Header Ads Widget

दररोज व्यायाम केल्याने शरीराला होतील हे मोठे फायदे

 


                            


आपण स्वस्थ, निरोगी राहावे असे प्रत्येकांना वाटते. त्यासाठी योग्य आहार

आणि व्यायामाची गरज असते.आज आपण बघतो व्यायामाच्या अभावामुळे

अनेक आजार आपल्याला जडतात. जसे शुगर, बीपी, हृदयरोग, लट्ठपणा

यासारखे गंभीर आजार होताना दिसतात. परंतु आजारापासून मुक्ती

मिळवायची असेल किंवा कोणतेही आजार होऊच नये असे वाटत असेल 

तर यासाठी नियमित व्यायाम करणे फार गरजेचे आहे. तुम्हाला प्रश्न पडला 

असेल व्यायाम नेमका कोणता करायचा तर धावणे, चालणे, विविध आसने, 

योग, ध्यान, वजन उचलणे अश्या सगळ्यांचा समावेश हवा.

    

व्यायाम केल्याने शरीराला कोणते आरोग्यदायी फायदे होतात ते 

जाणुन घेऊया.

1) शारीरिक आणि मानसिक स्वस्थ सुधारते 

आपण आपल्या रोजच्या रुटीन मध्ये व्यायामाचा समावेश करणे अत्यंत 

आवश्यक आहे. व्यायाम केल्याने शारीरिक फायदे तर होतातच आणि 

आपले मानसिक स्वस्थ सुद्धा चांगले राहते. चांगल्या शरीराबरोबर निरोगी 

मन असणे ही तितकेच गरजेचे आहे. ज्यामुळे शारीरिक ताकद हृदयाची 

वाढलेली कार्यक्षमता व त्याचबरोबर मनाची शांतता असे सर्व लाभ 

मिळतील म्हणजेच तुमचे शारीराक आणि मानसिक आरोग्य चांगले राहील.   

2) शरीरात उत्साह निर्माण होतो

नियमित व्यायाम केल्याने आपल्या शरीरातील Dopamine नावाचं नैसर्गिक 

केमिकल तयार होते.त्यामुळे आपण आनंदी, उत्साही, मोटिवेटेड राहू 

शकतो. जेव्हा आपल्याला आळस येतो कोणतेही काम करावेसे वाटत नाही 

अश्या वेळेस आपल्या शरीरात Dopamine या केमीकलची कमतरता 

झालेली असते. व्यायाम केल्याने आपल्याला  उत्साही वाटते. तसेच 

शारीरिक उर्जा वाढते. आणि दिवसभर थकवा वाटत नाही. 


3) ताणतणाव दूर होतो

आपल्या शरीरात Serotonin नावाच केमिकल असते. व्यायाम केल्याने ते  

वाढते. आजकालच्या धकाधकीच्या जीवनात प्रत्येकालाच काहीना काही 

तणाव असतो. हा तणाव, डिप्रेशन, एजांईटी नियमित व्यायाम केल्याने कमी 

होते. तणाव नसल्याने आजारापासून दूर राहतो.


4) टाॅक्सीन बाहेर टाकल्या जाते

नियमित व्यायाम केल्याने संपूर्ण शरीरातील टाॅक्सीन घामाद्वारे बाहेर 

टाकल्या जाते.


5) पाठदुखीचा त्रास कमी होतो 

ज्यांना एका जागी बसून कामे असतात अश्या व्यक्तीला पाठदुखीचा त्रास 

खूप जाणवतो अश्या वेळी नियमित व्यायाम केल्याने पाठदुखीचा त्रास 

कमी होण्यास मदत होते.    

 

6) शरीर स्वस्थ राहते 

नियमित व्यायाम केल्याने संपूर्ण शरीर स्वस्थ निरोगी राहण्यास मदत होते. 

आणि शरीराचा स्टाॅमिना वाढतो. शरीरात उर्जा वाढते.   


7) हाडे मजबूत होतात

व्यायाम केल्याने संपूर्ण शरीराला ताण दिल्या जातो. त्यामुळे हाडं मजबुत 

होतात मासंपेशी स्टाॅग बनतात तसेच सांधेदुखी असल्यास ती सुद्धा बरी 

होते. 

     

8) पचनशक्ती मजबूत होते 

व्यायाम केल्याने पचनशक्ती मजबूत होते आणि भूक सुद्धा चांगली लागते. 


9) उच्च रक्तदाब नियंत्रणात राहतो 

ज्यांना उच्च रक्तदाबाचा त्रास आहे त्यांनी नियमित व्यायाम केल्याने उच्च 

रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत होते. 


10) व्हायरल इन्फेक्शन पासून बचाव 

सर्दी, खोकला, ताप यासारख्या वारंवार होणाऱ्या व्हायरल इन्फेक्शन पासून 

बचाव होतो. आणि शरीरात रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. तसेच 

अनेक होणाऱ्या आजारापासून वाचता येते.

  

11) आळस दूर होतो

व्यायाम करण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे आळस दूर होतो.जर 

तुम्हाला खूप आळस येत असेल तर रोज सकाळी व्यायाम करायला 

हवा.व्यायाम केल्याने आळस दूर होऊन कोणतेही काम करण्यासाठी 

शरीरात उत्साह निर्माण होतो.


12) हृदयरोगांपासून दूर राहता येते 

फास्टफूड, आहारावरील अनियंत्रणामुळे कोलेस्ट्रोल वाढण्याची शक्यता

असते. तसेच खराब कोलेस्ट्रोल शरीरात वाढल्यामुळे हृदयरोगांचा धोका 

वाढतो. दररोज व्यायाम केल्याने शरीरात चांंगले कोलेस्ट्रोल वाढते तसेच  

हृदय स्वस्थ होते. आणि हृदयरोगांपासून दूर राहता येते.


13) त्वचा स्वस्थ होते 

रोज व्यायाम केल्याने त्वचेवर ग्लो येतो.शरीरात ब्लड सर्कुलेषण चांगले 

झाल्यामुळे त्वचेवर नैसर्गिक ग्लो येतो. तसेच पिम्पल्स, पिगमेनटेशन कमी 

होऊन त्वचा नितळ होते. तसेच वाढत्या वयाचा प्रभाव कमी होतो.        

    

    




 

              




  

       

































टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या