Header Ads Widget

किवी फळाचे फायदे

                                                            



किवी फळ हे चवीला स्वादिष्ट् असते. दिसायला लहान दिसणारे किवी ही 

अनेक पोषकतत्वांनी युक्त असते. किवीच्या सेवनाने मिळणारे स्वस्थ लाभ 

अनेक आहेत. ऑस्टेलिया आणि न्यूझीलंड मध्ये सर्वात जास्त किवीचे  

उत्पादन होते. आता भारतात सुद्धा किवीचे उत्पादन व्हायला लागले.        

किवीमध्ये विटामिन C भरपूर प्रमाणात असते. या किवीपासून शरीराला 

अनेक आरोग्यदायी फायदे दिसून येतात.          

किवीमध्ये असणारे पोषक घटक 

विटाॅमिन C

विटाॅमिन K

विटाॅमिन A

विटाॅमिन E

फायबर 

फोलीड

पोटेशिअम 

कॅरोटीन

1) रोगप्रतिकारशक्ती वाढते 

किवीचे सेवन केल्याने शरीरात रोगप्रतिकारशक्ती वाढते. किविच्या सेवनाने 

इमान्यू सेल्स वाढून शरीर आतून मजबूत होते आणि अनेक आजारांंपासून 

आपले संरक्षण होते.   


2) सर्दी खोकला यावर फायदेशीर 

वातावरण बदलले की अनेक व्यक्तींना सर्दी, खोकला होतो. अश्या व्यक्तींनी 

जर नियमित किवी या फळाचे सेवन केले तर शरीरात रोगप्रतिकारशक्ती 

वाढते आणि अश्या प्रकारच्या वारवार होण्याऱ्या आजारांंपासून  लांब राहता 

येते. 


3) विटाॅमिन C ची कमी भरून निघते 

किवीमध्ये विटाॅमिन C भरपूर प्रमाणात असते ज्यांना विटामिन C ची 

कमतरता आहे त्यानी रोज एक ते दोन किवीचे सेवन करावे.विटाॅमिन C ची 

कमी भरून निघते. 


4) अस्थमासाठी फायदेशीर 

अस्थमा या रोगांसाठी  किवी खूप लाभदायक ठरते. किवीमध्ये भरपूर 

प्रमाणात विटाॅमिन C आणि AntiOxidants असतात म्हणून ज्यांना अस्थमा 

आहे त्यांनी किवीच नक्कीच सेवन करायला हवे. 


5) डेंगूवर प्रभावी 

किवी इम्यन्यु सिस्टम ला सपोर्ट करते डेंगू  झाला असल्यास किवीचे सेवन 

फायद्याचे ठरते. तसेच थंडी ताप यासाठी किवीचे सेवन खूप फायदेशीर 

ठरते. 


6)  वजन कमी होते 

वजन कमी करण्यासाठी किवी एक चांगला स्त्रोत आहे. लो ग्लायसेमिक 

इंडेक्स आणि उच्चप्रमाणात फायबर असते जे शरीरात फट जमा होऊ देत 

नाही.


7) हाडे मजबूत होतात 

किवीत असलेले पोटेशिअम  हाडे मजबूत ठेवण्यासाठी उपयोगाचे ठरतात. 

सांधेदुखी, अर्थराईटीस चा त्रास सुद्धा किविच्या सेवनाने दूर होतो.

 

8) विषारी घटक बाहेर टाकण्यास मदत 

शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्याचे काम किवी करते.

      

 9) पोटाचे विकार दूर होतात 

पोटाचे आजार दूर करण्यासाठी किवी एक रामबाण उपाय आहे. बवासीर, 

कब्ज, पोटाचे दुखणे यावर उपाय म्हणून किवीचे सेवन फायद्याचे ठरते. यात 

असलेले फायबर पचनसंस्था चांगली ठेवण्यास मदत करते.

 

10) खराब कोलेस्ट्रोल कमी होते 

किवी हे फळ फक्त खराब कोलेस्ट्रोल कमी करते इतकेच नाही तर चांगले 

कोलेस्ट्रोल सुद्धा वाढविते.

  

11) ब्लड सरर्कुलेषण चागले होते 

किवीच्या सेवनाने शरीरातील रक्त पातळ होण्यास मदत होते. त्यामुळे ब्लड 

सरर्कुलेषण चांगले होते. 

 

12) मधुमेह कंट्रोलमध्ये राहते

किवीमध्ये ग्लायसेमीक इंडेक्स खूप कमी प्रमाणात असते. ग्लायसेमीक 

इंडेक्स कमी प्रमाणात असल्याने रक्तातील ग्लुकोजची मात्रा वाढू देत नाही. 

त्यामुळे मधुमेह कंट्रोल मध्ये राहण्यास मदत होते. 

 

13) अनिद्रासाठी फायदेशीर 

किविमध्ये Antioxidants ,सेरोटॅनीन असे काही कंपाऊंडस असतात की      

ते स्लीपिंग डिसआर्डर मध्ये मदत करतात ज्यांना झोप येत नाही. त्यांनी 

नियमितपणे झोपायच्या आधी 1 ते 2 किवीचे सेवन केल्यास चांगली झोप 

येण्यास मदत होते. 


14) डोळ्यांंचे आजार दूर होतात 

वाढत्या वयानुसार होणारे डोळ्याचे आजार, इन्फेक्शन,म्यकुलर डिझनरेशन  

सारखे डोळ्यांचे आजार दररोज 2 ते 3 किवीचे सेवन केल्याने कमी होतात. 

आणि डोळ्यांची दृष्टी सुधारण्यास मदत होते.

 

15) त्वचा स्वस्थ होते 

आपल्या त्वचेमध्ये असलेले कोलेजन स्वस्थ ठेवण्यासाठी विटाॅमिन C ची 

खूप जास्त गरज असते. किवीचे सेवन केल्याने विटाॅमिन C मिळते नियमित 

ते 2 किवी खाल्याने त्वचा साफ  होते, चमकदार होते तसेच चेहऱ्यावरील 

पिग्मेंनटेशन, सुरकुत्या, पिंपल कमी होते. आणि त्वचा जवान होते.

 

16) गर्भाची वाढ चांंगली होते

गर्भवती महिलांसाठी सुद्धा किवीचे सेवन लाभदायक ठरते. यात फोलिक 

असिड असते जे गर्भाच्या वाढीसाठी आवश्यक असते. 


17) धातू  वाढविण्यासाठी उपयोगी 

किविच्या नियमित सेवनाने धातू आणि ओज वाढविण्यास मदत होते. 


18) फुफुस स्वस्थ होतात 

2200 लोकांवर केलेल्या एका सर्वेनुसार जे व्यक्ती नियमित किवी आणि 

अन्य फळाचे सेवन करतात त्याचे फुफुस अधिक स्वस्थ होण्यास मदत होते. 

आणि त्याचे फुफुस अधिक चांगल्या प्रकारे काम करायला लागते.                

  

किवीचे सेवन कसे कधी किती करावे?

किवी या फळाला दुसऱ्या फळासारखेच खाता येते. याचा जूस बनवून पिता 

येते. तसेच याचे सलाद बनवून खाता येते. किवीचे सेवन दिवसभरात कधीही 

करता येते. परंतु किवी सकाळी नाश्त्यात खाणे फायद्याचे ठरते. एका निरोगी 

व्यक्तीनी दिवसातून 2 किवीचे सेवन करावे. याचे सेवन तुम्ही दुसऱ्या 

फळासोबत मिक्स करून सुद्धा करू शकता. किवी घेताना त्यावर 

कोणत्याही प्रकारचे डाग असायला नको.       
































टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या