फळ भाज्यांमध्ये सर्वात आवडती भाजी कोणती असेल असा प्रश्न कोणाला
विचारला तर नक्कीच टमाटर असेल कारण हि फळभाजी कोणत्याही
पदार्थात घातल्यास पदार्थाची चव वाढते. टमाटरचा वापर भाजी, आमटी,
कोशिबीर, सूप बनविण्यासाठी केला जातो. नुसते पदार्था बनविण्यासाठी
नाहीतर या टमाटरचे अनेक आरोग्यदायी फायदे असतात.टमाटरचे
वैज्ञानिक नाव सोलनम लायकोपेसिकम आहे.टमाटरला पोषक तत्वाचा
पावर हाऊस म्हटल्या जाते. कारण यात अनेक पोषक घटक आढळून
येतात.टमाटरचा सर्वात महत्वाचा गुणधर्म म्हणजे याला शिजविल्यानंतर
सुद्धा यातील पोष्टिक घटक नष्ट् होत नाही.
टमाटरमध्ये असलेले पोषक घटक
विटाॅमिन A, विटाॅमिन C, विटाॅमिन K , सोडियम ,बीटा कॅरोटीन, फोलिड,
पोटॅशियम, नायसिन, विटाॅमिन B6, मॅग्नेशिअम, फाॅस्फोरस, कॉपर इत्यादी
पोषक घटक असतात.
हे सर्व पोषक घटक स्वस्थ आरोग्यासाठी आवश्यक असतात.
महत्वाचे मुद्दे
1) हाड मजबूत होते
2) डोळ्यांची दृष्टी सुधारण्यास मदत
3) स्वस्थ केसासाठी
4) ब्लडशुगर कमी करते
5) कॅन्सरपासून बचाव होतो
6) स्वस्थ त्वचेसाठी
7) वजन कमी करण्यास फायदेशीर
8) उच्च रक्तदाब कमी होतो
9) चांगली झोप येते
10) रक्ताचे उचित संचार
11) गुड कोलेस्ट्रोल तयार होते
12) सांधेदुखीवर गुणकारी
13) पोटातील जंत दूर होते
14) विटांमिन C ची कमी दूर होते
15) हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढते
16) डोळ्यांचा चष्मा निघतो
17) पोट साफ होण्यास मदत
18) शरीर स्वस्थ राहते
19) भूक चांगली लागते
स्वस्थ शरीरासाठी टमाटरचे आरोग्यदायी फायदे
1) हाड मजबूत होते
टमाटरमध्ये विटाॅमिन K आणि कॅल्शिअम असते जे आपल्या हाडांच्या
मजबुतीसाठी खूप फायदेशीर असते.
2) डोळ्यांची दृष्टी सुधारण्यास मदत
टमाटरमध्ये विटाॅमिन A असते मॅक्यूलर डिजनरेशन पासून होणाऱ्या
त्रासाला कमी करतात. Phytochemicals, Antioxidants, Zeaxanthin,
Lycopene, Lutein इत्यादी तत्व या टमाटरमध्ये असल्याने डोळ्यांना
होणाऱ्या त्रासापासून वाचवण्याचं काम करते.
3) स्वस्थ केसासाठी
टमाटरमध्ये विटाॅमिन आणि आयरन असते जे केसाना मजबूत करतात.
आणि निर्जीव केसांना स्वस्थ बनविण्याच काम हे टमाटर करते.
4) ब्लडशुगर कमी करते
ब्लडशुगरची मात्र कमी करण्यासाठी टमाटर मधुमेह रुग्णासाठी एक
उत्कृष्ट आहार समजला जातो. यात कार्बोहायड्रेस खूप कमी प्रमाणात
असते. जे ब्लडशुगर नियंत्रित करण्यास मदत करतात.मधुमेह रुग्णांनी
अधिक प्रमाणात टमाटर खायला हवे. किवा टमाटर भाजी , कोशिंबीर
सलाद खायला हवे. जितके जास्त प्रमाणात टमाटर खाल तितक्या लवकर
मधुमेह कमी होण्यास मदत होईल
5) कॅन्सरपासून बचाव होतो
टमाटरमध्ये Antioxidants गुण असतात. जे आपल्या शरीरात होणाऱ्या
कॅन्सरच्या सेल्सची वाढ होऊ देत नाही नियमित टमाटर खाल्याने Prostate
cancer चा खतरा खूप कमी होतो. टमाटरमध्ये असलेले Lycopene तत्व
हे कॅन्सरचा खतरा कमी करून शरीर स्वस्थ ठेवण्यास मदत करतात.
6) स्वस्थ त्वचेसाठी
टमाटरमध्ये Lycopene नावाच Antioxidants असते जे सूर्याच्या हानिकारक
किरणापासून त्वचेचं रक्षण करते. कच्या टमाटरवर सेंधव मीठ टाकून
खाल्याने चेहऱ्यावर लाली यायला सुरवात होते. टमाटरची पेस्ट करून
चेहऱ्यावर लावल्याने त्वचेवर ग्लो येतो आणि चेहऱ्यावर असलेले
पिग्मेनटेशन कमी होण्यास मदत होते.
7) वजन कमी करण्यास फायदेशीर
टमाटर वजन कमी करण्यासाठी सुद्धा खूप सहाय्यक आहे. टमाटरमध्ये
फट खूप कमी प्रमाणात असते. आणि यात कोलेस्ट्रोल शून्य असते. यामध्ये
भरपूर प्रमाणात पाणी आणि फायबर असते. म्हणून टमाटरचे नियमित सेवन
केल्याने वजन कमी होते.
8) उच्च रक्तदाब कमी होतो
पोटॅशिअमनी समृद्ध असलेले टमाटर उच्च रक्तदाब कमी करण्यास मदत
करतात.
9) चांगली झोप येते
नियमित टमाटर खाल्याने टमाटरमध्ये असलेले लायकोपीन तत्व चांगली
झोप येण्यास मदत करतात.
10) रक्ताचे उचित संचार
तुम्ही जर रोज एक टमाटर खात असाल तर आपल्या शरीरात वाहणारे रक्त
योग्य प्रकारे कार्य करत. कच्चे टमाटर खायला आवडत नसेल तर टमाटरचे
सूप पिल्याने त्यामुळे आपल्या शरीरातील रक्त संचारण प्रकिया योग्य रीतीने
चालेल आणि आपल रक्त लाल गडद रंगाचे होईल.
11) गुड कोलेस्ट्रोल तयार होते
शरीरात जर खराब कोलेस्ट्रोल खूप वाढले असेल तर नियमित टमाटर
खाल्यास खराब कोलेस्ट्रोल कमी होऊन गुड कोलेस्ट्रोल तयार होते.
12) सांधेदुखीवर गुणकारी
टमाटरमध्ये कॅरोटीन नावाच तत्व असते जे आपल्या शरीरातील वेदना दूर
करण्यास मदत करतात. सांधेदुखीचा त्रास असेल किवा संधिवात असेल
आणि हे आजार दूर करायचे असतील तर टमाटरचे सेवन करायला सुरवात
करा कारण यात असलेले औषधी गुणधर्म सांधेदुखी सारख्या आजारापासून
दूर राहण्यास मदत करतील.
13) पोटांंतील जंत दूर होते
पोटात जंत झाले असल्यास त्यावर हिंग घालून खाल्यास पोटातील जंत कमी
होण्यास मदत होते.
14) विटाॅमिन C ची कमी दूर होते
टमाटरमध्ये विटाॅमिन C भरपूर प्रमाणात असते. नियमित टमाटर खाल्याने
शरीरात विटाॅमिन C ची कमी होत नाही
15) हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढते
शरीरात हिमोग्लोबिन कमी झाले असेल तर टमाटरचे सेवन करावे रक्त
वाढविण्यास मदत होते. तसेच रक्त शुद्ध करण्यास मदत करते.
16) डोळ्यांचा चष्मा निघतो
टमाटर कापून त्यावर मिरे लावून नियमित चार महिने खाल्यास डोळ्यांचा
चष्मा निघन्यास मदत होते.
17) पोट साफ होण्यास मदत
लहान मुलांना कोशिंबीर किवा टमाटरचे सूप दिल्यास पोट साफ होण्यास
मदत होते.
18) शरीर स्वस्थ राहते
जर आपण रोज एक टमाटर खात असाल तर आपले शरीर निरोगी आणि
स्वस्थ राहील कारण टमाटरमध्ये असे काही गुण असतात. जे आजारातून
होणाऱ्या जीवाणुंशी लढतात. आणि आपली रोगप्रतिकारशक्ती मजबूत
करतात.
19) भूक चांगली लागते
ज्यांना भूक लागत नाही त्यांनी जेवणाच्या एक तास अगोदर एक कप
टमाटरचे सूप प्यावे चांगली भूक लागते.
0 टिप्पण्या