नमस्कार मित्रांनो,
उत्तम आरोग्यासाठी गाजर
आज आपण गाजराचे आपल्या शरीरासाठी काय काय फायदे आहेत ते
पाहणार आहोत. हिवाळ्यात आपल्याला लाल प्रकारचे गाजर मिळते.तर
सिडचे केशरी रंंगाचे गाजर आपल्याला बाराही महिने उपलब्ध होतात.
गाजरापासून आपण सलाद, हलवा,ज्यूस, कोशिंबीर इत्यादी बनवू शकतो.
गाजरामध्ये अनेक प्रकारचे पोषक घटक आढळून येतात.
गाजर हे एक Anti Oxidants रिच फूड आहे. हे आल्कलाईन फळ किंवा
भाजी आहे. त्यामुळे ते आपल्या रक्तातील PH लेवल बॅलेन्स ठेवण्यास मदत होते.
1) रक्ताचे प्रमाण वाढते.
गाजारातील पोषकतत्वामुळे आपलं रक्त शुद्ध होण्यास मदत होते.
रक्ताभिसरण सुधारते.रक्त पण वाढते आणि त्यामुळे आपले आरोग्य
चांंगले राहण्यास मदत होते.
2) मधुमेहासाठी उपयोगी
गाजराचे क्लायसेमिक ईडेक्स लो असल्यामुळे आपल्या रक्तात साखर
लवकर मिसळत नाही. त्यामुळे ते मधुमेहासाठी फायदेशीर ठरते.
3) उच्च रक्तदाबांवर फायदेशीर
गाजरात फायबर आणि पोटॅशिअमचा प्रभाव चांगला असल्यामुळे उच्च रक्तदाबांवर ते परीणामकारक ठरते.
4) डोळ्यांचे आरोग्य सुधारते
गाजरात विटामिन A भरपूर प्रमाणात असल्यामुळे डोळ्यांची दृष्टी चांगली
ठेवण्यासाठी मदत होते. आणि म्हणूनच आपण जर गाजराच सेवन केलं तर
चष्मा लागत नाही.
5) जंत नाहीसे होतात
गाजरामध्ये फायबर जास्त प्रमाणात असल्यामुळे पोटांतील किटाणू
घालवन्याच काम हे गाजर करते आणि पोटाला साफ ठेवण्यास मदत
होते.व पोटाचंं आरोग्य सुधारते.
6) हृदय स्वस्थ ठेण्यास मदत
गाजरामध्ये कॅल्शियम,फायबर,विटामिन C, विटामिन A असते त्याने
हृदयरोगांंवरही मात करता येते.गाजर खाल्याने हृदयाचं आरोग्य चांगल
राहते. कोलेस्ट्रॉल नियत्रंणात राहतो. आणि स्ट्रोकची शक्यता पण कमी होते.
7) कॅन्सरवर उपयोगी
गाजरामध्ये कॅरोटीन आणि Anti Oxidants गुणधर्म असल्यामुळे
कॅन्सर सारखा रोगांंवर देखील ते फायदेशीर ठरतं. गाजर सेवन केल्यास
कॅन्सरच्या सेल्सची वाढ होत नाही. त्याचा नाश होतो.पोटांंचा कॅन्सर,लग्स
कॅन्सर, प्रोस्टेड कॅन्सर पासून ते आपलं रक्षण करते.
8) रोगप्रतिकारशक्ती वाढते
गाजरमध्ये विटामिन C च प्रमाण जास्त असल्याने आपली
रोगप्रतिकारशक्ती वाढ विन्यास मदत होते. गाजराचा रस आणि मध एकत्र
करून प्याल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते.
9) वजन कमी करण्यास उपयोगी
वजन कमी करण्यासाठी गाजराचा जूस प्यावा. वजन कमी होते व
वजन वाढत नाही.
10) एनिमिया दूर होतो
गाजरापेक्षा गाजराच्या पानांमध्ये लोह जास्त असते. त्याने अनिमिया दूर
होतो.
11) स्वस्थ त्वचा
तुम्हाला तरुण दिसाव ,आपल्या चेहऱ्यावर ग्लो यावा असं वाटत असेल तर
गाजराचा एक ग्लास जूस प्यावा फायदा होतो. गाजराच्या जूसचे नियमित
सेवन केल्याने डोळ्यांखाली काळी वर्तुळे, केस, नखे चांंगली
राहण्यासाठी मदत होते.
12) शारीरिक आणी मानसिक वाढ चांगली होते
लहान मुलांना गाजर खाण्यास दिले तर त्यांची शारीरिक आणी मानसिक वाढ
चांगली होण्यास मदत होते.
१३) हाडाचं आरोग्य उत्तम
गाजरात विटामिन K च प्रमाण चागलं असल्यामुळे हाडाचं आरोग्य उत्तम
ठेवण्यासाठी मदत होते.
14) निरोगी दात
गाजर नियमित खाल्याने दातांचे हिरड्यांच आरोग्य सुधारण्यास मदत होते.
जेवणानंतर गाजर खाल्याने दात स्वच्छ होतात.
15) कफविकार दूर होतो
जर तुम्हाला नेहमी सर्दी, कफविकार होत असेल तर गाजराचा जूस घ्यावा लाभ होतो.
आज आपण गाजराचे आपल्या शरीरासाठी काय फायदे होतात
ते पाहिले
चला तर मग भेटूया एका नवीन विषयासह
लेख आवडल्यास LIKE करा आणि SHARE करायला विसरू नका.


0 टिप्पण्या