Header Ads Widget

अश्या प्रकारे करा पाण्याचे सेवन अनेक आजार होतील दूर

आपल्या शरीरातील विषारी पदार्थ, Toxins बाहेर काढण्याचे काम 

हे पाणी करते.वजन वाढविण्यापासून ते वजन घटविण्यापर्यंत पाणी हे 

एक महत्वपूर्ण ठरते.                                                 




पाणी हेच जीवन आहे. आपल्या संपर्ण शरीरात 70% पाणी आहे. आपल्या 

संपूर्ण शरीराचे कार्य व्यवस्थित चालण्यासाठी पाण्याची गरज पडते. आपण  

एकदा अन्नाशिवाय राहू शकतो पण पाण्याशिवाय नाही.जेव्हा आपला जन्म 

होतो तेव्हा आपले शरीर हे 75% पाण्याने बनलेलं असते. वाढत्या वयानुसार 

हे पाणी कमी कमी होत जाते. सामान्यत: पुरुषाच्या शरीरात पाण्याची मात्रा 

60% असते तर महिलांच्या शरीरात 55% पाणी असते. हे पाणी आपल्या 

शरीरात कुठे असते हे जाणून घेवूया. 


काही पाणी आपल्या लिव्हर आणि किडनीमध्ये असते तर काही पोटात तर 

काही पाण्याचा भाग मुत्राशय  इत्यादी ठिकाणी आढळते. आपले हृदय 

आणि मेंदू 75% पाण्याने बनलेलं असते. आपल्या फुफुसात 83% पाणी 

समाविष्ट असते. आपल्या संपूर्ण शरीरात पाणी सर्वात जास्त सेल्स, 

कोशिकांमध्ये असते. आपली हाडे जी कोरडी वाटतात त्यात सुद्धा 31% 

पाणी असते.

आपल्याला असे वाटते की आपण कधीही कितीही पाणी पिऊ शकतो. परंतु 

हे पूर्णपणे चुकीच आहे. 

 

पाणी कमी पिल्यामुळे आणि पाणी चुकीच्या पद्धतीने पिल्याने हे  

आजार होतात 


1) सांधेदुखी

2) कब्ज, एसिडीटी, पोटाचे विकार, गॅस  

3) मायग्रेन 

4) त्वचेवर पिंपल्स, डाग, त्वचा निस्तेज होणे, त्वचा कोरडी पडणे, 

सुरकुत्या 

5) अन्नाचे व्यवस्थित पचन न होणे  

6) शरीरात कमजोरी व आळस, सुस्ती 

7) झोप चांंगली न येणे 

8) किडनीचे आजार

9) युरीक एसिड 

10) वजन वाढणे  

यासारखे चाळीस प्रकारचे रोग फक्त पाणी कमी पिल्याने किवा चुकीच्या 

पध्दती पिल्याने होतात.  

जी व्यक्ती पाणी योग्य पद्धतीने पिण्याची सवय लावून घेते ती व्यक्ती अधिक 

वृद्धापकाळापर्यंत स्वस्थ आणि निरोगी राहते.हाडे मजबूत राहतात केसांचे 

आरोग्य निरोगी राहते. आणि त्वचा जवान राहण्यास मदत होते. त्वचेवर 

नैसर्गिक ग्लो येतो. पोट नेहमी साफ राहते. इतकेच नाही तर केवळ योग्य 

पद्धतीने पाणी पिल्याने अनेक प्रकारच्या गंभीर आजारांंपासून वाचता येते.    

कोणताही डाएट किंवा व्यायाम न करता केवळ योग्य पद्धतीने पाणी पिल्यास

एका महिन्यात 5 किलो पेक्षा अधिक वजन कमी करता येते. 

पाणी पिण्याचे नियम खूप सोपे आहे पण त्यापासून मिळणारे लाभ मौल्यवान 

आहेत चला तर जाणून घेवूया.


पाणी किती प्यावे?

प्रत्यक व्यक्तीसाठी पाण्याची मात्रा ही त्या व्यक्तीच्या  आकार, वजन 

फिजिकल Activity आणि ऋतू यावर अवलंबून असते. आपल्या शरीरात 

मल, मूत्र आणि घामाद्वारे पाण्याची मात्रा सतत कमी होत असते.यातून 

आपण 2 ते 3 लिटर पाणी शरीरातून बाहेर काढतो. म्हणून सामान्यतःएका 

पुरुष व्यक्तींना अडीच लिटर ते साडे तीन लिटर पाणी पिण्याचा सल्ला दिला 

जातो. आणि महिलांसाठी 2 ते 3 लिटर पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो.

    

जर तुम्ही सकाळी किवा संध्याकाळी वर्क आऊट करत असाल तर पाण्याची 

मात्रा वाढवायला पाहिजे तसेच गर्मीच्या दिवसात यापेक्षा थोडे अधिक पाणी 

प्यायला हवे. जास्त  पाणी पिणे शरीरासाठी चागले असते परंतु गरजेपेक्षा 

अधिक पाणी पिणे किडनीसाठी हानिकारक असते.

पाणी कधी प्यायला पाहिजे? 

चुकीच्या वेळी पाणी पिल्याने आपल्या शरीरावर सर्वात जास्त वाईट प्रभाव 

पडतो.  स्वस्थ आरोग्य आणि पाण्यापासून मिळणारे पोषक तत्व पूर्णपणे 

उपयोगात आणायचे असेल तर आपल्या दिवसाची सुरवात चहा किवा 

काफी न पिता 1 ते 2 ग्लास पाणी सकाळी उठून नक्कीच प्यावे. उपश्यापोटी 

पाणी पिल्याने आपल्या पोटातील आतड्यांची चागल्या पद्धतीने स्वच्छता 

होते. 

आयुर्वेदात सागितल्याप्रमाणे आपल्या तोंडात सकाळी जमा झालेल्या 

लाळेमध्ये आवश्यक असलेले एझाईम्स असतात. जे उपश्यापोटी पाणी 

पिल्याने आपल्या शरीरात प्रवेश करतात. आणि त्याचा आपल्या आरोग्यावर 

चागला प्रभाव पहावयास मिळतो. 

एक ग्लास पाणी 250ml असते याप्रमाणे अडीच लिटर ते तीन लिटर पाणी 

प्यावे. सकाळी उपश्यापोटी 2 ग्लास पाणी 500ml प्यावे. 1 ग्लास पाणी 

नाश्त्या झाल्यावर अर्ध्या तासांनी प्यावे.  

1 ग्लास पाणी दिवसा जेवणाच्या 40 मिनिटा अगोदर व 1 ग्लास पाणी 

जेवणाच्या 40 मिनिटा नंतर प्यावे. 2 ग्लास पाणी संध्याकाळी एक एक 

तासाच्या गप मध्ये प्यावे. 1 ग्लास पाणी रात्रीच्या जेवणाच्या 40 मिनिटा 

अगोदर व 1 ग्लास पाणी रात्री जेवण झाल्यानंतर 40 मिनिटांनी प्यावे.         

याशियाय जर तुम्ही वर्कआउट करत असाल किवा हार्डवर्क चे काम असेल 

तर अश्या वेळी अर्धा अर्धा ग्लास पाणी पीत राहावे. 

पाणी कधी नाही प्यायला पाहिजे?

जेवण करण्याच्या आधी लगेच पाणी पिऊ नये किवा जेवण झाल्यानंतर 

लगेच  पाणी पिऊ नये असे केल्यास खालेल्या अन्नाचे चागल्या प्रकारे पचन 

होत नाही. जर तुम्हाला आफिस मध्ये बसून काम आहे  आणि तुम्ही जर 

जेवणं नंतर लगेच पाणी पीत असाल तर  गस, एसिडीटी बनते.   

जे व्यक्ती जेवणं नंतर लगेच पाणी पितात त्यांना पोटात जळजळ, एसिडीटी 

होते. जर अन्नाचे योग्य पद्धतीने पचन होत नसेल तर शरीरात कोलेस्ट्रोल वाढू 

लागतोआणि हे शरीरात युरीक असिडची मात्र वाढवते.म्हणून जेवणा आधी 

किवा जेवणानंतर लगेच पाणी पिऊ नये जर तुम्ही सुखे अन्ना खात असाल 

तर 2 ते 3 गुट पाणी पिऊ शकता. तुम्ही पाणी पिल्याशियाय राहत नसाल तर 

ताक, लिंबू पाणी, फळांचा रस प्यावा. रात्रीच्या जेवणानंतर पाण्याऐवजी 

दुधाचे सेवन करता येवू शकते.  

चहा किवा काफी पिल्यानंतर थंड पाणी कधीही पिऊ नये कारण असे 

केल्यास आपल्या गळ्याला आणि टासिल साठी त्रासदायक ठरते. 

चवीने  आबट असलेली रसदार फळ खाल्यानंतर लगेच पाणी पिणे टाळावे. 

कारण यावर पाणी पिल्यास फळाचे योग्य पद्धतीने पचन होत नाही व सर्दी 

खोकला होतो.   

पाणी कसे प्यावे? 

पाणी कधीही हळूहळू एक एक घुट प्यावे. पाणी पिताना पाणी तोंडात काही 

वेळ धरून ठेवावे. व नंतर ते प्यावे. हा पाणी पिण्याचा सर्वात्तम मार्ग आहे. 

थोडे थोडे पाणी पिल्याने आपण अनेक आजारापासून लांब राहतो. तसे च 

थोडे थोडे पाणी पिल्याने तोंडातील लाळही पोटात जाते हा प्रयोग सकाळी 

करणे लाभदायक ठरते. 

घाईघाईने पाणी पिऊ नये तसेच एका वेळेस जास्त पाणी पिऊ नये एका 

वेळेस शरीरात फक्त एक ग्लास म्हणजे 250ml पाणी पचवण्याची क्षमता 

असते. गरजेनुसार जास्त पाणी पिल्यास शरीराला योग्य प्रकारे पचत नाही 

आणि मूत्रद्वारे ते बाहेर निघते. 40 मिनिटे ते 1तासाचा  गप ठेवून 1ग्लास 

पाणी घुट घुट प्यायला पाहिजे.      

कधीही मान वर करून पाणी पिऊ नये. पाणी कधीही बसूनच  प्यावे उभ्याने 

पाणी पिऊ नये, चालता चालता  पाणी पिऊ नये याने शरीरात गस निर्माण 

होते. त्यामुळे शरीरातील आतल्या भागात दबाव निर्माण होतो.   

हळूहळू पाणी पिणे, बसून पाणी पिणे, घाईघाईने उभ्याने पाणी पिणे एकाच 

पाण्याचा प्रभाव आपल्या शरीरात वेगवेगळ्या प्रकारे होतो. 

हळूहळू पाणी पिल्याने आपल्या शरीराचा PH लेवल कंट्रोल मध्ये राहण्यास 

मदत होते. तसेच पोटातील असिड  सुद्धा शांत होते. हळूहळू पाणी पिल्याने 

तोंडातील लाळ पोटात जाते त्यामुळे आपली पचनक्रिया चागली राहते. 

आणि शरीराची चरबी वाढत नाही. 

उभे राहून पाणी पिल्यास शरीरातील आतमधील अंग आणि नसा कमजोर 

होतात, गस निर्माण होते आणि सांधेदुखीचा त्रास उद्भवतो.

कधीही फ्रीजमधील खूप जास्त थंड पाणी बर्फाचे पिऊ नये नेहमी सामान्य 

तापमान असलेले पाणी प्यावे. पुष्कळ लोकांना वाटते की फ्रीजचे पाणी 

पिल्यास आपले शरीर थंड करतो परंतु असे नाही बर्फाचे थंड पाणी जेव्हा 

आपल्या शरीरात जाते तेव्हा सुरुवातीला ते थंड असते नंतर काही वेळातच 

ते पाणी शरीरात खूप गरम होते. जे आपल्या शरीराला थंड करण्याऐवजी 

गरम करते.      

थंड पाणी पिल्याने खूप कमी फायदे होतात जे व्यक्ती नेहमी थंड पाण्याचे 

सेवन करतात त्यांच्या शरीरात अन्नाचे पचन चागले होत नाही. जास्त 

प्रमाणात थंड पाणी पिल्याने कब्ज, गस, डोकेदुखी  सारख्या समस्या 

उद्भवते. म्हणून नेहमी सामान्य तापमान असलेले पाणी प्यावे. तसेच 

पावसाळ्यात आणि हिवाळ्यात पाणी थोडे  गरम करून प्यावे. कारण गरम 

पाणी पिल्याने अन्न लवकर पचते. कब्ज, राहते त्यांनी थोडे पाणी गरम  

करूनच  प्यावे.गरम पाणी सर्दी, खोकला, सायनससाठी फायद्याचे ठरते.  

ज्यांना हाय ब्लडप्रेशर ची समस्या आहे त्यांनी गरम पाणी पिऊ नये.  

पाणी पिण्याचे हे नियम इतके सोपे आहेत कि एक आठवड्यात तुम्ही जर हे 

नियम पाळले तर अनेक आजारापासून दूर राहता येते. 


        





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या