Header Ads Widget

रोज एक ग्लास मोसंबी ज्यूस पिल्याने शरीराला होतील हे फायदे

                                                             


मोसंबी मधुर आणि रसाळयुक्त असे फळआहे. मोसंबी रुचकर, त्रिशाहारक,

स्फ्रुतीदायक आहे. मोसंबीमध्ये कॅल्शियम,फाॅस्फोरस, व्हिटाॅमीन सी, 

व्हिटाॅमीन A, लोह इत्यादी पोषकतत्व भरपूर प्रमाणात असते.आजारी 

व्यक्तीला डाक्टर सुद्धा मोसंबीचे ज्यूसचे सेवन करायला सांगतात.

या मोसंबीमध्ये अनेक आजार बरे करण्याची क्षमता आहे.मोसंबी खाल्याने  

किंवा मोसंबीचा ज्यूस पिल्याने त्याचे अनेक फायदे शरीराला होतात.मोसंबी 

ज्यूस एक परफेक्ट डीटाॅक्सीफाई एजेंट आहे. जे शरीरातील खराब  

टाॅक्सिनला बाहेर काढण्याचे काम करते. 

 

मोसंबीपासून शरीराला मिळणारे फायदे

1) मोसंबीमध्ये व्हिटाॅमीन सी जास्त प्रमाणात असते. आपल्या संपूर्ण 

शरीरासाठी  व्हिटाॅमीन सी खूप आवश्यक असते. मोसंबी खाल्याने किंवा 

मोसंबीचा ज्यूस पिल्याने शरीरात व्हिटाॅमीन सी ची कमी होत नाही. 


2) मोसंबीमध्ये Antioxidants चे गुण भरपूर प्रमाणात असते. जे शरीरातील 

ईफ्लामेशनला कमी करतात. जे शरीराची इम्यनू सिस्टीमला मजबूत 

ठेवण्यास मदत करतात. आणि शरीराला होणाऱ्या इन्फेक्शन पासून 

लढण्याचं काम करतात.


3) मोसंबीमध्ये भरपूर प्रमाणात फायबर असल्याने पचनशक्ती मजबूत 

करते.यामध्ये असणाऱ्या रेशाळ तत्वांमुळे कब्ज, बद्धकोष्ठता,गॅस दूर होते. 

या मोसंबीच्या रसामुळे पोटांतील आम्लता कमी होते. भूक चांगली लागते. 

आणि पचनाच्या सर्व तक्रारी दूर होतात. 


4) मोसंबी चावून खाल्याने दात मजबूत होतात.

 

5) अस्थमा असणाऱ्या रुग्णांनी मोसंबीच्या रसात जीर आणि सुंठ पावडर 

टाकून पिल्यास फायदा होतो.


                       


6) मोसंबीचा ज्यूस नियमित पिल्याने केसाच्या सर्व समस्या दूर होतात. आणि 

केसांची चांगली वाढ होते. व केस चमकदार होतात.


7) युरिक एसिड कमी करण्यासाठी मोसंबीचा ज्यूस खूप फायद्याचा ठरतो. 

शरीरात जमा झालेले अनावश्यक युरिक एसिडला बाहेर काढते. आणि फ्री 

रॅडीकल्सला निष्क्रिय करतात.

 

8) मोसंबीचा ज्यूस पिल्याने पोटाचा अल्सर सुद्धा बरा होतो.

 

9) रोजच्या जीवनातील येणारा ताणतणाव, स्ट्रेसच्या हानिकारक दुष्य 

प्रभावाला दूर करतात.


10) रोज नियमित मोसंबीचा ज्यूस पिल्याने अनिद्राची समस्या सुद्धा दूर होते.

 

11) गर्भावस्थेत मोसंबीचा ज्यूस पिणे फायद्याचे असते. कारण यातून 

शरीराला कॅल्शियम मिळते.


12) मोसंबीचा ज्यूस वजन कमी करण्यास सुद्धा सहायक ठरते.


13) ब्लडप्रेशर कंट्रोल ठेवण्यासाठी नियमित एक ग्लास मोसंबीचा ज्यूस 

प्यावा. 



14) पुरुषांनी नियमित मोसंबीचा ज्यूस पिल्याने शुक्रांणूची संख्या वाढते.

  

15) रोज एक ग्लास मोसंबीचा ज्यूस पिल्याने हृदय स्वस्थ होते.व कोलेस्ट्रोल 

नियंत्रणात राहण्यास मदत होते.


16) मधुमेह रुग्णांनी मोसंबीच्या ज्युसमध्ये आवळ्याच्या रस आणि थोडे मध 

टाकून पिल्याने ब्लडशुगर लेव्हल कंट्रोलमध्ये राहते.


17) कावीळ झालेल्या रुग्णांनी मोसंबीचा ज्यूस नियमित प्यावा त्यामुळे 

लिव्हर चे कार्य चांगले ठेवते. व कावीळ बरा होतो.

 

18) मोसबीमध्ये Antioxidants  चे गुण असल्याने डोळ्यांसाठी ते खूप 

फायदेशीर ठरते. 


19) रोज सकाळी एक ग्लास मोसंबीचा ज्यूस पिल्याने शरीराला उर्जा मिळते. 

                       


20) आजारपणामुळे आलेला अशक्तपणा किंवा कमजोरी यामध्ये मोसंबीचा 

ज्यूस खूप फायद्याचा ठरतो. शरीरातील अशक्तपणा दूर होऊन शरीराला 

ताकद देण्याचे काम हे मोसंबी ज्यूस करते.


21) रक्तदोष दूर करण्यासाठी मोसंबीचे सेवन फायद्याचे ठरते. मोसंबीमध्ये 

असणारे क्षार रक्तातील आम्लता कमी करतात. 


22) वात,  पित्त यावर सुद्धा मोसंबीचे सेवन फायद्याचे ठरते. 


23) मोसंबीचा ज्यूस नियमित पिल्याने चेहऱ्यावरअसलेले पिम्पल्स, काळे 

डाग कमी होऊन त्वचा स्वस्थ, उजळ होते आणि वाढत्या वयाचा प्रभाव कमी 

होतो. 

                   


24) मासंपेशीच्या दुखण्यावर सुद्धा मोसंबीचा ज्यूस फायदेशीर ठरतो. वर्क 

आउट करणाऱ्या व्यक्तींनी मोसंबीच्या ज्यूसच सेवन केल्यास मासंपेशीच्या 

दुखणे कमी होते.


25) सांधेदुखी, अर्थराईटीस यासारख्या  हाडांच्या दुखण्यावर सुद्धा मोसंबीचा 

ज्यूस फायदेशीर ठरतो.


26) हाड मजबूत ठेवण्यासाठी सुद्धा मोसंबीचा ज्यूसचे सेवन करायला हवे.

 

27) उन्हाळ्याच्या दिवसात मोसंबीच्या रसात काळ मीठ टाकून पिल्याने 

शरीरातील, पोटातील उष्णता कमी होते. 


चला तर भेटूया एका नवीन विषयासह....लेख आवडल्यास  SHARE

करायला विसरू नका.      

                

       



       

    









   

















टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या