Header Ads Widget

मोड आलेले कडधान्य खाल्याने शरीराला होतील हे फायदे

                                           


योग्य आहार असेल तर आरोग्यही उत्तम राहते. म्हणुनच आहार हा चाैकस 

असला पाहिजे. त्यामध्ये आहारात कडधान्ये अगदीच महत्वाची. कडधान्य 

आपल्याला शक्ती तर देतातच. पण त्यातील अनेक गुणधर्मामुळे त्याचा 

शरीराला चांंगला फायदा होतो. तूर, मुंग, मटकी,हरभरा, उडीद, चवळी, 

वाल, पावटा अशी अनेक कडधान्ये आहेत. यामध्ये खनिजे, लोह, 

कार्बोहायड्रेटस, मिनरल, व्हिटाॅमिन K, प्रथिने, पोटेशियम, मॅग्नेशिअम, 

फाॅस्फोरस असतात तसेच कॅल्शिअमचं प्रमाण मोठं आहे.म्हणून यापासून  

शरीराला आरोग्यदायी फायदे मिळतात. कडधान्य मोड आणून खाणे  

अधिक फायदेशीर आहे. कारण प्रथिनं पचायला सोपे होतात. जीवनसत्वाची 

मोठी वाढ होते. महत्वाचे म्हणजे जीवनसत्व मोड आल्यावर तयार होतं. मोड 

आलेल्या कडधान्यात ड जीवनसत्व, मिनरल, प्रोटीन, जास्त प्रमाणात असते. 

यामुळे शरीराला अनेक लाभ होतात.कडधान्य ही सकाळी नाशत्याला खाणे 

खूप फायदेशीर असते. नियमित कडधान्याचे सेवन केल्याने सर्व प्रकारचे 

पोषक घटक शरीराला मिळतात.अंकुरित कडधान्य सगळ्यात  स्वस्त, 

पोष्टिक आणि चांगला असा आहार आहे.या कडधान्याचा उपयोग सलाद, 

भाजी, उसळ बनविण्यासाठी होतो. ही कडधान्य मोड आल्यानंतर लिंबू 

आणि मीठ लावून कच्ची सुद्धा खाता येतात.         


अंकुरित कडधान्य खाल्याने शरीराला मिळणारे माल्यवान फायदे 

जाणुन घेऊया.

1) रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यास मदत 

2)  त्वचा स्वस्थ होते              

3) प्रोटीनची कमी दूर होते

4) डोळ्यांची दृष्टी सुधारते 

5) स्वस्थ केसांसाठी

6) रोगांपासून बचाव 

7) विषारी द्रवे बाहेर काढण्यास मदत

8) वजन कमी करण्यास मदत 

9) मधुमेह कंट्रोलमध्ये राहण्यास मदत 

10) स्वस्थ हृदयांसाठी

11) गर्भाची वाढ चांगली होते 

12) ब्रेस्ट कॅन्सर पासून बचाव होतो

13) एनिमिया दूर होतो 

14) पचनशक्ती सुधारते   

15) वातविकार दूर होतो 


1) रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यास मदत 

अंकुरित कडधान्य रोज खाल्याने रोगप्रतिकार शक्ती वाढण्यास मदत 

होते.आणि शरीर उर्जावान होते.

 

2) त्वचा स्वस्थ होते  

अंकुरित कडधान्य नियमित खाल्याने त्वचा स्वस्थ होते चेहऱ्यावरील 

सुरकुत्या, पिग्मेनटेंशन कमी होऊन त्वचेवर नैसर्गिक चमक येते. आणि 

वाढत्या वयाचा प्रभाव सुद्धा कमी होतो. 


3) प्रोटीनची कमी दूर होते

अंकुरित कडधान्यमध्ये 35% प्रोटीन असते तसेच मेद,जीवनसत्वे भरपूर 

प्रमाणात असते. तुम्ही मासांंहार करीत नसाल तर शाकाहारी आहारामध्ये 

प्रोटीनची पूर्तता कडधान्यातूनच  होते. 


4) डोळ्यांची दृष्टी सुधारते 

अंकुरित कडधान्यात विटाॅमिन A असते. जे आपल्या डोळ्यांची दृष्टी 

वाढविण्यासाठी मदत करतात.

  

5) स्वस्थ केसांसाठी

यातील मिनरल, प्रोटीन आणि  विटाॅमिन K मुळे केसांची वाढ चांगली 

होते.आणि केसांचे आरोग्य स्वस्थ ठेवण्यासाठी मदत करतात. 


6) रोगांपासून बचाव 

कडधान्ये ही पोषक तत्वांनी युक्त असते म्हणून नियमित कडधान्ये खाल्याने 

होणाऱ्या अनेक आजारांपासून आपला बचाव होतो.


7) विषारी द्रवे बाहेर काढण्यास मदत

कडधान्ये ही आपल्या शरीरातील हानिकारक तत्वे बाहेर काढण्यास मदत 

करतात.


8) वजन कमी करण्यास मदत 

अंकुरित कडधान्यात फायबर भरपूर असल्याने याच्या सेवनाने पोट खूप 

वेळ भरून राहते व लवकर भूक लागत नाही. तसेच या व्यतिरिक्त कॅलरीज 

घ्यायची गरज राहत नाही. व वजन कमी होण्यास मदत होते.

 

9) मधुमेह कंट्रोलमध्ये राहण्यास मदत 

नियमित अंकुरित कडधान्य खाल्याने मधुमेह कंट्रोल मध्ये राहण्यास मदत 

होते.


10) स्वस्थ हृदयांसाठी

अंकुरित कडधान्य हे ओमेगा थ्री फॅॅटी असिडचा चांगला स्त्रोत आहे. जे 

आपल्या हृदयांंच्या स्वास्थासाठी खूप आवश्यक असते. 

 

11) गर्भाची वाढ चांगली होते 

गर्भवती महिलांनी जर नियमित या कडधान्याचे  सेवन केले तर बाळाची 

शारीरिक मानसिक वाढ चांगली होण्यास मदत होते.

 

12) ब्रेस्ट कॅन्सर पासून बचाव होतो

अंकुरित कडधान्य खाल्याने आपल्या शरीराला विटाॅमिन A, C आणि 

Antioxidants मिळतात त्यामुळे ब्रेस्ट कॅन्सरसारख्या आजारापासून बचाव 

होतो.


13) एनिमिया दूर होतो 

एनिमिया झाला असेल किवा शरीरात रक्ताची कमी झाली असेल तर 

नियमित कडधान्याचे सेवन करावे रक्ताची कमी दूर होऊन एनिमिया दूर 

होतो.आणि रक्त शुद्ध होते. 

 

14) पचनशक्ती सुधारते   

अंकुरित धान्य खाल्याने लवकर पचन होते कारण यात मोठ्या प्रमाणात 

एजाईम्स असतात म्हणून ज्यांना पचनांशी संबंधीत आजार आहे त्यांनी 

नियमित कडधान्ये खावीत.  


15) वातविकार दूर होतो 

कडधान्यात असलेल्या लोह आणि कॅल्शियममुळे वातासारखे विकार बरे 

होतात. 


कडधान्याला मोड  कशी आणावी?

कोणतेही कडधान्य ज्याला मोड आणायची आहे ते घेऊन चांगले निवडून 

घ्यावे. व  नंतर स्वच्छ घुवून घ्यावी. पाण्यात 8 ते 10 तास भिजत ठेवावे. 

आणि नंतर ते सुती कापडात बाधुन ठेवावे. असे केल्यास चांंगली मोड येते.                    

  










   

     

 

 






टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या