Header Ads Widget

पालक आरोग्यासाठी लाभदायक




                                                        


                        
                        

  
आज आपण पालक आपल्या शरीरासाठी कशी फायदेशीर आहे. ते आपण

 पाहणार आहोत पालकमध्ये अनेक प्रकारचे जीवनसत्व आढळून येतात.

 जसे, आयोडीन, मॅगनेशियम, पाॅटेशियम , लोह, कॅल्शियम, फाॅस्फोरास,

 प्रथिने, खनिजे, मॅगनीज, कॅरोटीन,अमिनो असिड, तंतुमय आणि पिष्टमय

 पदार्थ असतात.  तसेच पालक मध्ये A, E, K, C, B Complex हे जिवनसत्व

 असतात. पालक मध्ये फॅलिक असिड भरपूर प्रमाणात असते.
                                     




 1) जी व्यक्ती मांसाहार करीत नाही त्यांना प्रथिनांची कमतरता दिसून येते.

    त्यांच्यासाठी पालक अतिशय  उपयुक्त आहे. अश्या व्यक्तीनी पालक

    खाणे खूप गरजेचे असते प्रथिनांची कमतरता भरून निघते.


2) ज्या व्यक्तीनां एनिमिया हा आजार झाला आहे त्यांनी पालकची भाजी

 अवश्य  खायला पाहिजे. पालक मध्ये रक्तवर्धक गुणधर्म आहे. पालकच्या

 नियमित सेवनाने रक्त तर वाढतेच आणि रक्त शुद्ध होते.


 3) पालकमध्ये अ जीवनसत्व भरपूर असल्यामुळे ज्या व्यक्तीनां डोळांचा

   आजार आहे,रातआंंधळेणा आहे  त्यांनी पालकचे नियमित सेवन करावे.

    पालकच्या सेवनामुळे डोळांचे आरोग्य चांगले  होण्यास मदत  होते.

                                       


4) ज्यांंना एक्झीमा झाला आहे त्यांनी पालकाच्या देठाची पेस्ट करून हि 

    लिबुंच्या रसात लावावी असे केल्यास एक्झीमा बरा होतो.


5) पालकच नियमित सेवन केल्याने पायारीया हा रोग होत नाही.


6) नियमित पालक सेवन केले तर पोट साफ होते. व कब्जपासून मुक्ती

     मिळते.


 7) जर वारंवार लघवी लागत असेल तर रोज रात्री पालकची भाजी खावी असे

    केल्यास फायदा होईल.

 

                           
 8) पालकचा रस 25 ml व गाजराचा रस 50 ml असे दोन्ही मिक्स करून

    पिल्यास शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होण्यास मदत होते.

 
9) पालकच्या रसाने जर गुळल्या केल्या तर खोकला,गळ्याला असलेली सूज 

    कमी होते.


10) पालकच्या रसाने जर गुळल्या केल्या तर दातांतून रक्त येण्याचे थांबते.

     तसेच दातांचा पिवळेपणा नाहीसा होतो व दात पांढरेशुब्र होतात.


11) केस गळत असेल तर पालकचा रसात थोडे लिबुंं टाकावे व  तो रस प्यावा

फायदा होतो.


 12) एक कप पालकच्या रसात भाजलेलं थोड जिरं  आणि काळेमिरे बारीक

करून टाकावे  व तो रस एक महिना प्यावा असे केल्यास हृदय मजबूत

होते.व हृदयाचा त्रास होत नाही.


१३) पालकमध्ये कॅरोटीन आणि क्लोरोफिन चे तत्व असतात जे कॅन्सरपासून

        बचाव करतात.

 


14) नेहमी चितां आणि तणावात  राहणाऱ्या व्यक्तीसाठी  पालकाचा रस

फायदेशीर ठरतो पालक मध्ये असलेले झिकं आणि मॅगनेशियम शरीराला 

तणाव मुक्त करतात.


15) पालकाचा रस हायब्लडप्रेशर कंट्रोल मध्ये ठेवण्यासाठी पण लाभदायक

आहे.
 

 16)  गर्भवती महिलांनी जर पालकचं सेवन केल तर आयरनची  रक्ताची

कमी होणार नाही.

 
17) थाॅयराईड असेल तर 100 ग्राम पालक रसामध्ये थोड सहद आणि

जीऱ्याच चूर्ण टाकून घेतल्यास खूप फायदा होतो.


 18) पालकमध्ये असलेले मिनरल शरीरामध्ये असलेल्या PH लेव्हलला

कंट्रोल ठेवण्यासाठी पण महत्वपूर्ण आहे.


19) पालकचा रस Anti Aging साठी खूप लाभदायक आहे तसेच पिंपल्स,

काळे डाग साठीपण लाभदायक आहे.

   
20) पालक रसाच्या नियमित सेवनाने स्मरणशक्ती पण चांगली होते.
 
 
21)  पालकच नियमित सेवन केल्याने  हाडे सुद्धा मजबूत होतात.
 

आज आपण पालकचे शरीरासाठी काय फायदे होतात ते बघीतले.

चला तर मग भेटूया एका नवीन विषयासह...

लेख आवडल्यास  SHARE करायला विसरू नका. 










 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या