Header Ads Widget

रोज काजू खाल्याने शरीराला होतील हे फायदे

कोकणामध्ये उच्चपतीच्या काजूचं मोठ्या प्रमाणात उत्पादन होते. 

ड्रायफ्रुट मध्ये सर्वात श्रेष्ठ मानल्या जाणाऱ्या अश्या या काजूचे आरोग्या  

साठी खूप फायदे होतात.शक्तीवर्धक असलेला काजू अनेक आजरावर 

रामबाण उपाय आहे. काजू खाल्याने आपल्या शरीराचे अनेक 

प्रकारच्या मायक्रो नूटीयंटचे पोषण होते. आणि आपले शरीर 

 बलवान धष्ट्पुष्ट् होते.     

 


काजू मध्ये प्रामुख्याने विटामिन B2 रायब्लोप्लेविन, विटाॅमिनB3, नायसिन,

विटाॅमिन B5, विटाॅमिन B5, विटाॅमिनB6, विटाॅमिन B7,बाॅयोटीन,  

विटाॅमिनE,  विटाॅमिन C, विटाॅमिन K, पोटेशिअम, कॉपर, मॅग्नीज, 

मॅग्नेशिअम,फाॅस्फोरस, सोडियम, कॅल्शियम, झिंक सेलेनिअम, मिनरल्स 

इत्यादी पोषक घटक या काजूमध्ये आढळते. 


काजूच्या सेवनापासून शरीराला मिळणारे फायदे 


1) हृदयाचा धोका कमी होतो 

रोजच्या काजू सेवनामुळे हृदयाच्या आजाराचा धोका कमी होतो. कोलेस्ट्रोल

नियंत्रणात राहते. काजुमध्ये असलेले विटाॅमिन्स, फॅटी एसिड, प्रोटीन, 

फायबर , मिनरल्स, Antioxidants हे हृदयासाठी खूप आवश्यक असतात. 

काजू सेवनामुळे  खराब कोलेस्ट्रोल कमी होऊन चांगले कोलेस्ट्रोल म्हणजेच 

HDL वाढते. ज्यामुळे आपले हृदय सुरक्षित राहते.


2) ब्लडप्रेशर नियंत्रणात राहते 

काजूमध्ये मॅग्नेशिअम असल्या कारणाने ते ब्लडप्रेशर नियंत्रणात राहण्यास  

मदत करते. 

 

3) रक्तासंबंधित आजार होत नाही 

रोजच्या काजू सेवनामुळेआपल्याला रक्तासंबंधित आजार होत नाही. काजू 

मध्ये कॉपर असते. जो आपल्या रक्तातील महत्वाचा घटक आहे. जेव्हा 

रक्तातील कॉपरची मात्रा कमी पडते तेव्हा आयरन ची कमी होऊन 

एनिमिया होऊ शकतो. म्हणून रोजच्या काजू सेवनामुळे शरीराला योग्य 

प्रमाणात  कॉपर मिळते. 


4) डोळ्यांच्या संरक्षणासाठी 

वाढत्या प्रदूषणामुळे डोळ्यांच्या समस्या होत असतात. व डोळ्यांमध्ये

इन्फेक्शन सुद्धा होते. काजुमध्ये Zeaxanthin नावाचे Antioxidants           

आढळते. हे रंगद्रव्य आपल्या डोळ्यांवरील पडदा सहज शोषून घेवू शकतो. 

आणि त्यामुळे घातक अश्या अल्ट्रा वायलेट रेंज पासून आपल्या  डोळ्यांचे    

संरक्षण होते. 


5) कॅन्सरचा धोका कमी होतो 

काजूमध्ये असलेले  Antioxidants शरीरातील फ्री रॅडीकल्सचा नाश 

करतात. याच फ्री रॅडीकल्समुळे कॅन्सर  होण्याची भीती सर्वाधिक असते. 

अश्या फ्री रॅडीकल्स पासून स्वत:चा बचाव करण्यासाठी रोज काजूचे सेवन 

करायला हवे. एका संशोधनानुसार नियमित काजूचे सेवन केल्यास लिव्हर 

चा आणि आतड्यांचा कॅन्सर होण्याचा धोका कमी होतो.

 

6) हाडांच्या मजबुतीसाठी 

काजुमध्ये विटाॅमिन k मोठ्या प्रमाणात असल्याने  आपल्या हाडासाठी 

देखील ते फायद्याचे ठरते. विटाॅमिन k आणि कॅल्शियम हे दोन्ही आपल्या

हाडाच्या पोषणासाठी आवशयक असते.त्यामुळे हाडाच्या  होणाऱ्या

वेगवेगळ्या आजरापासून आपले संरक्षण करण्याचे काम हे काजू करते.

 

7) स्मरणशक्ती वाढते 

सकाळी उपाश्यापोटी 4ते 5  काजू खाल्याने स्मरणशक्ती वाढते. कार्य 

करण्याची एकाग्रता वाढते. मेंदूचे कार्य व्यवस्थीत होण्यासाठी आपल्या  

शरीराला फॅटी ऍसिड ची गरज असते. जे आपल्याला काजू मधून मिळते.

  

8) डोकेदुखीचा त्रास कमी होतो 

रक्तातील साखरेची मात्रा कमी झाल्यास एका बाजूने डोके दुखण्याची

समस्या उद्भवते. मेंदूचे कार्य सुरळीत होण्यासाठी तसेच  रक्तभिसरण

व्यवस्थीत व्हावे यासाठी काजू अतिशय महत्वाचा असतो. काजुमध्ये  

असणारे  Phytosterols डोके दुखीचा होणारा त्रास कमी करण्यास 

मदत करतात.

           

9) थकवा दूर होतो

काजू हे शरीरात उर्जा निर्माण करण्याचे माध्यम असून, याचा कोणताही 

दुषपरिणाम होत नाही. बऱ्याचदा आपण  काही काम न करताही थकवा  

जाणवतो. अश्यावेळेस  दोन तीन काजू खाल्यास थकवा दूर होतो. 


10) केस पांढरे होण्यापासून थांबवते


काजुमध्ये कॉपर असते. जे केसांना पांढरे होण्यापासून  थांबवते.


11) किडनी स्टोनमध्ये उपयोगी 


काजूच्या सेवनामुळे किडनी स्टोन होण्याचे प्रमाण 40% पर्यंत कमी होते. 


12) रक्ताची कमी दूर होते 


काजू हा लोहाचा चागला स्त्रोत आहे काजुमध्ये लोह मोठ्या प्रमाणात असते.  

त्यामुळे ज्यांना रक्ताची जर शरीरात कमी असल्यास काजू खावे.रक्त  

वाढण्यास मदत होते.
 

13) दात मजबूत होतात 


काजू खाल्याने हिरड्यांना ताकद, मजबुती मिळते. व दात चमकदार होतात. 

14) त्वचा स्वस्थ होते

 
नियमित काजू खाल्याने त्वचा स्वस्थ, सुंदर, मुलायम  होते. 


15) पायांच्या भेगा दूर होते


पायाला भेगा पडल्या असतील तर पायांना काजूचे तेल लावावे . भेगा कमी  

होतात.
  

काजूचे सेवन कोण करू शकते 


कोणत्याही वयोगटातील व्यक्ती काजू खावू शकतात. काजू हा उष्णतावर्धक

असल्याने दिवसाला 4 ते 5 काजू  खावे.  जास्त प्रमाणात खाल्याने उष्णतेचे

 विकार होण्याची शक्यता असते.      
     
चला तर भेटूया एका नवीन विषयासह....लेख 

आवडल्यास LIKE करा आणि SHARE करायला 

विसरू नका.     

                                    

            
































                                         


















   


 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या