Header Ads Widget

नारळ पाणी पिण्याचे आरोग्यदायी फायदे

     नियमित नारळ पाणी पिण्याचे नऊ फायदे         

                                                            



नारळ पाण्याला एक परफेक्ट हेंल्थ ड्रिंक असे सुद्धा म्हटले जाते.
नारळ पाणी हे चविला गोड असले तरीही यात नैसर्गिक साखरेचे प्रमाण
आढळते.आपल्याकडे अशक्त किंवा आजारी व्यक्तीला नारळ पाणी 
आवर्जून दिले जाते.नारळ पाणी पिल्याने शरीरास उर्जा मिळते आणि
रोगप्रतिकारशक्ती वाढन्यास मदत होते. नारळ पाण्यामध्ये  मॅग्नेशियम,   
सोडियम, पोटॅशियम,फाॅस्फारस,कॅल्शियम,फायबर,कार्ब,प्रथिने, व्हिटॅमिन 
सी, मॅंगनीज, निजं  इत्यादी  पोषक घटक आढळून येतात.  

      

नारळ पाण्यात असलेले पोषक घटक 

पोटॅशियम - 295

मॅग्नेशियम – 15 टक्के

सोडियम – 11.5 टक्के

प्रथिने –     2 ग्रॅम

मॅंगनीज -   17 टक्के

व्हिटॅमिन सी – 10 टक्के

फायबर –      3 ग्रॅम

कॅल्शियम –   6.5 टक्के

 कार्ब –         9 ग्रॅम


नारळ पाण्याचे फायदे 

महत्वाचे मुद्दे

1) वजन कमी करण्यासाठी 

2) थाॅयराईड संतुलित ठेवण्यासाठी 

3) रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यास फायदेशीर 

4) किडनीचे आरोग्य चांगले राहण्यास मदत 

5) त्वचेसाठी फायदेशीर 

6) पोटाच्या समस्येवर उपयोगी

7) रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत 

8) स्वस्थ हृदयासाठी 

9) शरीरातील पाण्याचे प्रमाण संतुलित ठेवते   


1) वजन कमी करण्यासाठी 

वजन कमी करण्यासाठी नारळ पाणी हा चांगला स्त्रोत आहे. जी व्यक्ती 

वाढलेल्या वजनामुळे त्रस्त आहे आणि ज्यांना वजन कमी करायचे आहे 

त्यांच्यासाठी नारळ पाणी वरदान ठरते.सकाळी व्यायाम केल्यानंतर नारळ 

पाणी पिल्यास वजन कमी होते. कारण यात खूप कमी प्रमाणात कॅलरीज 

असतात.यात अनेक प्रकारचे एझायम्स असतात.नारळ पाणी पिल्याने पोट 

भरून राहते. म्हणून भूक लागत नाही व अन्न कमी खाल्या जाते.परिणामी 

वजन कमी होते.

2) थाॅयराईड संतुलित ठेवण्यासाठी 

थाॅयराईडच्या हार्मोन्स संतुलित राखण्यासाठी नारळ पाणी अतिशय 

उपयुक्त ठरते. ज्यांना थाॅयराईड होण्याची भीती असते. किवा  थाॅयराईड 

होण्याची शक्यता जाणवते अश्या लोकांनी आपल्या आहारात नारळ 

पाण्याचा समावेश करणे गरजेचे आहे.

 3) रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यास फायदेशीर

रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी नारळ पाणी अतिशय उपयुक्त असते. 

त्यामुळे नियमित नारळ पाणी पिल्यामुळे विविध आजारापासून आपला      

बचाव होण्यास मदत होते.

 4) किडनीचे आरोग्य चांगले राहण्यास मदत 

किडनीचे आरोग्य चागले राहण्यासाठी नारळ पाणी पीणे फायद्याचे ठरते.

ज्यांना मुतखडयाचा त्रास आहे त्यानी नारळ पाणी पिल्यास मुतखडयाचा 

त्रास कमी होतो.

5) त्वचेसाठी फायदेशीर 

नारळ पाणी पिल्याने स्कीनचे सेल्स हायड्रेट होते. नारळ पाण्यामध्ये खूप 

जास्त प्रमाणात ऍझाईम्स, व्हिटॅमिन, मिनरल्स, Anti-oxidants, Amino 

acid असतात.जे त्वचेसाठी खूप फायदेशीर असते. नियमित नारळ पाणी 

पिल्याने आपली त्वचा टवटवीत होते. आणि चेहऱ्यावर नैसर्गिक ग्लो येण्यास 

मदत होते.

 6) पोटाच्या समस्येवर उपयोगी 

नारळ पाण्यामध्ये असलेले फायबर डायजेशन चांगले ठेवण्यास मदत 

करते. नारळ पाणी पिल्याने  कब्ज, एसिडीटी या सारख्या समस्या पासून 

सुटका होण्यास मदत होते.

7) रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत 

नारळ पाण्यात मॅग्नेशियम, सोडियम, पोटॅशियम,व्हिटॅमिन सी, फाॅस्फारस 

या सारखे पोषक घटक असतात त्यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहण्यास 

मदत होते.

8) स्वस्थ हृदयासाठी 

स्वस्थ हृदयासाठी नारळ पाणी पिणे फायद्याचे ठरते. एक कप नारळ 

पाण्यात २९५  मिली ग्रॅम पोटॅशियम असते. हृदयांच्या  ठोकयांच्या 

नियमांसाठी पोटॅशियम, खनिजे गरजेचे असते आणि हे खनिजे नारळ 

पाण्यातून मिळत असते. नियमित नारळ पाणी पिल्यास हृदय स्वस्थ 

राहण्यास मदत होते.

9) शरीरातील पाण्याचे प्रमाण संतुलित ठेवते

उन्हाळ्यात शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते.अश्या वेळेस नारळ पाणी 

पिणे फायद्याचे ठरते. हे शरीरातील ग्लूकोजची पातळी चांगली ठेवते. 

नारळ पाणी हे सलाईनचे काम करते.पाण्याची कमी भरून काढण्याचे 

काम हे नारळ पाणी करते.

नारळ पाणी पिण्याची योग्य वेळ कोणती 

दिवसातून  कधीही नारळ पाणी येते पण तज्ञाच्या मते नारळ पाणी हे 

सकाळी पिणे सर्वात चांगले मानले जाते.  नारळ पाणी पिल्याने शरीरात 

स्फूर्ती,एनर्जी येते.    

चला तर भेटूया एका नवीन विषयासह....लेख आवडल्यास LIKE करा 

आणि SHARE करायला विसरू नका.     
                                    

            

    

   




   





 

 


































टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या