B 

जीवनसत्व, C जीवनसत्व त्याचबरोबर Antioxidants घटकही असतात. 

त्यामुळे रोगप्रतिबंधक क्षमता वाढण्यास मदत होते.

2) कॅन्सरवर उपयोगी 


मधामध्ये Antioxidants घटक आढळतात. त्यामुळे ट्यूमरची निर्मिती 

रोखली जाते. कॅन्सरचा धोका कमी होतो. नियमित मधाचे सेवन केल्यास  

पोटाचा कॅन्सर होत नाही.
 

3) लहान मुलाच्या विकासासाठी


बालकांना जन्मत:च देता येईल असा एकमात्र  आहार म्हणजे मध होय. मध 

हे लहान मुलाच्या विकासामध्ये खूप उपयोगी आहे. बाळाला सुरुवातीचे 

नऊ महिने मध दिल्यास छातीचे रोग कधीही होत नाही.

4) भूक वाढते 


मधामुळे मंदाग्नी दूर होऊन भूक लागते. उपाश्यापोटी मध घेतल्यास भूक 

वाढते.

5) सशक्त हृदयासाठी


मध हृदयाच्या मजबुतीसाठी उपयुक्त असतो. हृदय मजबूत करण्यासाठी, 

हृदयाचे कार्य नीट सुरु राहण्यासाठी आणि हृदयासंबंधी रोगांपासून बचाव 

करण्यासाठी प्रतिदिन एक चमचा मध जरूर सेवन करावे.

6) झोप चांगली येते


रात्री एक चमचा मध पाण्याबरोबर घेतल्याने झोप चांगली लागते.

7) साैन्दार्यासाठी

 
मध हे शरीराचा वर्ण उजळण्यासाठी, त्वचा मुलायम बनविण्यासाठी खूप 

उपयोगी ठरते. मधाने चेहऱ्याची मालिश केल्यास त्वचा सुंदर, आकर्षक, 

मुलायम होते.

8) भाजल्यास फायदेशीर

 
मधामध्ये ऍन्टीसेप्टिक, जीवाणूविरोधी, ऍन्टीमायक्रोबियल गुण असतात. 

त्यामुळेच कापले, जळले, जखम झाल्यास त्याजागी मध लावला जातो. मध 

लावल्यास भाजल्याचे व्रणही निघुन जाण्यास मदत होते.

9) तोंडात फोड किवा तोंड येणे


पाण्यात मध मिसळून गुळण्या केल्यास तोंड येण्याची समस्या बरी होते.फोड 

बरा होतो.

10) दातदुखीवर प्रभावी


मधामुळे दातातील वेदना कमी होण्यास मदत होते. दात दुखत असल्यास 

कापूस मधात बुडवून तो दुखणार्या दातावर ठेवावा त्यामुळे वेदना कमी 

होतात.

11) डोळ्यांसाठी फायदेशीर

 
औषधी गुणांनीयुक्त मध अनेक विकार दूर करण्यासाठी वापरता येतो. मध 

सेवन केल्यास डोळ्यांची क्षमता वाढते.डोळ्यांचे आरोग्य सुधारते. आणि 

होणारे डोळ्यांचे विकार दूर ठेवता येतात. 

12) वजन कमी होते 


रोज सकाळी उपाश्यापोटी लिंबू पाण्यात थोडे मध टाकून घेतल्यास  लवकर 

वजन कमी होण्यास मदत होते.

13) खोकला कमी होतो


अद्रकचा रस आणि मध मिक्स करून घेतल्यास खोकला कमी होण्यास 

मदत होते.  
          
चला तर भेटूया एका नवीन विषयासह....

लेख आवडल्यास LIKE करा आणि SHARE करायला विसरू नका.     

                 

















        
             
   


























 




           

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या