Header Ads Widget

रोज एक चमचा तीळ खाल्याने शरीराला होतील हे मौल्यवान फायदे


                                             

आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये तिळाला अत्यंत महत्व आहे.मकरसंक्रांतीच्या 

दिवशी तीळ आणि गुळ घालून लाडू केला जातो. तीळ हे उष्ण प्रकृतीचे

असून हिवाळ्यात याचे सेवन आरोग्यासाठी हितकारक ठरते. या तीळापासून 

लाडू, चटनी केली जाते. हल्लीच्या काळात या तिळाचे महत्व फार कमी होत

चालले आहे. या तिळामध्ये अनेक औषधी गुणधर्म दिसून येतात.तीळ हे दोन

प्रकारचे असतात. एक म्हणजे पांढरे तीळ आणि दुसरे म्हणजे काळे तीळ.  

या तिळाला इंंग्रजीमध्ये Sesame seeds असे म्हटले जाते. केवळ हिवाळ्यात 

च नाही तर वर्षभर ही तुम्ही या तिळाचे सेवन करू शकता. शरीरात ताकद, 

बल, उर्जा वाढविण्याचे काम हे तीळ करते.     

या तिळामध्ये कॅल्शियम खूप मोठ्या प्रमाणात असते. तसेच फाॅस्फोरस, 

सेलेनियम, ब गटातील जीवनसत्वे, लोह, तंतुमय पदार्थ, झिंक इत्यादी पोषक 

घटक सुद्धा दिसून येतात.


चला तर मग जाणून घेवूया तीळ खाण्याचे मैाल्यवान फायदे 

1) तीळ हे कफनाशक असतात. जर तुम्हाला मोठ्या प्रमाणात कफ झालेले 

असेल तर या तिळाचे सेवन अवश्य करावे.  खाताना ते भाजून खावे व 

त्यासोबत गुळ खावे.


2) या तिळामध्ये Amino acid आणि प्रोटीन विपुल प्रमाणात असतात.जे 

आपल्या हाडांना मजबुती प्रदान करतात. तीळ खाण्याचा सर्वात मोठा 

फायदा हा आहे की आपली हाडे मजबूत बनतात. केवळ आपली हाडेच 

नाही तर आपले मांंसपेशी सुद्धा या तीळाच्या सेवनाने मजबूत बनतात. 


3) या तिळाच्या तेलाचा उपयोग तुम्ही स्वयंपाक घरातील पदार्थ 

बनविण्यासाठी करू शकतात. याचा वापर केल्याने यातील पोष्टिक घटक 

शरीराला मिळतात.

 

4) ज्यांचे वजन वाढलेले आहे. ज्यांना भूक खूप जास्त लागते. अश्या वेळेस 

तुम्ही जर या तिळाचे सेवन केले तर भूक लागणे कमी होईल. याचे कारण 

म्हणजे या तिळामध्ये तंतुमय पदार्थ , फायबर मोठ्या प्रमाणात असतात. जे 

आपली भूक कमी करतात. म्हणून वजन कमी करायचे असल्यास या 

तिळाचे  सेवन नक्की करायला हवे. 


5) तीळ तेल व सुंठ एकत्र करून या तेलाने मालिश केल्यास सांधेदुखी कमी 

होते. या तेलाचा वापर वेदनाशामक म्हणून करता येतो.


6) ज्यांना वारंवार लघवीला लागते किवा खूप कमी वेळा लघवी येते. जास्त 

लघवी येत नाही. अश्या कोणत्याही प्रकारचे मूत्र विकार दूर करण्यासाठी 

तिळाचा उपयोग होतो.


7) किडनी स्टोन दूर करण्यासाठी तिळाच्या रोपट्याची पाने उपयोगी 

ठरतात. 


8) केसांची चांंगली वाढ व्हावी यासाठी तिळाच्या तेलाने केसांची मालिश 

करावी. असे केल्यास केस अधिक मजबूत, काळे व सुंदर बनतात. 


9) महिलांना मासिकधर्म विषयी काही समस्या असतील मासिकधर्म वेळेवर 

येत नसेल तर त्या समस्या दूर करण्यासाठी या तिळाचे सेवन करायला हवे.


10) तीळ हे वेदनाशामक असतात शक्तिवर्धक असतात. थकवा व कमजोरी 

दूर करण्यासाठी याचा उपयोग होतो.

 

11) हाडांंचे दुखणे, संधिवात, अर्थराईटीस यासारखे आजार तिळाचे सेवनाने 

दूर होतात.

  

12) तिळाच्या सेवनाने रक्तातील कोलेस्ट्रोल सुद्धा कमी होतो.

 

13) फॅटी एसिड युक्त असलेले हे तीळ आपले हृदय निरोगी ठेवतात. 


14) या तिळामध्ये सेस मी नावाचा Antioxidants असतो कि जो कॅन्सरच्या 

पेशीची वाढ रोखतो. म्हणून भविष्यात कॅन्सर होऊ नये असे वाटत असेल 

तर तिळाचे सेवन करावे. 


15) तीळ खाल्याने तानतणाव स्ट्रेस कमी होतो. 


16) तिळाच्या तेलाने मसाज केल्याने मासंपेशी  मजबूत बनतात.

 

17) तिळाच्या तेलामध्ये कडूलिंबाची पाने टाकून चांगली उकळवा व हे तेल 

त्वचेवर लावावे. असे केल्यास अनेक प्रकारच्या स्कीन प्राॅब्लेम दूर होतात.


18) अनेकांची त्वचा कोरडी असते. अश्या वेळेस आहारात तिळाचा 

समावेश करावा त्वचेचा कोरडेपणा दूर होऊन त्वचेचा पोत सुधारतो.


19) बाळंत स्त्रीला पुरेसे दुध येत नसल्यास तिला दुधात तीळ घालून ते 

प्यायला द्यावे. त्यामुळे पुरेसे दुध येण्यास मदत होते. 


20) दाताच्या बळकटीसाठी व मजबुतीसाठी तिळाचा चांगला उपयोग होतो. 


21) ज्यांना पोट साफ होत नाही त्यांनी या तिळाचे सेवन करावे पोट साफ 

होण्यास मदत होते.  


22) रोज सकाळी दोन चमचे तीळ हे चांगले चावून खावे. असे केल्याने 

आपल्या शरीरात प्रचंड प्रमाणात उर्जा निर्माण होते.


23) या तीळामध्ये लोह आणि कॉपर हे घटक सुद्धा आहे जे आपल्या 

शरीरातील लोहाचे अभिशोषण करण्यास मदत करतात.


24) या तिळामध्ये Antioxidants भरपूर प्रमाणात असतात. जे फ्री रॅडीकल्स 

ला रोखतात. जसेजसे वय वाढत जाते तसतसे आपण म्हातारे दिसू लागतो.

म्हणून वय कमी दिसण्यासाठी हे Antioxidants आपल्या पोटात जायला 

हवे. तिळाच्या सेवनाने वाढत्या वयाचा प्रभा कमी करतात.


25) चेहऱ्यावर सुरकुत्या, रिंकल्स पडू नये किवा पडल्या असतील तर त्या 

जाण्यासाठी दररोज तिळाचे सेवन करायला हवे. 


तीळ कसे कधी कोणी खावे?

कोणत्याही वयोगटातील व्यक्तीसाठी या तिळाचे सेवन हितकारक ठरते. 

सकाळी उठल्यावर एक ग्लास कोमट पाणी प्यावे व 15 मिनिटांनी नंतर एक 

ते दोन चमचे तीळ चावून खावे. 

तिळाची चटणी करून त्याचा उपयोग आपल्या रोजच्या आहारात करा. 


तिळाचे सेवन कोणी करू नये?

ज्यांना उष्णतेचा त्रास आहे त्यांनी तीळ खावू नये आणि खायचे असल्यास 

कमी प्रमाणात खावे.       

      

   

   



           

  











                

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या