Header Ads Widget

नारळाच्या तेलाचे शरीरासाठी फायदे / Benefits Of Coconut Oil

                                            


नारळ तेलाचे औषधी गुणधर्म आरोग्य, सौंदर्य, केस निरोगी ठेवन्यास 

मदत करतं. नारळाचे तेल/ Coconut Oil  वापरल्याने केस आणि 

त्वचेचं आरोग्य सुधारतं असे आपण अनेकदा एकतो. सौन्दर्यासाठी 

वापरल्या जाणार्या या जुन्या  गोष्टी आज देखील तेवढ्याच फायद्याच्या 

आहे. नारळ्याच्या तेलाने  केस आणि त्वचेचं आरोग्य तर  सुधारत  

त्याच बरोबर नारळ्याच्या तेलाचे अनेक आरोग्यदायी फायदे दिसून येतात. 

नारळ तेलाच्या उपयोगाने शरीरास खूप जास्त विटाॅमिन सुद्धा मिळतात.   

नारळामध्ये जास्त प्रमाणात लोरिक एसिड असते  असते जे आपल्याला 

विविध संक्रमनांशी लढण्यास सहायक ठरते.उन्हाळ्यात देखील 

नारळाचं तेल लाभदायक असते. 

                                         


चला तर मग पाहूया नारळ तेलाचे शरीरासाठी काय फायदे होतात ते.           


नारळ तेलाचे फायदे

 

1)   त्वचा स्वच्छ होण्यास मदत         

त्वचा स्वच्छ मिळवण्यासाठी नारळ तेल, मध आणि ओट्स मिक्स करून 

हे स्क्रब चेहरयावर लावल्यास त्वचा आतून स्वच्छ होण्यास मदत होते.

2) कोरड्या त्वचेसाठी  उपयोगी 

नारळाचे तेल हे त्वचेला नैसर्गिकरित्या मऊ आणि चमकदार बनवते.सर्व  

प्रकारच्या त्वचेसाठी नारळाचे तेल उपयुक्त मानले जाते. विशेष  करून        

कोरडया त्वचेसाठी नारळाचे तेल वरदान समजले जाते.कोरड्या त्वचेला 

मुलायम करण्याचे काम हे नारळ तेल करते. दररोज 10 मिनिटे नारळाचे 

तेल त्वचेवर लावावे असे केल्यास त्वचेचा कोरडेपणा कमी होऊन त्वचा

मुलायम होते.आणि एक प्रकारचा तजेला त्वचेवर येतो.     



3) स्वस्थ केसांसाठी

नारळ तेल हे केसासाठी वरदान मानले जाते. नारळ तेलाचा उपयोग 

केसांना लांब, मजबूत, घनदाट, चमकदार बनवण्यासाठी केला जातो.

नियमितपणे  केसाची नारळ तेलानी मसाज केल्यास रक्तस्त्राव चांगला 

होतो.आणि योग्य ती पोषकतत्वे सुद्धा केसांना मिळतात.जर केसात कोंडा 

असेल तर तो सुद्धा कमी होतो. केसांचे गळणे थांबुन केसांची चांगली वाढ 

होते. 

4) लहान बाळाची मालिश करण्यासाठी
 

लहान बाळाची त्वचा खूप नाजूक, संवेदनशील असते. अश्या वेळेस नारळ

तेलाने मालिश केल्यास त्वचा स्वस्थ होते. आणि हाडे बळकट होतात.आणि  

योग्य ती पोषकतत्वे शरीरास मिळतात.

                                         

5) फाटलेले होठ

होठ फाटलेले असल्यास नारळ तेलाचा उपयोग केल्यास होठ नरम होतात. 


6) सांधेदुखी कमी करण्यासाठी

सांधेदुखीचा त्रास असल्यास नारळ तेलाने मालिश केल्यास सांधेदुखी  

कमी होते. नारळ्याचे  तेल हे हाडांना  कॅल्शियम आणि मॅग्नेशियम शोषून  

घेण्यास मदत करतात.


7) खाण्यासाठी उत्तम

खाद्यपदार्थ बनवण्यासाठी नारळ तेल हे उत्तम आहे. जर आपण नारळ 

तेलाचा उपयोग रोजच्या वापरात, जेवणात केला तर ते दुसर्या तेलापेक्षा 

सर्वात जास्त  सुरक्षित मानले जाते. 

8) स्ट्रेच मार्क्स हटवण्यासाठी
 

डीलेव्हरी नंतर आलेले स्ट्रेच मार्क्स हटवण्यासाठी नारळ तेल उपयोगी ठरते. 


                                        

9) सुरकुत्यावर नारळ तेल 

नारळ तेलात जरा हळद मिसळून यात दुध मिसळावे  आणि हे त्वचेवर

लावावे. असे  नियमित केल्यास  केल्यास सूरकुत्या कमी होण्यास मदत 

होते.  



10) डीप क्लीजिंगसाठी 

घरी  डीप क्लीजिंग करण्यासाठी आपल्याला नारळ तेल  आणि बेकिंग 

सोडा ची गरज भासते. बेकिंग सोड्यात Anti-bacterial आणि Anti- 

enfemetri गुण आढळतात  हे पोर्सला डीप क्लीन  करतात ब्लॅकहेड 

एक्नेवर फायद्याचे ठरते.
         

       
चला तर भेटूया एका नवीन विषयासह....लेख आवडल्यास LIKE करा 

आणि SHARE करायला विसरू नका.     
                                    

            



 

































टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या