Header Ads Widget

मालिश केल्याने शरीराला होतील हे फायदे


                                       



कधीतरी खूप थकल्यावर किवा जास्त काम झाल्यावर मालिश करण्यासारखा

सर्वातम पर्याय नाही.मालिश केल्याने शरीराचे दुखणे कमी होते आणि 

शरीराच्या संपूर्ण नसा मोकळ्या होतात. हिवाळ्यात मालिश केल्याने त्याचे 

अनेक फायदे शरीराला होतात. हिवाळ्यात शरीराला मालिश केल्याने 

शरीरातील वेदना कमी होतात.आणि  शरीराला माॅइश्वरायझर मिळते.

असे म्हटले जाते की, दोन किलो बदाम खाल्यानेही एवढा फायदा होत नाही 

जेवढा मालिश करून रोमछीद्राद्वारे पन्नास ग्रॅम तेल शरीरात मुराविल्याने  

होतो. 


हिवाळ्यात सुस्तपणा वाढतो तसेच त्वचा कोरडी पडते. अश्या वेळेस मालिश 

करणे सर्वात्तम पर्याय मानला जातो. थंडीमुळे अनेक लोकांना सांधेदुखीचा 

त्रास उदभवतो. अश्या वेळेस मालिश करणे फार गरजेचे असते.शरीराला 

मालिश करण्यासाठी अनेक प्रकारचे  तेल वापरले जातात. 

उदा: ब्राम्ही तेल, बदामाचे तेल,एरंडेल तेल, खोबरेल तेल, तीळ, मोहरी व 

सरसो तेल इत्यादी. यामध्ये मोहरीचे तेल अधिक उपयोगी मानले जाते. 

मालिश करण्याचा विधी 

                                


मालिशसाठी आयुर्वेदात अभ्यंग या शब्दाचा प्रयोग केला गेला आहे.शरीराला 

अनुकूल तेल सुखपूर्वक हळूहळू अनुलोम गतीने वरून खालच्या दिशेने 

चोळणे म्हणजे अभ्यंग होय.

भोजनानंतर तीन तासांनी, जेव्हा वेळ मिळेल तेव्हा, दिवसा किवा रात्री, जेव्हा 

अनुकूल असेल तेव्हा मालिश करता येते. 

सर्वप्रथम पायापासून मालीशला सुरुवात करावी व शेवटी डोक्यापर्यंत येऊन 

समाप्त करावी. याचा अर्थ असा नव्हे कि एकाच वेळी पायापासून 

डोक्यापर्यंत हात फिरवावा. नाही पायाचे तळवे व बोटापासून टाचेपर्यंत, 

नंतर पायाच्या पंजापासून गुडघ्यापर्यंत,  गुडघ्यापासून मांडी व कबरेपर्यंत, 

हाताची बोटे व तळव्यापासून खंद्यापर्यंत, नंतर पोट, छाती, चेहरा व डोळे, 

मान व पाठ या क्रमाने मालिश केली पाहिजे. 


डोके, पाय व कान याठिकाणी विशेषतःमालिश  केली पाहिजे. डोक्याला 

मालिश करण्यासाठी थंड किवा कोमट तेल वापरावे. हात व पायांना गरम 

तेलाने मालिश करावी. याचप्रमाणे हिवाळ्यात गरम तेलाने व उन्हाळ्यात थंड 

तेलाने मालिश करणे उचित आहे. दीर्घ आकाराचे अवयव हात, पाय यांना

अनुलोम गतीने म्हणजेच वरून खालच्या दिशेने व सांध्याच्या ठिकाणी, 

हाताचे कोपर, मनगट, गुडघा, घोटा कंबर येथे वर्तुळाकार मालिश करावी. 

मालीशचा मुख्य उद्देशआतील अवयवाची गती उत्तेजीत करणे हा आहे. 

शरीराच्या सर्व भागावर एकसारखा दाब देऊन मालिश करू नये. डोळे, 

नाक, कान, गळा, डोके व पोट यासारख्या नाजूक भागांना हलक्या हाताने व 

बाकी सर्व अवयवांना आवश्यक दाब देऊन मालिश करावी.

शीघ्र गतीने केलेली मालिश शरीरात थकवा निर्माण करते. म्हणून मालिश 

करताना घाई करू नये. निशित मनाने, प्रसन्नतापूर्वक, आरामशीर, मालिश 

करावी. 


मालिश किती वेळ करावी?


सर्व शरीराला चांगल्या प्रकारे मालिश व्हावी यासाठी प्रत्येक भागाला दोन ते 

पाच मिनिटे मालिश करावी.

जर एकाच भागाला मालिश करावयाचे असेल तर कमीत कमी 15 मिनिटे 

अवश्य केली पाहिजे.निरोगी व्यक्तीसाठी दररोज स्नानापूर्वी पाच मिनिटाचा 

अवधी आहे. आणि रोगी व्यक्तीसाठी  अधिक काळ अपेक्षित आहे.

मालिशनंतर 15 मिनिटे विश्रांती घ्यावी. त्यानंतर नपकीन  किंवा टाॅवेल गरम 

पाण्यात बुडवून पिळावा व त्याने तेल पुसून घ्यावे. नंतर गरम पाण्याने स्नान 

करावे. 

                                          

मालिश केल्याने शरीराला मिळतील हे फायदे 


1) शरीरातील थकवा दूर होऊन शरीरात एक प्रकारची नवीन शक्ती व 

स्फूर्ती संचारित होते.


2) शरीरातील वायूंचा नाश होऊन त्वचेला योग्य पोषण मिळते. त्यामुळे 

त्वचा कांन्तीयुक्त व तेजस्वी होते.


3) मालिशमुळे अकाली येणारे वृद्धत्व जाऊन चिरयाैवन प्राप्त होते. तसेच 

आळस व निष्क्रियता नष्ट् होते. शरीर उसाही बनते.


4) नियमित मालिश केल्याने नेत्र ज्योतीमध्ये वृद्धी होते.व बुद्धीच्या विकास 

होतो.


5) मालिशमुळे स्थूल शरीर कृश होते. व कृश शरीर पुष्ट् होऊन बलशाली 

बनते.


6) मालिशमुळे डोकेदुखी, हात पाय दुखणे व इतर दुखण्यामध्ये आराम 

मिळतो. 


7) मालिश केल्याने त्वचा फाटत नाही. त्वचेवर सुरकुत्या पडणे, केस पांढरे 

होणे व गळणे बंद होते. तसेच त्वचेचे विकार होण्याची शक्यता नष्ट्  होते.

 

8) रोम छिद्रांद्वारेतेल शरीरातील विविध ग्रंथीच्या माध्यमातून भिन्न भिन्न 

अवयवांपर्यंत पोहोचून त्यांना अधिक क्रियाशीलता प्रदान करते. 


9) उत्तम प्रकारे, नियमितपणे केलेली मालिश हा एक व्यायाम आहे, जो 

शरीराच्या विभिन्न भागांच्या कार्यक्षमतेत वाढ करतो.


10) पायाच्या तळव्यांना मालिश केल्याने दिवसभराच्या मेहनतीने उपन्न 

झालेल्या तिन्ही दोषाचा नाश होतो. 


11) हृदयप्रदेशी हलक्या हाताने गोल-गोल हात फिरवून सावधानीपूर्वक 

मालिश केल्याने हृदयाचे दाैर्बल्य नष्ट्  होऊन हार्टफेलसारख्या व्याधीच्या 

भयनाश होतो. 


12) नियमित मालिश केल्याने वातामुळे होणारे ऐंशी प्रकारचे रोग सांधेदुखी, 

इतर वेदना, वात, पित्त, कफजन्य रोग , सर्दी , दमा, अनिद्रा, मलावरोध , 

स्थूलता , रक्तदोष इत्यादी रोगामध्ये खूप लाभ होतो.तसेच मालिश केलेल्या 

शरीरावर लहान मोठे जीव जंतू चावल्याने कसलाही परिणाम होत नाही. 


13) मालिशमुळे श्रवणशक्ती, हृदयशक्ती, कार्यशक्ती व तेजबल याची वृद्धी 

होते. 


14) रात्री झोपण्यापूर्वी मोहरीच्या तेलाने संपूर्ण शरीराला मालिश केल्याने 

रोम छिद्रांमधून रात्रभर अधिक प्रमाणात तेल शोषले जाते, झोपही चांगली 

येते व मेंदूला आराम मिळतो. 


15) मालिशद्वारे ऑपरेशनशिवायही नसांमधील अवरोध दूर होतो. वार्धक्य, 

रोग, बैठे जीवन इत्यादी मुळे अनेक वेळा मनुष्य हिंडू फिरू शकत नाही व 

व्यायाम करू शकत नाही. अश्या वेळी त्याच्या शरीरात रक्ताभिसरण  योग्य 

प्रकारे होऊशकत नाही. याचा परिणाम म्हणून अनेक रोगाचे जसे कि, 

मलावरोध, संधिवात, डोकेदुखीपासून ते अर्धांगवायूपर्यंत आक्रमण होण्याची 

शक्यता असते. अश्या लोकांसाठी मालिश अत्यंत लाभदायक आहे कारण 

मालिशमुळे रक्तसंचारणास खूप मदत मिळते.


मालिश कोणी करू नये? 

हृदयरोगी, गजकर्ण - खरुज - कोड यासारखे त्वचाविकार झालेले रोगी, क्षय 

रोगी, अति अशक्त लोकांनी मालिश करू नये.       

                             

    







 





  




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या