Header Ads Widget

दररोज दही खाल्याने शरीराला होतील हे फायदे


  स्वस्थ आरोग्यासाठी दह्याचे सेवन करणे फायद्याचे ठरते. 





आपल्या भारतीय संंस्कृतीमध्ये कोणत्याही शुभकार्याला जाताना दही खाणे

शुभ मानले जाते. दह्याचे सेवन हे अमृत समान मानले जाते.दह्याला  

सुपर फूड असेही असेही म्हटले जाते.जर तुम्ही दह्याचे सेवन दुपारच्या 

जेवणात करत असाल तर त्याचा अधिक फायदा होतो.दह्यामध्ये प्रामुख्याने 

Lactose, प्रोटीन, आयरन, मिनरल्स, विटाॅमिन्स, कॅल्शियम, लोह, 

मॅग्नेशिअम, झिंक इत्यादी पोषक घटक भरपूर प्रमाणात असते. 
                                                 

  

दह्यापासून शरीराला काय काय फायदे मिळतात ते जाणुन घेऊया  


1) वजन कमी करण्यास फायदेशीर 

वजन कमी करण्यासाठी दही खूप फायदेशीर आहे.दह्यामध्ये लो फॅट आणि

 उच्च प्रथिने असतात. त्यामुळे वजन कमी करण्यास मदत होते. 

2) रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यास मदत 


रोज दह्याचे सेवन केल्याने रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते.कारण 

प्रोबायोटिक्स पोषक घटक असतात. दह्यामध्ये असलेले चांगले बक्टिरीया 

इम्यून सिस्टीम वाढविनास मदत करतात.

3) प्रतिकारशक्ती वाढविते

 
दह्यामध्ये चांगले बक्टिरीया  दिसून येतात जे शरीरात पांढरया पेशी 

वाढविण्यासाठी सहायक ठरतात. आणि या पेशी होणार्या संसर्गापासून 

शरीराला सुरक्षित ठेवतात.संसर्गामुळे तयार होणारे विषाणू नष्ट्  करण्याचे 

काम हे दही करते.

4) पचनशक्ती मजबूत करते


दुधाच्या तुलनेत दह्याचे लवकर पचन होते. ज्यांना पोटासंबंधी काही समस्या 

आहे जसे  अपचन, गॅस, ऍसिडीटी, यासारख्या समस्या पासून आराम 

मिळतो. दह्यामध्ये चांगले बक्टेरिया असतात  म्हणून दररोज दह्याचे सेवन 

केल्याने पचनक्रिया चांगली रहाते. पोट साफ होण्यास मदत होते. म्हणून 

एक वाटी दही रोज खाण्याचा सल्ला दिला जातो.दह्यामध्ये प्रोबायोटिक पचन 

तंत्राला सुधारते.

                                                     

5) रक्तदाब नियंत्रित करते 


रोज सकाळी उपाश्यापोटी दही खाल्याने ब्लडप्रेशर कंट्रोल मध्ये राहण्यास 

मदत होते. दह्यामध्ये मुबलक प्रमाणात पोटशिअम असते. जे रक्तदाब कमी  

करण्यास उपयुक्त ठरतात.

6) थकवा कमी होतो 


जर थकवा जास्त प्रमाणात येत असेल तर अश्या वेळेस रोज दही खाणे 

फायद्याचे ठरते. 

7) आरोग्य निरोगी राहते 


स्वस्थ आरोग्यासाठी एक वाटी दही रोज खाणे गरजेचे असते. रोज दही 

खाल्याने दीर्घ आयुष्य प्राप्त होते. आणि अनेक रोग पासून आपले संरषण      

 होते. 

8) ताणतणाव कमी होतो 


रोजच्या धावपळीच्या जीवनात आपण आपल्या आरोग्याकडे लक्षदेत नाही व 

त्यामुळे अनेकदा ताणताणाव निर्माण होतो. आणि हा ताण कमी  

करण्यासाठी दही उपयुक्त ठरते. दही खाल्याने शरीराला उर्जा मिळते आणि 

दिवसभर ताण जाणवत नाही.म्हणून जास्त काम करणाऱ्याणी  दह्याचे सेवन 

करायला हवे. 

9) शरीरातील उष्णता दूर करते 


उन्हाळ्याच्या दिवसात दही, ताक, लस्सी याचे सेवन केल्याने शरीरातील 

उष्णता दूर होते. दही हे शरीराला हायड्रेट करून शरीराला नवीन उर्जा 

देण्याच काम करते. दह्याचे सेवन केल्याने पोटातील उष्णता दूर होते. आणि 

उष्णतेमुळे येणारे फोडे, घामोळ्या, पोटातील जळजळ होत असल्यास दही 

खाणे फायद्याचे ठरते.

10) स्वस्थ त्वचेसाठी


रोज दह्याचे सेवन केल्याने शरीराला विटाॅमिन, मिनरल्स, झिंक यासारख्या 

पोषक घटकांची पूर्ती होते.त्वचेवरील मृत पेशी जिवंत होतात आणि रक्त 

प्रवाह सुद्धा चागला होतो.व त्वचा सुंदर,तजेलदार मुलायम होते.

11) फेसपॅक म्हणून वापर होतो

 
कोणतेही महागडे फेसपॅक चेहर्याला लावून त्वचा खराब करण्यापेक्षा 

नैसर्गिक फेसपक लावणे कधी चागले असते.दह्यानी 10 मिनिटे चेहर्याला 

मालिश करावी व नंतर थंड पाण्याने चेहरा धुवावा.असे केल्यास त्वचा स्वस्थ, 

सुंदर होते.व त्वचेवर नैसर्गिक ग्लो येतो.

 12) केसातील कोंडा दूर होतो. 


जर केसात कोंडा झाला असेल तर दह्याने केसांची मालिश करावी केसातील 

कोंडा दूर होतो. व केस मुलायम स्वस्थ होतात.    

13) कॅल्शियमची कमी दूर होते 


दह्यामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असते. म्हणून जर शरीरात 

कॅल्शियमची कमी असेल तर दही नियमित आपल्या रोजच्या आहारात 

समावेश करायला हवा.

14) कब्ज दूर होतो 


पोट फुगणे किवा कब्जची समस्या असल्यास दही आणि ओवा मिक्स करून 

खाल्यास आराम होतो.

15) अनेक आजार दूर होतात 


नियमित दही खाल्याने हृदयरोग, हाई ब्लडप्रेशर  आणि किडनीच्या 

आहारासाठी दही चांगले मानले जाते.

16) हाडाच्या मजबुतीसाठी 


नियमित दह्याचे सेवन केल्यास शरीरातील हाडे मजबूत होते. डाॅक्टरच्या 

सल्लानुसार रोज 250  ग्रम दह्याचे सेवन करायला हवे.

दही कसे तयार केले जाते? 


दही बनविण्यासाठी दुधामध्ये आंबवण्याची प्रक्रिया केली जाते.कोमट दुधा 

मध्ये थोडेसे विरजण घालून 7-8 तास ठेवल्यानंतर एक प्रकारचा घट्टपणा 

येतो. दुधामधील शर्करा लॅक्टोज ही लॅक्टोबॅसीसलस या जीवाणूंच्या मदतीने 

लॅक्टिक एसिडमध्ये विघटीत होते. व दही लागते. ताजे गोडसर घट्ट दही 

लहानपासून मोठ्या पर्यंत सर्वांना आवडते.आंबट नसलेले ताज्या दह्याचे 

सेवन शरीरासाठी हितकारक ठरते.              

दही कधी खाऊ नये? 

रात्रीच्या वेळी दही खाणे टाळावे . कारण दही हे उष्ण प्रकृतीचे असल्याने 

जर याचे सेवन रात्री केल्याने शरीरामध्ये कफ दोष वाढतो.     

ज्याने खोकला, सर्दी, आम्लपित्त, पोटात जळजळ सांधेदुखी यासारखे त्रास 

होऊ शकतात.

त्यामुळे दही हे नेहमी सकाळी किवा दुपारी जेवणानंतर खावे.   
       
चला तर भेटूया एका नवीन विषयासह....

लेख आवडल्यास  SHARE करायला विसरू नका.     
                 

















 










               
 

 








    

   

    
   


















    



  
 
        
 









 

























 








      

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या