Header Ads Widget

डाळिंब आरोग्यासाठी वरदान Benefits of Pomegranate

नमस्कार मित्रांनो,

डाळिंबापासून शरीराला मिळणारे हे फायदे वाचा

आजच्या लेखात 
 
      
                                                                                                      
                                                                                                     
                                                                                    
डाळिंब हे अत्यंत पौष्टिक असे फळ आहे.डाळिंब एक बहुगुणकरी व औषधी

फळ म्हणून प्रसिध्द आहे.अनेक असाध्य रोग बरे करण्याची क्षमता डाळिंब 

या फळांमध्ये आहे.डाळिंबामध्ये प्रामुख्याने फायबर,विटाॅमिन A,विटाॅमिन

B,विटाॅमिन C,विटाॅमिन K,कॅल्शियम,लोह, मॅगनेशिअम,फाॅस्फोरस,            

पोटॅशिअम,मॅगनिज,सेलेनिअम,झिंक इत्यादी पोषक घटक आढळतात.

डाळिंब हे फळ ओमेगा6 फॅटी ऍसिड चा खूप चांगला स्त्रोत आहे.      

डाळिंब रक्त शुद्ध करण्यास सहायक आहे.डाळिंबामध्ये असणाऱ्या

 फिनोलिक कंपाउडमध्ये Antioxidant असतात डाळिंबा Tannin हे

 Antioxidant द्रव्य सुद्धा जास्त प्रमाणात असते.Antioxidant हे आपल्या

 शरीरासाठी उपयोगी असतात.

‍1‍‌‌‌‌‌) ऍनिमियासाठी लाभदायक

 रक्ताची वाढ करणारा खजिना असे या फळांचे वर्णन केले जाते.कारण

  डाळिंबामध्ये लोह जास्त प्रमाणात असते.डाळिंबाच्या नियमित सेवनाने

 शरीरातील रक्ताचे प्रमाण वाढते.म्हणून ऍनिमिया या आजारांसाठी डाळिंब

 हे खूप उपयुक्त आहे.म्हणून ऍनिमिया पेंशटनी रोज डाळिंब खायला

 पाहिजे. 



2) रोगप्रतिकारशक्ती वाढते

 डाळिंबामध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असले तरी त्यात कार्बोहायडेट्स,

 फायबर सुद्धा आढळतात.डाळिंब हे रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यास खुप

 जास्त फायदेशीरआहे.दीर्घ आजारातून आलेला अशक्तपणा सुद्धा डाळिंबा

 मुळे जातो व शरीरातील रोगप्रतिकारशक्ती वाढते.     



  3) कॅन्सरसाठी फायदेशीर
   
 डाळिंबामध्ये Anti कॅन्सर गुणधर्म असल्यामुळे डाळिंबाच्या नियमित

 सेवनाने कॅन्सर सारख्या आजारांपासून बचाव होतो.डाळिंबात मोठ्या

 प्रमाणात असलेल्या विटाॅमिन सी आणि Antioxidant मुळे कॅन्सरचा धोका

 कमी होतो.



4) हृदयविकारावर लाभदायक 
                        
 हृदयासाठी डाळिंब हे Tonic सारखे काम करते. डाळिंबामध्ये असणारे

 फिनोलिक कंपाउड हे हृदयांसाठी अत्यंत लाभदायक असते.आपल्या

 रक्तधमन्यांना स्वस्थ ठेवण्यासाठी डाळिंब हे खूप उपयोगी आहे.डाळिंबाचे

 दाणे हे हृदय बळकट करण्यासाठी खूपच फायदेशीर आहे.ज्यांना

 हृदयविकांराचा धोका जास्त आहे.किवा ज्यांना Heart Attack आलेला आहे

 त्यांनी नियमित हे फळ नियमित खावे. 


 
5) पोटाच्या विकारासाठी उपयोगी  
                     
डाळिंब हे पोटाच्या विकारासाठी अत्यंत उपायोगी आहे.डाळिंबाच्या सेवनाने

पचनक्रिया सुरळीत होते.Acidity, पित्त, बद्धकोष्ठता,गॅसेस अपचन असेल तर

 रोज एक डाळिंब खाणे उपयुक्त ठरते.  

  यातील  फायबरमुळे बद्धकोष्ठता,गसेस पासून सुटका मिळते.      


6) हाडे मजबूत होतात
                         
डाळिंब हे सांधेदुखी आणि हाडाच्या आजारांसाठी पण उपयोगी आहे.

 डाळिंब खाल्यामुळे हाडे मजबूत राहतात.आणि हाडाचा लवचिकपणा

 देखील वाढतो. 



 7) खोकला कफ साठी उपयोगी 

डाळिंबाच्या सालीमध्ये खूप सारे पोषकतत्व आणि Antioxidant असतात जे

 आपल्या शरीरासाठी उपयोगी असतात.जर तुम्हाला खोकला असेल तर

  डाळिंबाच्या सालीच चूर्ण गरम पाण्यात टाकून पिल्याने फायदा होतो.व

 आराम मिळतो.

8) वजन वाढविण्यासाठी फायदेशीर

ज्यांना वजन वाढयायचे आहे त्यांनी एक कप डाळिंबाचा रस उपास्यापोटी

 रोज घेणे आवशयक आहे.दोन ते तीन महिन्यात तुम्हाला फरक जाणवेल.



9) ताप 

जर शरीरात बारीक ताप आला असेल आणि तोडांची चव गेली असेल तर

 डाळिंब किवा डाळिंबाचा रस घेतला तर उष्णता कमी होते व ताप कमी
 होतो. 
 
10) मधुमेह

ज्यांची शुगर लेवल खूप जास्त प्रमाणात वाढते व ज्यांना शुगर कॅट्रोलमध्ये

 ठेवायची आहे त्यांनी डाळिंबाचे सेवन करायला हवे.  

11) जंत

पोटात जंत झाले असतील तर डाळिंबाच्या सालाचा काढा करून पिल्यास

 पोटातील जंत नाहीसे होतात.

12) मुखवास साठी उपयोगी  

तोंडाची दुर्गंधी येत असेल तर डाळिंबाचे दाणे चावून खावे.यामुळे दुर्गंधी तर

 दूर होते.शिवाय दातातील Bacteria सुद्धा मरतात.    

 चला तर मग भेटूया एका नवीन विषयासह...

लेख आवडल्यास LIKE करा आणि SHARE करायला विसरू नका. 






                                              


   

 



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या