Header Ads Widget

नाशपत्ती

                                                           

नाशपत्तीला इंग्रजीमध्ये (pear) असे म्हटल्या जाते. दिसायला हिरवेगार 

आणि चवीला आबंटगोड असणारे फळ म्हणजे नाशपत्ती.नाशपत्ती एक 

मोसमी फळ आहे. भारतात नाशपत्तीचं सेवन खूप कमी प्रमाणात सेवन 

केल्या जाते. स्वस्थ किमतीत मिळणाऱ्या या नाशपत्ती पासून शरीराला अनेक 

आरोग्यदायी  फायदे होतात. यात प्रामुख्याने विटाॅमिन C भरपूर प्रमाणात 

आढळते. 100 ग्रॅम नाशपत्तीचे सेवन केले तर त्यातून आपल्याला 57 इतकी 

कॅलरीज मिळते. 


नाशपत्तीमध्ये असणारे पोषक घटक

सोडियम

पोटेशिअम

मिनरल 

विटाॅमिन C 

कार्बोहायड्रेटस 15 ग्रॅम

फायबर 3.1ग्रॅम

नाशपत्तीच्या सेवनाने शरीराला मिळणारे फायदे 

1)नाशपत्तीमध्ये विटाॅमिन C आणि Antioxidants खूप जास्त प्रमाणात 

असते. याच्या सेवनाने रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते. व विविध 

आजारापासून आपला बचाव होतो.  

2) हाडाचे आजार असल्यास जसे, वातरोग, सांधेदुखी असेल तर नाशपत्तीचे 

सेवन केल्यास फायदेशीर ठरते. यात बेराॅन नावाच रासायनिक तत्व असते 

जे कॅल्शियमची लेव्हल वाढविण्यास मदत करते. 

3) नाशपत्तीमध्ये असे काही घटक असतात.  जे खराब कोलेस्ट्रोल कमी 

करण्यास मदत करतात. खराब कोलेस्ट्रोलमुळे अनेक आजार होण्याची 

शक्यता असते.  

4) वजन कमी करण्यासाठी नाशपत्ती एक चांगला स्त्रोत आहे. ज्यांना वजन 

कमी करायचे आहे त्यांनी जास्तीत जास्त नाशपात्तीचे सेवन करावे. लवकर 

वजन कमी करण्यास मदत होते. 

5) नाशपत्तीमध्ये फायबर असल्याने पचनशक्ती मजबूत बनविण्यास फायदा 

होतो. यामध्ये असणारे paktin  तत्व कब्ज, असिडीटीसाठी रामबाण उपाय 

आहे. 

 6) नाशपत्तीमध्ये आयरन असते जे आपल्या शरीरातील रक्ताचे प्रमाण 

वाढविण्यास मदत करते. जी व्यक्ती अनिमियाया आजारांनी ग्रस्त असेल तर 

त्यांनी नियमित नाशपत्तीचे सेवन करायला हवे. शरीरात रक्ताचे प्रमाण वाढून 

अनिमिया दूर होतो.        








       

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या