आज भारतातच नाही तर संपूर्ण जगातील लोक मधुमेह या आजारांनी ग्रस्त
आहे. ३० ते ३५ वयोगटातील व्यक्ती तर या आजाराचे खूप शिकार होत
आहे.आज प्रत्येक घरात एक व्यक्ती मधुमेहाचा रुग्ण आहे. मधुमेह होण्या
मागचे कारण अनुवांशिकता सुद्धा आहे.योग्य आहार आणि नियमित
व्यायामाद्वारे आपण मधुमेह नियंत्रित ठेवू शकतो. चला तर मग जाणून घेऊ
या मधुमेह नियंत्रित ठेवण्यासाठी आहारात कोणत्या पदार्थाचा समावेश
करावा.
1) मेथीमध्ये असलेले अमिनो असिड रक्तामध्ये असलेल्या शुगरचा स्तर
कमी करण्यास सहायक ठरते. यामुळे रक्तातील इन्सुलिनची मात्र वाढते. व
शुगर कंट्रोल मध्ये राहते. मेथीमध्ये फायबर भरपूर प्रमाणात असते. नियमित
मेथी खाल्याने इन्सुलिन प्रोडक्शन वाढविण्यास मदत होते. तसेच ब्लड शुगर
कमी होण्यास मदत होते. शुगर नियंत्रित ठेवण्यासाठी मेथी खूप फायदेशीर
आहे. दोन च्यमच मेथी दाने एक ग्लास पाण्यात रात्री भिजत ठेवून सकाळी ते
मेथी दाने चावून चावून खावे. व मेथीचे पाणी पिवून घ्यावे. तसेच मेथी दाण्याचे
चूर्ण बनवून उपाश्यापोटी दोन च्यमच चूर्ण पाण्यासोबत घेतल्याने शुगरमध्ये
खूप लाभकारी ठरते.
2) मूळ्याचे सेवन सुद्धा मधुमेहासाठी चांगले मानले जाते. दिवसातून दोन
वेळा मुळ्याचे सेवन केल्याने मधुमेह नियंत्रित राहण्यास मदत होते.
3) कारल्यात polypeptide नावाच इन्सुलिन असते. जे ब्लड शुगर कंट्रोल
मध्ये ठेवण्यास मदत करते. तसेच यात Antioxidants भरपूर प्रमाणात
असते. कारल्याचा रस शुगरसाठी खूप उपयोगाचा ठरतो. यात कॅरोटीन
युक्त रसायन असते. त्याद्वारे रक्तातील शुगरलेव्हल वाढत नाही.कारल्याचा
रस 100 ते 125 ml सकाळी व संद्याकाळी घेतल्याने शुगरची मात्रा कमी होते.
4) आंब्याचे पाने शुगर कमी करण्यासाठी एक चांगला आयुर्वेदिक औषधी
मानली जाते. 10 ते 12 आब्याचे पाने रात्री पाण्यात भिजवून ठेवावे व सकाळी
ते पाणी पिवून घ्यावे.
5) मेडिकल रिसर्च नुसार आठ आठवडे पर्यंत दिवसातून तीन वेळा 1 ग्रॅम
अद्रक खाल्याने टाईप 2 डायबीटीज कमी होण्यास मदत होते. अद्रकचा
ग्लाॅयसेमिक इंडेक्स खूप कमी असतो. अद्रक इन्सुलिनच्या प्रोडक्शनमध्ये
सुद्धा सहायता करते. त्यामुळे शुगर कंट्रोल मध्ये राहण्यास मदत होते.
6) मधुमेह रुग्णासाठी जाभंळाचे सेवन रामबाण ठरते.शुगर असलेल्या
रुग्णांनी जाभंळाचे जास्तीत जास्त करायला हवे. जाभंळाचे साल, बी, रस
सुद्धा खूप फायदेशीर आहे जाभंळाच्या बियाचे वळवून त्याचे पावडर बनवून
एक एक च्यमच सकाळी व संध्याकाळी घेतल्याने फायदा होतो.
7) नियमित गव्हाच्या अंकुराचा रस पिल्याने शुगर कंट्रोल मध्ये राहण्यास
मदत होते.
8) शुगरमध्ये लसुनच्या नियमित सेवनाने ब्लडशुगरचा स्तर सामान्य राहते.
लसून त्या हार्मोन्सचे निर्माण करते जे शुगर नियंत्रित करण्यास मदत
करतात.
9) दालचिनी चे एक ते दोन तुकडे आणि तुळशीचे पाने चांगली पाण्यात
उकळवून घ्यावी व ते पाणी प्यावे.
10) मधुमेह असणाऱ्या रुग्णांनी जर शेगाची भाजी (वाल) याचे सेवन केल्यास
फायदा होतो. यामध्ये इन्सुलिनचं प्रमाण चांगले असते. तसेच फायबर सुद्धा
चांगल्या प्रमाणात असते.
11) पत्ताकोबी नैसर्गिकरित्या शुगर लेव्झाल कंट्रोल मध्ये ठेवण्याचे काम
करते. पत्ताकोबीची भाजी सलाद खाता येते. पत्ताकोबी नैसर्गिक इन्सुलिनचं
काम करते. तसेच रक्तात जमा होणारे फॅट कमी करते. ज्या भाजांचा आणि
फळांचा ग्लायसेमिक इंडेक्स ५५% पेक्षा कमी असतो. त्या फळ आणि
भाज्या शुगरसाठी सुरक्षित मानले जाते. आणि पत्ताकोबीचा ग्लायसेमिक
इंडेक्स 10% आहे. आणि पत्ताकोबी मध्ये स्टार्च सुद्धा कमी असतो.
पत्ताकोबीत कार्बोहायड्रेट ५५ ते ६५% तसेच प्रोटीन 15 ते २० % आणि
फट २० ते २५% असते.
12) भेंडीचे सेवन शुगर साठी चागले मानले जाते. यात फायबर भरपूर
प्रमाणात असते. जे शुगरसाठी चांगले मानले जाते.भेंडी ब्लडशुगर कमी
करण्यासाठी सहाय्यक आहे. भेंडीमध्ये सेलूबल आणि अनसेलूबल फायबर
दोन्ही असते. भेंडीची साल आणि बी ब्लडशुगर लेव्हल कमी करण्यासाठी
सहाय्यक आहे. भेंडी इन्सुलिनची सेनसिटीव्हीटी वाढविते. त्यामुळे
पानक्रियाजचे इन्सुलिन प्रोडक्शन वाढते. भेंडीमध्ये कॅलरीज कमी असते.
आणि भेंडीचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो. भेंडीचे सेवन शुगर आणि
वजन कमी करण्यासाठी फायदेशीर आहे.
13) टमाटरमध्ये कार्बोहायड्रेट खूप कमी असते आणि ब्लड शुगर लेव्हल
कंट्रोल मध्ये ठेवण्यास मदत होते. टमाटर कच्चे खाल्याने किंवा शिजवून
खाल्ले तरी त्याचा उपयोग हा होतोच. टमाटरचा ग्लायसेमिक इंडेक्स खूप
कमी असतो. त्यामुळे शुगर नियंत्रित राहण्यास मदत होते. तसेच यात
कॅलरीज सुद्धा कमी असते. त्यामुळे वजन कमी करण्यास मदत होते. २०११
मध्ये केलेल्या रिसर्च नुसार दररोज २०० ग्रॅम कच्चे टमाटर खाल्याने टाईप 2
डायबिटीज कंट्रोल मध्ये राहण्यास मदत होते.तसेच टमाटरमध्ये लाॅयकोपीन
नावाचं Antioxidants असते. जे Heart attack आणि Cancer पासून बचाव
करतात.
14) मेडिकल रिसर्च मध्ये असे दिसून आले की हिरव्या भाज्यांचे दररोज
सेवन केल्याने शुगर कंट्रोलमध्ये ठेवण्यास मदत होते.
15) आलू, शकरकंद, बीट खाणे टाळावे.
16) ओमेगा थ्री फॅटी असिड युक्त पदार्थाचे सेवन, फिश, Mustard,सोयाबीन,
अक्रोट, अंडी खात असाल तर अंड्यातील पिवळा बलक काढून टाकावा.
कारण त्यात फट जास्त प्रमाणात असते. तसेच दुध पीत असाल तर लो फट
असलेले दुध प्यावे.
17) सरसो, राईस oil, Sanflower oil, सोयाबीन oil, तेल वापरणे योग्य.
18) Butter, डालडा, Cheese Sauce खाणे टाळावे. तूप आणि नारीयल तेल
थोड्या प्रमाणात सेवन करू शकता.
19) सफरचंद, नाशपत्ती , पेरू, डाळिंब,अननस इत्यादी फळांचे सेवन करणे
योग्य.
20) हे फळे खाणे टाळावे केळ,आबा, अंगूर सीताफळ, चिकू, संत्री जर
तुमची शुगर कंट्रोल मध्ये राहत असेल तर या फळांचे सेवन तुम्ही थोड्या
प्रमाणात करू शकता.
21) हे खाणे टाळावे साखर, गोड पदार्थाचे सेवन, मिठाई,सहद,जॅम,जेली,
Cake, आईस्क्रीम,गोड फळांचे ज्यूस, Soft drinksआणि Alcohol इत्यादी.
0 टिप्पण्या