Header Ads Widget

वजन न वाढण्याची कारणे आणि त्यावरील उपाय

   


                                      

ज्याप्रमाणे वाढलेले वजन कमी करण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. त्याच 

प्रमाणे वजन वाढविण्यासाठी सुद्धा काही व्यक्तींना तारेवरची कसरत करावी 

लागते.कितीही खाल्ले तरीही वजन वाढत नाही. योग्य आहार आणि नियमित 

योगासने केल्याने वजन वाढविता येते. अनहेल्दी पद्धतीने Weight gain 

करणे खूप सोपे आहे. जंकफूड तळलेल्या पदार्थाचे सेवन, fast food, पिझा 

बर्गर यात जास्त प्रमाणात मीठ, साखर आणि रिफाईड ग्रेन्स असतात.  

याचा सेवनाने वजन तर वाढतेच त्याचबरोबर अनेक आजार सुद्धा होतात.

                                                

आपले तीन प्रकारचे Body Types असतात. ते कोणते जाणून घेवूया 


1) Endomorph या प्रकारात येणारे व्यक्ती लवकर वजन वाढवितात आणि 

त्यांचा  fat Parcentage सुद्धा हाय असतो.

2) Mesomorph या प्रकारात येणाऱ्या व्यक्तीसाठी वजन वाढविणे आणि 

वजन कमी करणे खूप सोपे असते. 

3) Ectomorph या प्रकारात येणाऱ्या व्यक्तीसाठी  वजन वाढविणे खूप 

कठीण असते.     

वजन न वाढण्यासाठी कोणती करणे असू शकतात ते आपण पाहूया 


1) कमी आहार घेणे किंवा जो आहार घेत आहे तो balance मील नसणे.

वेळेवर जेवढा आहार घ्यायला पाहिजे तेवढ्या प्रमाणात घेतला जात नाही. 

 

2) व्यायाम, शारीरिक श्रम जास्त करणे परंतु आहार कमी घेणे त्यामुळे योग्य 

पोषण शरीराला मिळत नाही.


3) हायपर थायराॅडिस्म आपल्या शरीरात एक ग्रंथ असतो. यामध्ये एक 

हार्मोन बनते. हे आपल्या मेटाबोलिज्म स्वस्थ ठेवण्यास मदत करते. 

जर हे हार्मोन्स जास्त प्रमाणात बनायला लागले तर मेटाबोलिज्म जास्त वाढते 

आणि भूक वाढते परंतु वजन कमी होते. 


4) डायबिटीज ज्या लोकांना माहित नसते कि त्यांना डायबिटीज आहे. 

यामध्ये भूक वाढते परंतु वजन कमी होत जाते. शरीरामध्ये इन्सुलिन कमी 

प्रमाणात तयार होते त्यामुळे जे अन्न खाल्या जाते त्यापासून उर्जा मिळत 

नाही.उलट ब्लडमध्ये शुगर तयार होते. 


5) पोटाची समस्या जसे कि Gastro Industrial disease यामध्ये खालेलं अन्न 

शरीराला लागत नाही अन्नाचे व्यवस्थित पचन होत नाही. 

        

6) आयरनची शरीरात कमी असल्याने भूक लागत नाही. 


7) विटाॅमिन बी12 ची कमी असल्याने वजन कमी होते.


8) डिप्रेशन आणि स्ट्रेस असल्याने भूक कमी लागते व वजन वाढत नाही.

  

9) काही व्यक्ती शारीरिक श्रम जास्त प्रमाणात करतात त्याप्रमाणात ते 

प्रोटीन कार्बोहायड्रेटस आहारात घेत नाही.


 कॅलरीजची आवशकता

शरीराचे वजन Mentain ठेवण्यासाठी कॅलरीजची आवशकता असते. 

जितक्या कॅलरीजची शरीराला आवशकता असते त्यापेक्षा जास्त कॅलरी 

घेतल्यास वजन वाढेल आणि याउलट कमी कॅलरीज घेतल्यास वजन कमी 

होईल त्यासाठी तुम्हाला कॅलरीज वाढविण्यासाठी रोजच्या आहारात Protin 

Intake वाढविणे. Protin चे काम असते मसल्स build करणे जेव्हा तुम्ही 

 Protin घेता तेव्हा तूमच्या मसल्स्ची ग्रोथ नैसर्गिकरित्या होते. 


किती प्रोटीन घ्यायला पाहिजे?

जर तुमचे वजन 50kg असेल तर 50 ते 75 gram प्रोटीन घ्यायला हवे.


वजन वाढविण्यासाठी व्यायाम योगासने आवश्यक 

ज्याप्रमाणे वजन कमी करण्यासाठी व्यायाम आवश्यक आहे अगदी त्याच 

प्रमाणे वजन वाढविण्यासाठी सुद्धा व्यायाम आवश्यक आहे. 

       

वजन वाढविण्यासाठी आहारात करा या पदार्थाचा समावेश 

1) दिवसाची सुरुवात 1 ते 2 ग्लास गरम पाणी पिल्याने करावी सकाळच्या 

वेळी गरम पाणी पिल्याने आपल्या शरीरातील Toxin बाहेर निघते आणि 

आपले मसल्स रीलक्स होतात. आणि ब्लड सर्कुलेषण चागले होते.


2) 6 ते 7 भिजवलेले बदाम,अक्रोट, किसमिस,काजू खावे. भिजवून खाल्याने 

यापासून मिळणारा लाभ अधिक प्रमाणात होतो. आणि पचायला हलके होते. 


3) बनाना शेक चे सेवन करावे 

बनाना शेक कसा बनवाल? 

मलाई असलेले दुध घ्यावे त्यात दोन केळी टाकावी व 4 ते 5 बदाम तसेच 

काजू, किसमिस, अक्रोट  टाकून मिक्सर मध्ये फिरवून घ्यावा. आणि हा शेक 

प्यावा. याच्या सेवनाने शरीराला योग्य प्रमाणात Nutrition मिळेल व वजन 

वाढविण्यास मदत होईल 


4) मोसमी फळांचे सेवन जसे सेफ, अंगूर,नाशपाती,अननस, डाळींब इत्यादी


5) हिरव्या भाज्यांचा समावेश जास्त करावा


6) उकडलेले अंडी सकाळी Break fast मध्ये खावे.  

  

7) आलूचा समावेश आहारात करावा आलुमध्ये कार्बोहायड्रेटस असते आणि 

आपल्या शरीराला एनर्जी देण्याचं काम आलू करते.


8) रोजच्या आहारात तुप, पिनट बटर इ समावेश करावा. 


9) शेगदाणे,राजमा,चणा, सोयाबीन,अंकुरित कडधान्ये,ओट्स, बाजरी, 

नाचणी, ज्वारी, white rice याचा आहारात समावेश करावा. 


10) दुध, पनीर, दही, चीज इत्यादीचा समावेश करावा. 


काही व्यक्तींचा असा समज आहे की एका वेळेस भरपूर खाल्ले कि वजन 

वाढते परंतु हे चुकीचे आहे Break fast, लंच, dinner च्या व्यतिरिक्त दर 3 

ते 4 तासांनी काहीतरी पोष्टिक खावे जसे सीड्स,नट्स, dry fruits इत्यादी

जेवणाच्या आधी पाणी न पिणे पाणी न पिल्यामुळे जास्त अन्न खाल्या जाईल. 

7 ते 8 तासांची झोप घेणे खूप आवश्यक आहे. जेव्हा तुम्ही निदान 7 ते 8 

तासांची झोप घेता तेव्हा तूमची  Body चांगली ग्रो करते. 

रात्री झोपायच्या एक तासाआधी गरम दुधामध्ये खजूर टाकून उकळावे व ते 

प्यावे झोप चांगली येते व वजन वाढते.    

स्ट्रेस फ्री राहणे बरेच वेळा भरपूर खाल्ले तरीही वजन वाढत नाही. कारण 

तणाव  म्हणून तणाव दूर ठेवावा.        

     



        

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या