नमस्कार मित्रांंनो,
पपई खाल्याने शरीराला होतील हे फायदे वाचा
आजच्या लेखात
पपई खाण्याचे अनेक फायदे शरीराला होतात.पपई हि चवीला गोड असून
अनेक पोषक तत्वांनी युक्त असते. पपई हे असे फळ आहे जे सगळीकडे
सहजरित्या उपलब्द होते. पिकलेल्या पपईमध्ये खूप जास्त पोषक तत्व
आणि विटाॅमिन आढळून येते.पपई मध्ये मोठ्या प्रमाणात खनिजे,
मॅगनेशिअम, विटाॅमिन A, कॅल्शियम, विटाॅमिन B3, विटाॅमिन B1, विटाॅमिन
E, विटाॅमिन C, पोटॅशिअम, विटाॅमिन K इत्यादी पोषकतत्व असतात तसेच
पपई हा फायबरचा चांगला स्रोत आहे यामध्ये अनेक प्रकारचे
Antioxidants उपलब्ध असतात.
1) पपई हि हृदयरोगांवर खूप फायदेशीर आहे. पपईमध्ये फायबर,विटाॅमिन
C आणि Anti-oxidants असतात ज्यामुळे रक्तात कोलेस्ट्रोल जमा होत
नाही आणि हृदयासंबंधी आजार होण्याची शक्यता कमी होते.
2) पपई मध्ये अनेक प्रकारचे ऐझायेम्स असतात त्यामुळे आपली पचनक्रिया
चांगली होण्यास मदत होते व पोटाच्या समस्या दूर ठेवता येतात.
3) पपईच्या सेवनाने शरीराला विटाॅमिन C मिळते ज्यामुळे आपली
रोगप्रतिकारशक्ती वाढते तसेच अनेक आजारांपासून आपला बचाव होतो.
4) पपईमध्ये मोठ्या प्रमाणात विटाॅमिन A असते आणि विटाॅमिन A आपल्या
डोळ्यांचे आरोग्य निरोगी राखण्यास मदत करते.
5) सूर्यकिरणांमुळे त्वचेवर सुरकुत्या, डोकेदुखी, थकवा, स्मरणशक्ती कमी
होणे, सांधेदुखी, मांंसपेशीमध्ये वेदना, सफेद केस यासारखे दुषप्रभाव
पडतात. पपईमध्ये असलेले Anti-oxidants या हानिकारक सूर्य किरणांच्या
नुकसानापासून आपला बचाव करते.
6) कावीळ झाला असेल तर पपईचे सेवन करावे असे केल्यास लवकर
कावीळ बरा होण्यास मदत होते.
7) पपईमध्ये विटाॅमिन C, विटाॅमिन E, बीटाॅक्यूरोटीन यासारखे Anti-
oxidants असतात त्यामुळे चेहऱ्यावर चमक येते आणि त्वचेवरील सुरकुत्या
कमी होतात.
8) रोज पपई खाल्याने आपल्या शरीरातील मेटाॅबोलिझम ठीक राहतो.
9) पपईमध्ये उपलब्द असलेले कॅरोटीन फुफ्फुस, तोंडाचा कॅन्सर यासारख्या
कॅन्सरपासून आपला बचाव करते.
10) पपई मध्ये अनेक प्रकरचे अमिनो एसिडस् आणि ऐझायेम्स
असतात ज्यामुळे हिरड्यांतील असणरी सूज व जळजळ कमी होते.
11) पपई हि पुरळ, खाज आणि तोंडातील फोड घालविण्यासाठी मदत
करते.
12) पपई मध्ये विटाॅमिन C आणि फायबरचे प्रमाण अधिक असल्याने रक्त
वाहिन्यांमध्ये कोलेस्ट्रोल साचुन राहण्यापासून बचाव होतो म्हणून शरीरातील
कोलेस्ट्रोल पपई हे कमी करते.
१३) एका मध्यम आकाराच्या पपई मध्ये 120 कॅलरीज असतात म्हणून ज्यांना
वजन कमी करायचे आहे त्यांनी नियमित पपईचं सेवन करावे.
14) पपई ही चवीला गोड असली तरीही रक्तातील साखर वाढत नाही म्हणून
मधुमेहाच्या रुग्णांसाठी पपईचे सेवन गुणकारी ठरते.
15) पपई मध्ये विटाॅमिन C तसेच वेदनाशामक गुणधर्म असल्याने सांधेदुखी
पासून आराम मिळतो म्हणून सांधेदुखीचा त्रास असणाऱ्यांनी नियमित पपई
चे सेवन करावे.
16) एक प्लट पपई चे काप खाल्याने ताणताणाव कमी होण्यास मदत होते.
17) शरीरातील विटाॅमिन C च्या गरजेपेक्षा अधिक २०० पट विटामिन C या
पपईतून मिळते.
18) पपईच्या सेवनाने मासिक पाळीचा त्रास कमी होतो.
पपई कधी खावी?
पपईचे सेवन सकाळी करणे उत्तम मानले जाते कारण सकाळी पपई सेवन
केल्याने दिवसभर Energy राहते.एका व्यक्तीने दिवसातून २०० ग्रॅम पपईचे
सेवन करावे.
पपई खाण्याचे तोटे
1) कच्ची पपई गरोदर महिलांनसाठी खूप धोकादायक आहे पपईच्या
सेवनामुळे गर्भाशयाचे आकुंचन होते व गर्भपात होण्याची शक्यता असते.
2) रक्तदाब असणाऱ्यांनी पपई खावू नये.
3) किडनीस्टोनचा त्रास असणाऱ्यांनी पपई खावू नये कारण पपईमध्ये
विटाॅमिन C भरपूर प्रमाणात असल्यामुळे शरीरातील विटाॅमिन C चे प्रमाण
वाढल्यास किडनी स्टोन होण्याची शक्यता जास्त असते.
आज आपण पपईच्या सेवनांंपासून शरीराला कोणते फायदे होतात
कोणते तोटे होतात ते पहिले.
चला तर मग भेटूया एका नवीन विषयासह... लेख आवडल्यास
SHARE करायला विसरू नका.



0 टिप्पण्या