Header Ads Widget

दुधाचे सेवन का आणि कधी कसे कराल?

मनुष्याच्या जन्मानंतर आईचे दुध सर्वश्रेष्ठ ठरते. त्यानंतर शारीरिक 

वाढीसाठी  गाईचे किवा म्हशीचे दुध फायदेशीर ठरते. दुधाला पृथ्वी 

वरील सर्वोत्तम आहार मानल्या जाते. मनुष्याची शक्ती आणि बल

वाढविणारा  दुधासारखा दुसरा कुठलाही श्रेष्ठ पदार्थ नाही. निरोगी 

व्यक्तीपासून ते आजारी व्यक्तीपर्यंत सर्वासाठी दुधाचे सेवन हित 

कारक ठरते. मनुष्याच्या शारीरिक वाढीसाठी दुध पिणे अत्यावश्यक

असते.  


                                                      

स्वस्थ आरोग्यासाठी योग्य व्यायाम करणे खूप आवश्यक असते. तसेच 

संतुलित आहार घेणे गरजेचे असते. त्याचबरोबर तुम्ही दुधाचे सेवन केल्यास 

अनेक पोषक घटक आपल्याला मिळतात. 


दुधामध्ये असलेले पोषक घटक 

सोडियम

प्रोटीन 

कॅल्शियम

विटामिन A 

विटामिन K

विटामिन D

विटामिन बी12

फायबर

पोटेशियम

फास्फोरस

नियासिन

रायबोप्लेविन (B2)

दुधामध्ये अमिनो असिड आणि Antioxidants  भरपूर प्रमाणात 

असते.तसेच कॅल्शियम, विटामिन D आणि प्रोटीनचे  प्रमाण सर्वात जास्त 

असते. 200 मिली ग्रम दुधामध्ये 257 मिली ग्रम कॅल्शियम असते. 

आपल्या शरीराला दिवसाला 1000 ते 1200 कॅल्शियमची गरज पडते. 

दुधापासून मिळणारे फायदे 


1) कॅल्शियमची कमी दूर होते 

शरीरात कॅल्शियमची कमी होऊ नये शरीराला योग्य त्याप्रमाणात कॅल्शियम

मिळावे म्हणून डॉक्टर सुद्धा दुध पिण्याचा सल्ला देतात. तुम्ही जर रोज 

नियमितपणे एक ग्लास दुध पिला तर कॅल्शियमची कमी होणार नाही. 

2) हाडाची  मजबुती 

जसेजसे वय वाढत जाते तसतसे आपल्या हाडाची झीज होत असते. आणि 

कॅल्शियम कमी होत जाते त्याने अनेक हाडांचे आजार होतात. म्हणून 

कॅल्शियमची कमी होवू नये म्हणून डॉक्टर सुद्धा नियमित नियमित दुध 

पिण्याचा सल्ला देतात. रोज एक ग्लास दुध पिल्याने कॅल्शियम मिळेल व 

हाडे सुद्धा मजबूत होतील.     


3) चांगली झोप येते 

ज्यांना काही कारणामुळे जसे ताणतणावामुळे झोप येत नाही अश्या 

व्यक्तींनी नियमित एक ग्लास कोमट दुध पिल्याने झोप चागली येण्यास 

मदत होते. पिप्रोपॉन नावाच अमिनो असिड दुधात आढळते. रात्री दुध 

पिल्याने यातील फट, प्रोटीन मेल हार्मोन्स Active करतात. याने पचनक्षमता 

वाढते. यात मेलाटानिन हार्मोन्स असते. जे चागली झोप येण्यासाठी हे गरजेचे 

असते.  

4) मासपेशींचा विकास होतो 

दुधात भरपूर प्रमाणात प्रोटीन असते. याने मासपेशींचा विकास होण्यासाठी 

मोठा फायदा होतो प्रोटीन आणि फायबर हि दोन्ही महत्वपूर्ण पोषकतत्वे        

मासपेशींच्या विकासासाठी आवश्यक असतात. जे दुधापासून मिळते.
 

5) पोटाची समस्या दूर होते 

जर तुम्हाला पोटाशी सबधित काही आजार असल्यास रोज रात्री एक ग्लास 

गरम दुधाचे सेवन केल्याने पोटाची समस्या दूर होण्यास मदत होते.

दुध हे गाईचे प्यावे कि म्हशीचे? 

दोन्ही दुधामध्ये कॅल्शियमचे प्रमाण चागलेच असते. गाईच्या दुध हे सुद्धा 

लहान मुलापासून मोठ्यापर्यंत सर्वांसाठी फायद्याचे ठरते.परंतु गाईच्या 

दुधापेक्षा म्हशीच्या दुधात कॅलरीज आणि फटच प्रमाण जास्त असते. जे लोक 

हार्डवर्क करतात तसेच जिममध्ये जातात त्यांनी म्हशीच दुध पिणे योग्य आहे. 

दुध पिण्याची योग्य वेळ कोणती?

आपण कोणत्याही वेळेला पिवू शकता 
























 

















टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या