नमस्कार मित्रांनो,
अननस फळांंचे शरीराला होतील हे फायदे
अननस हे फळ चवीला आंबट गोड असे फळ आहे.अननस हे खूप कमी
प्रमाणात ख्याले जाते.अननसाचा उपयोग फ्रूट सॅलेड तसेच फ्रूट केक
जॅम,जेली बनविण्यासाठी केला जातो.अननस एक फायबर रिच फळ
आहे. अननसमध्ये Flavonoid आणि Phenotic acid असते
जे Antioxidants च काम करते.अननसमध्ये प्रामुख्याने विटाॅमिन A आणि
Cविटाॅमिन भरपूर प्रमाणात असते. तसेच फायबर,पोटॅशियम, फाॅस्फोरस,
आयरन,सोडियम,भरपूर प्रमाणात असते. मिनरल्स इत्यादी पोषक घटक
आढळून येतात.
अननसात असलेले आवश्यक घटक
कॅलरीज 50.0 ग्रॅम
कॉपर 12%
मॅगनीज 52%
साखर 9.85 ग्रॅम
पोटॅशियम 109%
फाॅस्फोरस 8 मिली ग्रॅम
फायबर 5 ग्रॅम
प्रोटीन 4 ग्रॅम
कार्बोहायड्रेट्स 10 ग्रॅम
विटाॅमिन C 47.8%
कॅल्शियम 13 मिलीग्रॅम
1) अननसमध्ये नैसर्गिक साखरेचे प्रमाण असते.त्यामुळे मधुमेह असणारे
रुग्ण सुद्धा खावू शकतात.
2) सांधेदुखीचा त्रास,मसल पेन असेल तर अननसाचे सेवन उपयोगी
ठरते.तसेच शरीरात सूज आली असेल तर ती कमी होते.
3) अननस नेहमी खाल्याने आपली डायजेसटीव्ह सिस्टीम चांगली राहण्यास
मदत होते.
4) अननसमध्ये बिटाकॅरोटीन आणि विटाॅमिन Aअसते त्यामुळे दृष्टी निरोगी
राहण्यास मदत होते. तसेच वाढत्या वयानुसार होणाऱ्या डोळ्यांंच्या
समस्या दूर होतात.
5) अननस खाल्याने दांंत व हिरड्या मजबूत राहतात तसेच पायरीयाचा
त्रास असेल तर तो दुर होण्यास मदत होते.
.
6) अननस वजन कमी करण्यासाठी खूप उपयोगी आहे.
7) अननसाच्या नियमित सेवनाने केसांचे गळणे थांबून केसांची वाढ चांगली
होते व केस लवकर पांढरे होत नाही.
8) अननसामध्ये विटाॅमिन C भरपूर प्रमाणात असते म्हणून अननस त्वचेसाठी
खूप फायदेशीर आहे.जर चेहऱ्यावर पिंपल्स, पुटकुळया, काळे डाग
असतील तर अननसाच्या तुकड्याची पेस्ट करून चेहऱ्याला
लावल्यास पिंपल्स कमी होते तसेच त्वच्या मुलायम होते. व त्वचा उजळते.
9) अननसाच्या सेवनाने सर्दी ,खोकला ,कफ , घश्यातील सुजन असेल तर या
पासून आराम मिळतो.
10) अननसाच्या सेवनाने रक्त गोठणे यासारखी समस्या उदभवत नाही.
11) अननस रक्ताला पातळ ठेवण्यास मदत करते त्यामुळे ब्लड सरक्यूलेशन
स्वस्थ राहते.
12) अननसमध्ये Strong Antioxidants असल्याने फ्री रडिकल्सचा खतरा
कमी करून कॅन्सरपासून बचाव होतो.
13) हृदयासंबंधी होणाऱ्या आजार पासून बचाव होतो.
१4) अननसमध्ये पोटॅशिअम ची मात्रा अधिक प्रमाणात असते तर सोडियम
ची मात्रा कमी प्रमाणात असते त्यामुळे अननस सेवन केल्याने
हायपरटेन्शन कमी करण्यास मदत होते.
15) ज्यांना उच्च रक्तदाबांचा त्रास आहे त्यांनी नियमित अननसाचे सेवन केले
तर उच्च रक्तदाब कमी होतो.
16) अननसमध्ये मैैक्यूलर डीजेनेरेशनला थांंबविण्याची क्षमता
असते. मैैक्यूलर डीजेनेरेशन असा आजार आहे कि हळूहळू डोळ्यांतील
सेन्ट्रल विजन नष्ट करतात म्हणून डोळ्यांचे आरोग्य निरोगी
राहण्यासाठी अननसाचे सेवन करावे.
17) किडनी स्टोन झाला असेल तसेच किडनी स्टोनचा त्रास असेल तर रोज
एक ग्लास अननस चा ज्यूस पिल्यास फायदा होतो.
18) अननसाचे छोटे छोटे तुकडे खाल्याने पित्त विकार दूर होतो.
19) उन्हाळाच्या दिवसात अननसचे शरबत पिल्याने शरीरातील उष्णता दूर
होते आणि उन्हाळी लागत नाही.
20) स्कर्वी रोग झाल्यास अननसाचा रस पिल्याने फायदा होतो.
उपाश्यापोटी अननसचे सेवन करू नये. उपाश्यापोटी अननसचे सेवन
केले तर ते नुकसानदायक ठरते तसेच अननसाचे सेवन रात्री कधीही करू नये.
योग्य वेळी अननसचे सेवन केले तर त्याचे अनेक लाभ मिळतात नास्ता किंवा
जेवण झाल्यानंतरच अननसचे सेवन करावे कारण अननस मध्ये Bromelain
नावाचे ऐझायम्स असते जे प्रोटीनला चांगल्या पद्धतीने पचविण्यास मदत करते.
चला तर मग भेटूया एका नवीन विषयासह
लेख आवडल्यास LIKE करा आणि SHARE करायला विसरू नका.



0 टिप्पण्या