नमस्कार मित्रांनो,
व्यायाम न करता वजन कमी करण्याच्या नऊ टिप्स
वाचा आजच्या लेखात
आज भारतातच नाही तर संपूर्ण जगामध्ये लठ्ठपणा ही एक गंभीर समस्या
बनलेली आहे.लठ्ठपणामुळे शरीर बेडोल तर दिसतेच पण अनेक प्रकारचे
गंभीर आजार सुद्धा उदभवतात. आधुनिक जीवनशैली,व्यायामाचा अभाव
आणि चटपटीत पदार्थाचे सेवन या कारणामुळे झपाट्याने वजन वाढते.
चुकीच्या आहारपद्धतीमुळे बरेच वेळा आपले वजन वाढते.
वजन वाढण्याचे मुख्य कारण म्हणजे व्यायामाचा अभाव ,व्यायाम करायचा
बरेच जणांना कंटाळा येतो तसेच अति साखरेचे प्रमाण यामुळे वजन वाढते.
जर तुम्ही अति साखरेचे सेवन करत असाल तर तुमचे वजन वाढणारच परंतु
तुम्हाला व्यायाम करायचा कंटाळा येत असेल तर तुम्ही साखरेचे प्रमाण
कमी करायला हवे.यामुळे तुमची चरबी वाढणार नाही.
अति तेलकट पदार्थाच्या सेवनाने सुद्धा जास्त वजन वाढते म्हणून तेलकट
पदार्थ खाणे टाळावे.जंकफूड फास्ट खाणे टाळावे.
1) गरम पाणी प्यावे
उपश्यापोटी गरम पाणी पिणे हा वजन कमी करण्यासाठी एक चांंगला
स्त्रोत आहे. गरम पाण्यात अर्धा लिंबू टाकून ते पाणी पिल्यास लवकर वजन
कमी होण्यास मदत होते.कारण लिंबूमध्ये विटाॅमिन C Anti Oxidants
असतात.ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.आपल्या शरीरातील
अतिरिक्त फॅट्स कमी होतात म्हणून सकाळी उपाश्यापोटी गरम पाण्यात
लिंबू टाकुन पिणे आवशक आहे.
2) भरपूर प्रमाणात पाणी पिणे
ज्यांना वजन कमी करायचे आहे त्यांनी दिवसातून कमीतकमी साडेतीन ते
चार लिटर पाणी प्यायला पाहिजे. पाण्यामुळे शरीरातील नको असलेले
Toxins बाहेर टाकले जातात व वजन कमी होण्यास मदत होते.
3) दालचिनी वजन कमी करण्यास उपयुक्त
दालचिनी पावडर यात असे काही गुण आहे जे आजार बरा करण्यासाठी
मदत करतात.ही दालचिनी वजन कमी करण्यासाठी खूप फायदेशीर
आहे.दालचिनीच सेवन केल्यामुळे मेटाॅबोलिझमची काम करण्याची क्षमता
वाढते. ज्याने वजन कमी करायला मदत होते.दालचिनीच्या चहाने
हार्मोन्समध्ये अचानक इन्सुलिन वाढण्याचा धोका कमी होतो. या चहात
कॅलरीज नसते व म्हणून ज्यांना वजन कमी करायचे आहे त्यांनी दालचिनी
चहा प्यावा. एक कप पाणी अर्धा च्यमच दालचिनी पावडर घेवून ते चांंगले
उकळावे व थंड झाल्यावर त्यात थोडे मध टाकावे व तो दालचिनी चहा प्यावा
हा चहा दिवसातून एकादा प्यावा. हा चहा वजन कमी करण्यास खूप
उपयुक्त आहे.
4) जेवणात भरपूर सॅलेडचा वापर
वजन कमी करण्यासाठी तुम्हाला तुमच्या जेवणात सॅलेडचा वापर करायला
पाहिजे विशेष म्हणजे काकडीचा वापर करावा. काकडीमध्ये थोडी पण
कॅलरीज नसते. त्यामुळे कॅलरीज नसलेले सॅलेड आपण जर खाल्ये तर
आपल्याला भूक लागत नाहीव वजन वाढत नाही.
5) अद्रकच्या रसाचे सेवन उपयुक्त
अद्रक हे वजन कमी करण्यासाठी खूप जास्त महत्वाचे आहे. तुम्हाला रोज
एक च्यमच अद्रकच्या रसाचे सेवन करायचे आहे. तुम्ही दिवसातून कधीही
या अद्रक्च्या चहाचे सेवन करू शकता असे केल्यास तुमच्या शरीरातील
फॅट्स कमी होतात व वजन कमी होते.
6) Aloe vera जूस उपयुक्त
Aloevera मध्ये विटाॅमिन,फॅटी Acid असतात म्हणून Aloevera जूसच
नियमित सेवन करावे. असे केल्यास वजन कमी करण्यास मदत होते.
7) हिरव्या भाज्यांंचा समावेश
वजन कमी करण्यासाठी रोजच्या आहारात जास्तीत जास्त हिरव्या भाज्यांचा
समावेश करावा.असे केल्यास शरीराला योग्य ते पोषकतत्व मिळेल व वजन
कमी होण्यास मदत होईल.जेवणात पोळी एवजी ज्वारीची भाकरी खावी.
भाकरी हि पचायला हलकी असते व वजन वाढत नाही.हिरव्या भाज्या
सोबतच आहारात कडधान्यांंचा वापर करावा. जेवल्यानंतर लगेच झोपणे
टाळावे.
8) जिरे वजन कमी करण्यास उपयुक्त
रोज एक च्यमचा जिर खाल्याने वजन कमी होण्यास मदत होते. 88
महिलांवर करण्यात आलेल्या एका रिसर्च नुसार जिर हे वजन तर कमी
करतेच तसेच खराब कोलेस्ट्रोल सुद्धा कमी करते. चयापचयाचा वेग सुद्धा
चांगला ठेवतो. वीस दिवस जर तुम्ही नियमित जिऱ्याच सेवन केल तर तुमच
वजन झपाट्याने कमी होण्यास मदत होईल. रात्री झोपण्याच्या आधी एक
ग्लास पाण्यात एक च्यमच जिरे टाकून ते रात्रभर भिजत ठेवावे व सकाळी हे
जिरे पाणी उकळून घ्यावे व कोमट असे प्यावे तसेच जिर्याच्या बिया चावून
चावून खावे खूप लवकर वजन कमी होण्यास मदत होते.
तुमचे वाढलेले वजन कमी करण्यासाठी ग्रीन टी चा वापर खूप फायद्याचा
ठरतो.म्हणून नियमित ग्रीन टी चा वापर करावा.
चला तर मग तुम्ही पण लेखात सागितलेल्या टिप्सचा वापर करा आणि तुमचे वाढलेले वजन कमी करा.
चला तर मग भेटूया एका नवीन विषयासह
लेख आवडल्यास LIKE करा आणि SHARE करायला विसरू नका.











0 टिप्पण्या