नमस्कार मित्रांनो,
केळी खाल्याने काय होते? वाचा आजच्या लेखात
केळी हे संपूर्ण फळांपैकी एक परिपूर्ण असे फळ आहे.वर्षभरही उपलब्ध
होणारे फळ आहे.केळामध्ये अनेक पोषक घटक असतात.केळी खाल्याने
नुसते वजन वाढते असा समज आहे. वजन तर वाढतेच पण इतरही
आजारांंवर केळी खूप फायदेशीर ठरते. केळीमध्ये भरपूर प्रमाणात कॅलरी
आणि ऊर्जा असते. केळी नियमित सेवन केल्याने शरीरात मांस व रक्ताची
वृद्धी होते. शरीर सशक्त बनते. आशिया खंडातील Jimnyastik सुवर्णपदक
विजेता चीनी खेळाडू लिनिंग याच्या व्यक्तिगत मतानुसार त्याच्या सफलतेचे
रहस्य केळी आहेत. कोणत्याही स्पर्धेत उतरण्यापूर्वी लिनिंग सहा केळी
खातो. चीनमधील अन्य खेळाडूचाही आवडता खुराक केळी हाच आहे.
केळीमध्ये प्रामुख्याने कॅल्शियम,फाॅस्फोरस,पोटॅशियम,मॅगनीज,लोह,
विटाॅमिन B6 आणि रायबोफ्लेव्हिन ,विटाॅमिन A,B,C,D इत्यादी पोषक
घटक मोठ्या प्रमाणात आढळते.यातून उष्मांक भरपूर प्रमाणात मिळते.
1) ज्यांचे हिमोग्लोबिन कमी आहे त्यांनी नियमित केळीचं सेवन करायला
पाहिजे.केळीच्या सेवनाने हिमोग्लोबिन वाढण्यास मदत होते.
2) ज्या महिलांना मासिक पाळी वेळेवर येत नाही त्यांनी नियमित केळीच
सेवन केल तर मासिक पाळी ही वेळेवर येते.
3) ब्लडप्रेशर नियंत्रित ठेवण्याचे काम हे केळी करते.ब्लडप्रेशर नियंत्रित
ठेवण्यासाठी नियमित केळीच सेवन करावे.
4) केळांमध्ये कमी प्रथिने, कमी क्षार आणि उच्च प्रतीचे पिष्टमय पदार्थ
असल्यामुळे मूत्रपिंडाचे आजार बरे करण्यासाठी केळी खूप फायदेशीर
आहे.
5) केळांमध्ये कॅल्शियम,पोटॅशियम मोठ्या प्रमाणात असते.म्हणून हाडांंचा
ठिसूळपणा टाळण्यासाठी रोज एक तरी केळी खावी.
6) ज्यांना पोट साफ होत नाही त्यांनी नियमित केळाचं सेवन केल तर पोट
साफ होते पचन क्रियेत सुधारणा होते.
7) ज्यांचे वजन कमी आहे आणि वजन वाढवायचे आहे त्यांनी रोज दोन केळी
खावी.तसेच दुध,केळी आणि थोडे सुखे मेवे टाकून शेक बनवावा आणि तो
रोज प्यावा असे केल्यास लवकर वजन वाढण्यास मदत होईल.
8) केळी खाल्यामुळे शरीराला शक्ती तर मिळतेच पण रक्तातील साखरेचे
प्रमाणही नियंत्रित ठेवण्याचे काम हे केळी करते.
9) केळीमध्ये फायबरच प्रमाण खूप जास्त असते केळीमध्ये विरघळणारे
आणि न विरघळणारे दोन्ही प्रकारचे तंतुमय पदार्थ असतात.
10) केळीच्या सेवनामुळे आपल्या शरीरात असे काही हार्मोन्स तयार होते की
त्यामुळे आपण तणावमुक्त होवून आनंदी राहतो. म्हणून रोज नियमित
केळीच सेवन करायला हवे.
11) केळीमध्ये असे काही घटक आहे की ज्यामुळे आपली त्वचा उजळते व
नैसर्गिक चमक चेहऱ्यावर येते.
12) केळीमध्ये तंतुमय पदार्थाच प्रमाण खूप जास्त असते त्या तंतुमय पदार्था
मुळे आपल्या हृदयाचे स्वास्थ सुद्धा चांंगले राहते.
१३) केळीमध्ये विटामिन A असल्यामुळे आपल्या डोळ्यांची दृष्टी चांगली
राखण्यास मदत होते.
14) अल्सर आजार असल्यास केळी खाल्याने आराम मिळतो.केळी खाल्याने
पडत असलेले अल्सर चे जंतू नष्ट होतात.
15) एका संशोधनानुसार जर रोज एक केळ खाल्ले तर दमा होण्याची
शक्यता 35% कमी असते.
16) जेवणानंतर केळी खाल्याने पचन क्रिया चांगली होते.अन्नाचे चांगले पचन
होते.
17) शारीरिक व्यायाम केल्यानंतर केळी खावे यांनी आपल्याला उर्जा मिळते.
18) केळामध्ये मॅग्नेशियम भरपूर प्रमाणात असते त्यामुळे रक्त पातळ
करण्यास मदत करते.
केळी किती खावे?
दिवसांतून तुम्ही एक ते दोन केळी खाणे गरजेचे आहे.यापेक्षा जास्त खाल्ले
तर त्याचे शरीरावर दुष्पपरिणाम होतात.
उपश्यापोटी केळी खाल्ले तर पोटात गॅसेसची समस्या उद्भवू शकते.
केळी कोणी खावू नये?
ज्यांना मधुमेह आहे अश्या व्यक्तीनी केळी खावू नये.
ज्यांचे वजन जास्त आहे अश्या व्यक्तीनी केळी खावू नये.कारण एका केळा
मध्ये 100 ते 120 कॅलरीज असतात त्यामुळे आणखी वजन वाढू शकते.
आज आपण केळाच्या सेवनाने शरीराला काय फायदे होतात ते पहिले
चला तर मग भेटूया एका नवीन विषयासह...
लेख आवडल्यास LIKE करा आणि SHARE करायला विसरू नका.


0 टिप्पण्या