Header Ads Widget

गव्हाचे अंकुर -एक अनुपम औषध


                                       



गहू पेरल्यानंतर जे एकच पान उगवून वर येते त्याला गव्हाचे अंकुर असे        

म्हणतात. आपल्याकडे नवरात्र या उत्सवामध्ये घरोघरी लहान -लहान 

मातीच्या मठात माती घालून अश्या प्रकारे गहू पेरले जातात. गव्हाच्या 

अंकुराचा रस, प्रकृतीच्या गर्भात दडलेल्या औषधाच्या अक्षय भांडारामधून 

मानवाला मिळालेली एक अनुपम भेट आहे. आरोग्य प्राप्तीमध्ये हा रस 

इतका अधिक गुणकारी सिद्ध झाला आहे की शास्त्रज्ञांनी याला हिरवे रक्त 

(Green blood) असे संबोधित करून सन्मानित केले आहे. डाॅक्टर एन. 

विगमोर  या विदेशी महिलेनी अनेक असाध्य रोगांवर गव्हाच्या कोवळ्या 

अंकुरच्या रसाचे सफल प्रयोग केले आहेत. गव्हाच्या अंकुरच्या रसाच्या 

सहाय्याने केलेल्या उपचारांनी 350 हून अधिक रोग बरे केल्याचे  

आश्चर्यकारक परिणाम पाहवयास मिळाले आहेत. जीव -वनस्पती 

शास्त्रांमधील हा अत्यंत बहुमोल प्रयोग आहे.


गव्हाच्या अंकुरच्या रसात जवळ जवळ सर्व क्षार व जीवनसत्वे उपलब्द 

आहेत. यामुळेच शरीरात ज्याचा अभाव असेल त्याची पूर्ती या रसामुळे 

आश्चर्यकारकरित्या होते. या रसाच्या सहाय्याने प्रत्येक ऋतूमध्ये नियमित 

स्वरुपात खनिज द्रवे, जीवनसत्वे क्षार आणि शरीर शास्त्रात सांंगितलेल्या 

पेशी जिवंत ठेवण्यासाठी आवश्यक सर्व तत्वे प्राप्त करता येतात.      

  

गव्हाच्या अंकुरच्या रसात रोगाचे निर्मुलन करण्याचे एक अदभूत शक्ती 

विद्यामान आहे. शरीरासाठी हे एक शक्तिशाली टाॅनिक आहे. यात नैसर्गिक 

स्वरुपात कार्बोहायड्रेटस, श्रेष्ठ प्रोटीन्स, सर्व जीवनसत्वे व क्षार उपस्थित 

आहेत. याचे सेवन केल्याने असंख्य लोकांना विभिन्न प्रकारच्या रोगांंपासून 

मुक्ती मिळाली आहे. 


हजारो रुग्णांनी व निरोगी लोकांनीही आपल्या रोजच्या आहारात कसलाही 

बदल न करता, गव्हाच्या अंकुरच्या रसाद्वारे खूप कमी कालावधीत

आश्चर्यकारक लाभ प्राप्त केले आहेत. ते आपला अनुभव सांगतात की, 

गव्हाच्या अंकुरच्या रसात अनेक रोग बरे करण्याची शक्ती आहे.


गव्हाच्या अंकुराच्या सेवनाने काय फायदे होतात ते पाहूया 

1) रोज एक ग्लास गव्हाच्या अंकुराचा रस पिल्याने मूत्राशयातील मूतखडा 

विरघळण्यास मदत होते.        

2) डोळ्यांचे दाैर्बल्य सुधारण्यास मदत होते. 

3) हृदय स्वस्थ होते.     

4) मधुमेह  कंट्रोल मध्ये राहण्यास मदत होते. 

5) पायारीया आणि दाताचे आजार बरे होतात. 

6) कावीळ बरा होतो. 

7) अपचन, गस, बद्धकोष्ठता, मलावरोध दूर होते. 

8) अ, ब, इ इत्यादी जीवनसत्वाच्या अभावामुळे होणारे रोग बरे होतात. 

9) संधिवात, सूज, आमवात बरा होतो. 

10) त्वचेच्या संवेदनशीलते संबंंधी स्कीन अलर्जी बरी होण्यास मदत होते. 

11) केसाचे तुटणे कमी होते व केस स्वस्थ होतात.

12) शरीरात रोगप्रतिकारशक्ती वाढते. 

13) कॅन्सरसारखे असाध्य रोग बरे होतात  

14) शरीर ताम्रवर्णी व पुष्ट्  होण्यास उपयोगी 

गव्हाचे अंकुर उगविण्याची पद्धत 

कुंडी घेवून त्यात माती घालावी रासायनिक खताचा उपयोग अजिबात करू 

नये.पहिल्या दिवशी कुंडीतील सर्व माती दबून जाईल इतके गहू पेरावेत. 

पाणी घालून  कुंडी सावलीत ठेवावी. या कुंडीवर कडक उन  येऊ नये याची 

काळजी घ्यावी. अश्या प्रकारे दुसऱ्या दिवशी दुसऱ्या कुंडीत गहू पेरावेत 

दररोज एक एक कुंडी वाढवत अश्या आठ ते नऊ कुंड्या तयार कराव्यात.  

सर्व कुंड्याना रोज पाणी द्यावे. पहिल्या दिवशी पेरलेले गहू कापून त्याचा 

उपयोग करावा. या रिकाम्या झालेल्या कुंडी मध्ये पुन्हा गहू पेरावेत. यासाठी 

चुकूनही प्लास्टीक कुंडी  वापरू नये. 

साधारणपणे 8 ते 10 दिवसात गव्हाचे अंकुर 5 ते 7 इंच उंच होतात. अश्या 

अंकुरामध्ये सर्वाधिक गुण असतात. जसजशी पाने सात इंचपेक्षा अधिक उंच 

होऊ लागतात. तसे तसे त्यातील गुण  कमी होऊ लागतात. म्हणुनच त्याचा 

संपूर्ण लाभ घेण्यासाठी पाने सात इंच इंच होताच उपयोगात आणली 

पाहिजेत. 

गव्हाचे अंकुर मातीच्या पृष्टभागाजवळून कात्रीच्या सहाय्याने कापावेत किवा 

मुळासह उपटूनही वापरता येतात. रिकाम्या झालेल्या भांड्यात पुन्हा गहू 

पेरावेत. अश्या प्रकारे गहू पेरणे चालू ठेवावेत.

गव्हाचा रस बनविण्याची पद्धती 

गव्हाचे अंकुर कापावेत आणि ते लगेच धुवावेत. धुतल्यानंतर लगेचच मिक्सर 

मध्ये रस काढून घ्यावा.व गाळणीने गाळून घ्यावा. हा रस बनविताना त्यात 

मध, अद्रक सुद्धा टाकता येते. यामुळे स्वाद आणि गुण वाढतात. व 

मळमळत नाही. एक गोष्ट विशेष ध्यानात ठेवावी की अंकुराचा रस 

काढताना मीठ किवा लिंबूचा  रस कधीही घालू नये. 

एकदा रस काढल्यानंतर हळूहळू रस प्यावा. रस काढून ठेवू नये लगेच 

सेवन करावे. कारण त्यातील पोषक तत्व नष्ट् होवून जातात. 

गव्हाच्या रसाचे सेवन कधी करावे?

दिवसातून कोणत्याही वेळेस अंकुराचा रस घेता येतो. प्रांत:काळी उपश्या 

पोटी रस पिल्याने अधिक फायदा होतो.  हा रस घेण्यापूर्वी अर्धा तास व 

घेतल्या नंतर अर्धा तास काहीही खावू नये. अनेक जणांना सुरुवातीला हा रस 

घेतल्यानंतर मळमळल्या सारखे वाटते, उलटी होते किवा सर्दी होते. परंतु 

यामुळे घाबरू नये. शरीरात किती प्रमाणात दोष एकत्रित झाले आहेत याची 

ही प्रतिक्रिया हे लक्षण आहे. सर्दी, जुलाब किवा उलटीद्वारे शरीरात एकत्रित 

झालेले हे दोष बाहेर पडतात. 

रस काढण्याची सोय नसल्यास गव्हाचे अंकुर चावून देखील खाता येतात. 

यामुळे दात व हिरड्या मजबूत होतात. तोंडाला दुर्गंधी येत असल्यास 

दिवसातून तीन वेळा थोडे थोडे अंकुर चावून खाल्याने दुर्गंधी दूर होते.

डॉक्टरांच्या मदतीशिवाय गव्हाच्या अंकुराचा प्रयोग सुरु करा व दुर्बल 

झालेल्या शरीराला केवळ तीन आठवड्यातच ताजे टवटवीत व स्फ्रुतीशाली 

बनवा.    

 

रामबाण इलाज 

अमेरिकेत जीवन मरणाशी झुंजत असणाऱ्या रुग्णांवर प्रयोग करण्यात आला 

त्या रुग्णांना दररोज चार मोठे ग्लास भरून गव्हाच्या अंकुराचा रस दिला 

गेला. आणि जगण्याची आशाच सोडून दिली आहे अश्या रुग्णांना देखील 

खूप कमी दिवसात आश्चर्यकारक फायदा झालेला दिसून आला आहे. 

गव्हाच्या अंकुरच्या रसाने रुग्णांना जर इतका फायदा होत असेल तर निरोगी 

व्यक्तींनी  घेतल्यास त्यांना किती फायदा होईल?  

स्वस्थ आणि सर्वोत्तम 

गव्हाच्या अंकुराचा रस दुध, दही व मासांपेक्षा अनेक पट अधिक गुणकारी 

आहे. दुध व मासांतही जे नाही त्याहून अधिक या अंकुरच्या रसात आहे 

शिवाय दुध, दही व मासांपेक्षा कितीतरी पटीने स्वस्त आहे.                

नवजात बालकांपासून ते घरातील लहान-मोठे, आबालवृद्ध सर्वजन गव्हाच्या 

अंकुराचा रस सेवन करू शकतात. नवजात बाळाला दररोज पाच थेंब रस 

देता येतो.        

स्वस्त, सुलभ तरीही अत्यंत माैल्यवान नैसर्गिक अमृताचे सेवन करा व 

आपले व आपल्या कुटुंबाच्या स्वास्थचे रक्षण करा.       


 

   





       

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या