Header Ads Widget

रक्त वाढीसाठी उपाय

 

                                                  



शरीरात जर रक्ताची कमी झाली असेल तर काही लोकांना अशक्त 

पणा  जाणवतो. दम लागतो. सतत थकल्यासारखे वाटते. तसेच 

एनिमिया सारख्या आजार होतो. तुम्हाला पण शरीरात रक्ताची कमी 

आहे असे वाटत असल्यास रक्त वाढीसाठी हे उपाय केले पाहिजेत. 


साधारणपणे नवजात बालक ते वयोवृद्धापर्यंत हिमोग्लोबिनचे प्रमाण 

किती असावे ते पाहूया  

नवजात बालक - 17 ते 22 gm/dL

जन्मापासून एक आठवड्यापर्यंत -15 ते 20 gm/dL

जन्मापासून एक महिन्यापर्यंत - 11 ते 15 gm/dL

18 वर्षापर्यंतची तरुण - तरुणी 11 ते 13 gm/dL

पुरुष - 14 ते 18 gm/dL

महिला 12 ते 16 gm/dL

45 वर्षानतर पुरुषमध्ये - 12.4 ते 14.9 gm/dL

45 वर्षानंतर महिलामध्ये - 11.7 ते 13.8 gm/dL      
  


1) डाळिंब


रक्ताची वाढ करणारा खजिना असे या फळांचे वर्णन केले जाते.कारण

डाळिंबामध्ये लोह जास्त प्रमाणात असते.डाळिंबाच्या नियमित सेवनाने

शरीरातील रक्ताचे प्रमाण वाढते. म्हणून एनिमिया या आजारांसाठी डाळिंब

हे खूप उपयुक्त आहे.म्हणून एनिमिया पेंशटनी रोज डाळिंब खायला 

पाहिजे. 


2) लाैकी


लाैकीची  भाजी  किंवा  लाैकीच्या  ज्यूसचे  नियमित  सेवन  केल्यास

 शरीरातील  रक्ताचे  प्रमाण  वाढते.


3) कारले


कारल्यातील Antibacterial प्राॅपटीज,अल्कालाईड असल्याने आपल्या

शरीरातील रक्तशुद्धीकरण खूप चांगले होते.आणि रक्ताचे प्रमाण सुद्धा

 वाढते.


4) खजूर 


 खजूरामध्ये आयरन मोठ्या प्रमाणात असते.खजूर खाल्याने रक्तातील 

हिमोग्लोबीनचा स्तर सुधारते. खजूर खाल्याने आपल्याला उर्जा मिळते.व 

थकावट व सुस्ती दूर होते. 


5) सफरचंद


सफरचंदामध्ये लोह भरपूर प्रमाणात असल्याने एनिमिया सारखा रोग बरा 

होतो. तसेच सफरचंद खावे किवा रोज एक ग्लास सफरचंदाचा रस प्यावा. 

रक्त वाढण्यास मदत होते.
   

6) बीट 

बीट हे Anemia साठी वरदान आहे. नियमित बीट खाल्याने रक्तातील

हिमोग्लोबीन वाढण्यास मदत होते.नियमित बीट खाल्यास किवा बीटचा रोज 

एक ग्लास रस पिल्यास फायदा होतो.  


7) पालक 

ज्या व्यक्तीनां एनिमिया हा आजार झाला आहे त्यांनी पालकची भाजी

अवश्य  खायला पाहिजे. पालक मध्ये रक्तवर्धक गुणधर्म आहे. पालकच्या

 नियमित सेवनाने रक्त तर वाढतेच आणि रक्त शुद्ध होते.


8) गाजर 


गाजारातील पोषकतत्वामुळे आपलं रक्त शुद्ध होण्यास मदत होते.

रक्ताभिसरण सुधारते.रक्त पण वाढते आणि त्यामुळे आपले आरोग्य

 चांंगले राहण्यास मदत होते. 


9) मेथी


मेथी हि ज्यांना एनिमिया आहे त्यांच्यासाठी  मोलाची उपयोगी ठरते. 

मेथीमध्ये आयरनच प्रमाण खूप जास्त असल्यामुळे ज्यांना एनिमिया आहे.

त्यांच्यासाठी फायद्याची ठरते. मेथी खाल्याने हिमोग्लोबिनचं प्रमाण वाढत 

आणि अशक्तपणा निघून जातो. तसेच मेथी हि रक्त शुद्ध 
करण्यास मदत 

करते. 


10) पिस्ता


पिस्ताचे सेवन केल्याने शरीरातील हिमोग्लोबिन पण वाढते. पिस्ताच्या 

नियमित सेवनाने रक्ताची कमी होत नाही 


11) केळी


ज्यांचे हिमोग्लोबिन कमी आहे त्यांनी नियमित केळीचं सेवन करायला

पाहिजे.केळीच्या सेवनाने हिमोग्लोबिन वाढण्यास मदत होते.


12) चिकू


चिकूमध्ये लोहाचे प्रमाण जास्त असते म्हणून रक्तशुद्धीसाठी आणि रक्त

वाढीसाठी चिकू खाणे फायद्याचे ठरते. 

13) मध

मध हिमोग्लोबिन वाढविण्यासाठी मदत करतो. मधाचे नियमित सेवन 

केल्याने रक्त शुद्ध होते आणि अनिमिया दूर होण्यास मदत होते. 

14) काजू

काजू हा लोहाचा चांगला स्त्रोत आहे काजुमध्ये लोह मोठ्या प्रमाणात असते.  

त्यामुळे ज्यांना रक्ताची जर शरीरात कमी असल्यास काजू खावे.रक्त  

वाढण्यास मदत होते.


15) किसमिस

किसमिसमध्ये आयरन असते जे लाल रक्तकोशिका बनविण्यासाठी

आवश्यक असते. रात्री 10 ते 15 किसमिस भिजत ठेवावे व ते सकाळी  

उपश्यापोटी चावून खावे. व किसमिस चे पाणी पिवून घ्यावे असे केल्यास 

रक्ताचे प्रमाण वाढविण्यास मदत होते.


16) टमाटर 

तुम्ही जर रोज एक टमाटर खात असाल तर आपल्या शरीरात वाहणारे रक्त 

योग्य प्रकारे कार्य करत. कच्चे टमाटर खायला आवडत नसेल तर टमाटरचे 

सूप पिल्याने त्यामुळे आपल्या शरीरातील रक्त संचारण प्रकिया योग्य रीतीने 

चालेल आणि आपल रक्त लाल गडद रंगाचे होईल.आणि रक्ताचे प्रमाण 

वाढते.

 

17) द्राक्षे

 जर तुमच्या शरीरात रक्ताची कमतरता असेल किंवा हिमोग्लोबिन कमी 

असेल तर, एक ग्लास द्राक्षाच्या रसात दोन चमचे मध प्यायल्यास 

अशक्तपणा दूर होतो. याशिवाय तुमचा हिमोग्लोबिनही वाढू लागतो.


18) कडधान्ये

एनिमिया झाला असेल किवा शरीरात रक्ताची कमी झाली असेल तर 

नियमित कडधान्याचे सेवन करावे रक्ताची कमी दूर होऊन एनिमिया दूर 

होतो.आणि रक्त शुद्ध होते.


19) शेंगदाणे

रात्रीच्या वेळी शेगदाणे भिजत टाकावे व ते सकाळी उपश्यापोटी खावे असे 

केल्यास शरीरात रक्त वाढण्यास मदत होते. 


20) गुळ व फुटाणे

नियमित गुळ व फुटणे खाल्यास रक्त वाढण्यास मदत होते. 

 

21) आवळा

आवळ्याच्या रसाचे नियमित सेवन केल्यास शरीरातील रक्त वाढण्यास मदत 

होते.  

   

22) तीळ

या तीळामध्ये लोह आणि कॉपर हे घटक सुद्धा आहे जे आपल्या शरीरातील  

लोहाचे प्रमाण  वाढण्यास मदत करतात.


23) कोथिंबीर 

रक्तवाढीसाठी कोथिंबीरचा चार चमचे रस घेतल्यास रक्त वाढण्यास मदत 

होते. रक्तवाढीसाठी हा एक परफेक्ट आयुर्वेदिक उपाय आहे.


24) कडूलिंबाची कोवळी पाने 

कडूलिंबाची चार ते पाच कोवळी पाने चावून चावून खाल्यास रक्त वाढण्यास 

मदत होते.


        


 







टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या