Header Ads Widget

अनेक आजारांंवर उपयोगी पिस्ता

 नमस्कार मित्रांनो,


 पिस्ता खाल्याने शरीराला होतील हे मोठे फायदे

 वाचा आजच्या लेखात 

 


सुखामेवा हे आपल्या शरीराला खूप फायदेशीर असतात.यापासून शरीराला

अनेक पोषक तत्व मिळतात यापैकी एक म्हणजे पिस्ता हिरव्या रंगाचे पिस्ते

 हे मिठाईची शोभा वाढविण्यासाठी वापरतात. विटाॅमिन आणि प्रोटीनची

 कमी दूर करण्यासाठी पिस्ते खूप फायदेशीर असतात. 

पिस्ता हा काजू आणि अक्रोड पेक्षाही जास्त पोष्टिक आणि ताकतवार

असतो. प्रामुख्यानेफायबर, प्रोटीन, झिंक, कॉपर, आयरन, पोटॅशिअम,

 कॅल्शियम  यासारखे पोषक तत्व आढळतात.पिस्त्यांच सेवन हे शरीर निरोगी

 तर ठेवतेच आणि तुमचंं अनेक रोगांंपासून रक्षण करते.




1) पिस्त हा बलवर्धक,धातूवर्धक रक्तशुद्ध,पित्तवर्धक कफ नाशक,त्रिदोष दुर

 करण्यास उपयोगी असतो.


2) पिस्ताच्या सेवनामुळे डोळ्यांचे आजार दूर होतात.जर डोळ्याला

 कोणत्याही प्रकारचं इन्फेक्शन झालं असेल तर ते दूर होते आणि डोळे

   निरागी राहतात.



3) ज्यांच्या शरीरात नेहमी सुज येत असेल तर त्यांनी नियमित पिस्ताचं सेवन

 केल तर सूज कमी होण्यास मदत होते कारण पिस्त्यामध्ये प्रामुख्याने

 विटाॅमिन A,मॅगनेशिअम असतात जे सुजन कमी करतात.


4) पिस्ताच्या नियमित सेवनामुळे शरीरात कोणत्याही प्रकारचं संक्रमण होत

 नाही आणि झाले असल्यास त्यापासून लढण्याच काम हे पिस्ता करते म्हणून

 नियमित पिस्ता खायला हवा.




5) हृदयविकार असणाऱ्यांनी सुद्धा नियमित पिस्ता खावा.हृदयविकाराचा

 त्रास असणाऱ्यासाठी पिस्ता खूप फायदेशीर आहे कारण पिस्ता हा खराब

 कोलेस्ट्रोल ची मात्रा कमी करतो आणि चांगल्या कोलेस्ट्रोल ची मात्रा

 वाढवतो. आणि धमन्यांमध्ये जमलेल्या रक्ताचा प्रवाह सुरळीत करतो.


6) चेहऱ्यावर ग्लो वाढवायचा असेल आणि त्वचा मऊ व्हावी असे वाटत

 असेल तर नेहमी पिस्ताच सेवन करावे.पिस्तामध्ये भरपूर प्रमाणात Anti-

oxidants असतात. ज्यामुळे वाढत्या वयाच्या सुरकुत्या चेहऱ्यावर दिसत

 नाही.तसेच तरुण ठेवण्याचं काम हे पिस्ता करते.




7) चेहऱ्यावर सुरकुत्या, पिंपल्स, काळे डाग असतील तर दुध आणि

 पिस्त्याची पेस्ट करून चेहऱ्याला लावावी त्याने त्वचा मुलायम,कोमल

 होण्यास मदत होते.पिस्तामध्ये असणारे फॅटी ऍसिड आपल्या त्वचेमध्ये

 स्निग्धता बनवून ठेवते ज्यामुळे नैसर्गिक चमक चेहऱ्यावर येते.




8) स्मरणशक्ती चांगली होण्यासाठी, बुद्धि तल्लख होण्यासाठी पिस्ताचं सेवन

 गुणकारी ठरते कारण काजू आणि बदामांपेक्षाही पिस्तामध्ये जास्त पोषक

 घटक असतात.




9) जर तुमचे ब्लड प्रेशर कंट्रोल मध्ये राहत नसेल तर पिस्ताचं सेवन

 लाभकारी ठरत कारण पिस्ता  हा ब्लड प्रेशर नियंत्रित ठेवण्यास मदत

 करतो.


10) केस जर तुटत असेल, टक्कल पडले असेल तर तुम्हाला पिस्ताचं सेवन

 नक्की करायला पाहिजे. पिस्तामध्ये असलेल्या पोषक घटकांमुळे केसांचे

 तुटणे थांबुन केस अधिक मजबूत होतात.


11) पिस्त्यामध्ये कॅरोटीन,फाॅयटोरसायनो,विटाॅमिन E, Anti-oxidants, fatty

 acid इत्यादी प्रामुख्याने आढळते हे सर्व पोषकतत्व सर्व प्रकारच्या कॅन्सर

 पासून आपला बचाव करते. पिस्ताच नियमित सेवन केल्यास प्रोस्टेट कॅन्सर,

 स्तन कॅन्सर आणि फुफुसांचा कॅन्सर होण्याचा प्रभाव कमी करतो.


12) पिस्ता हा टाईप 2 डायबिटीजच्या रुग्णांंसाठी रामबाण आहे.

 आणि डायबिटीज पासून दूर ठेवण्यासाठी मदत करतो.तसेच

 पिस्त्यात असलेले प्रोटीन, फाॅस्फोरसला Amino acid मध्ये तोडण्याचं काम

 करतो आणि डायबिटीज कंट्रोलमध्ये राहण्यास मदत करतो.


13) पिस्त्यामध्ये विटाॅमिन B6 ची मात्रा खूप जास्त प्रमाणात असते विटाॅमिन

 B6 हे प्रोटीनआहे जे ऑक्सीजनला ब्लड मध्ये आणण्यास मदत करते. पिस्ता

 नियमित खाल्यास ब्लड मध्ये ऑक्सीजनची मात्रा वाढविण्यास मदत होते.

 आणि शरीरातील हिमोग्लोबिन पण वाढते पिस्ताच्या नियमित सेवनाने

 रक्ताची कमी होत नाही आणि होणाऱ्या आजारांपासून शरीराच संरक्षण

 करतो आणि शरीर स्वस्थ राहते.



14) पिस्त्यामध्ये उच्च फायबर असल्यामुळे पिस्ताच्या सेवांनामुळे पोट भरून

 राहते व लवकर भूक लागत नाही व वजन नियंत्रित ठेवण्यास मदत होते.


15) फास्ट फूड, जंक फूड, खाण्यापेक्षा एक मुठी पिस्ता खाल्यास शरीराला

 पोषकतत्व हि मिळेल आणि शरीर स्वस्थ राहील.


आज आपण पिस्त्यापासून शरीराला मिळणारे फायदे पहिले                     
चला तर मग भेटूया एका नवीन विषयासह.... लेख आवडल्यास    

SHARE करायला विसरू नका. 






























































         

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या