आयुर्वेदामध्ये तुळशीच्या रोपाचे महत्व सांगितलेले आहे. अनेक प्रकारचे रोग
तुळशी पानांच्या सेवनाने बरे होतात. तुळशीची पाने एक उत्कृष्ट रसायन
आहे. तुळस उष्ण व त्रिदोषनाशक आहे. हिंदूच्या प्रत्येक शुभकार्यात,
देवाच्या प्रसादात तुळशीच्या पानांचा समावेश असतोच.जेथे तुळशीची रोपे
अत्याधिक प्रमाणात असतात तेथील हवा शुद्ध आणि पवित्र रहाते.
तुळशीच्या पानांमध्ये एक विशिष्ट तेल असते जे विषाणूयुक्त वायू शुद्ध
करते.सकाळी उठल्यानंतर दोन ते तीन तुळशीचे पान चावून चावून खाल्ली
तर त्याचे असंख्य फायदे आपल्याला मिळतात. तुळशीची माळ धारण
करणारयाला अनेक रोगांपासून मुक्ती मिळते.
1) स्वस्थ हृदयासाठी
हृदय स्वस्थ जर ठेवायचं असेल तर तुळशीची पाने हे रोज चावून चावून
खायला पाहिजे. Heart attack पासून बचाव करण्याचं काम हे तुळशीचे पानं
करते. तुळशीच्या पानांचा रस हे खराब कोलेस्ट्रोल नष्ट् करते. आपल्या रक्त
मध्ये कोलेस्ट्रोल साठू लागते ज्यामुळे धमन्या बंद पडतात. परिणामी Heart
attack येण्याची शक्यता खूप वाढते. तुळशीची पाने हि रक्तातील कोलेस्ट्रोल
घटवतं आणि हृदय स्वस्थ राहण्यास मदत होते.
2) स्मरणशक्ती वाढविण्यासाठी उपयोगी
प्रात:काळी उपाश्यापोटी तुळशीच्या पानांचा रस प्याल्याने किंवा तुळशीची
पाने चावून खाल्याने बल, तेज, स्मरणशक्ती वाढते.
3) तोंडाची दुर्गंधी दूर करण्यासाठी
तुळशीच्या पानांमध्ये एक विशिष्ट क्षार असतो ज्या व्यक्तीच्या तोंडाला दुर्गंधी
येते. त्या व्यक्तीने तुळशीची पाने चावून खाल्यास दुर्गंधी नाहीशी होते.
4) मधुमेहासाठी फायदेशीर
आजकाल प्रत्येक घरात मधुमेहाचे रुग्ण आढळतात. मधुमेहापासून बचाव
करायचा असेल तर सकाळी दोन ते तीन तुळशीची पाने चावून चावून
खावी.आपल्या शरीरामध्ये इन्सुलिनच सिक्रेशन होते तो स्त्राव वाढतो आणि
हे इन्सुलिन वाढल्यामुळे आपल्या शरीराचे मधुमेहापासून रक्षण होते.
5) रक्त शुद्धीसाठी
दररोज दोन ते तीन तुळशीचे पान चावून खाल्यास रक्त शुद्ध होण्यास मदत
होते.
6) सर्दी, खोकल्यासाठी रामबाण
जर सर्दी खोकला असेल तर तुळशीची पाने चहात टाकून चांगली उकळवून
घावी व तो चहा प्यावा फायदा होतो.
7) सोंदर्य वाढविण्यासाठी तुळस
तुळस सोंदर्यवर्धक आहे. तुळशीचा रस व लिंबाचा रस एकत्र करून सकाळ
संध्याकाळ चेहऱ्यावर लावल्याने काळे डाग नाहीसे होतात व सोंदर्य वाढते.
8) दमा
दमा या रोगांमध्ये तुळशीचा रस 3 ग्रॅम, आल्याचा रस 3 ग्रॅम व एक चमचा
मध घेतल्याने फायदा होतो. यामुळे कफ बाहेर पडून श्वास बरा होतो.
9) किडनीचे कार्य सुधारते
तुळशीच्या नियमित सेवनाने किडनीची कार्यक्षमता वाढविन्यास मदत होते.
10) व्हायरल इन्फेक्शनपासून बचाव
सर्दी ,खोकला, ताप यासारख्या समस्ये पासून बचाव होतो म्हणून तुळशीचे
पाने नियमित खाल्ये तर होणार्या इन्फेक्शनपासून बचाव होतो.
11) वात पित्तविकार दूर
तुळशीचा चहा प्याल्याने ताप, आळस ,सुस्ती व वात पित्तविकार दूर होते.
12) ऍसिडीटी साठी उपयोगी
तुळशीच्या नित्य सेवनाने ऍसिडीटी नाहीशी होते.
13) लहान मुलांचे विकार दूर करण्यास उपयोगी
सर्दी, खोकला, ताप, जुलाब, उलटी, जंत इत्यादी व्याधीमध्ये तुळशीचे सेवन
उपयोगी ठरते.
चला तर भेटूया एका नवीन विषयासह....

0 टिप्पण्या